मनोहर अर्जुन सुर्वे, ऊर्फ मन्या सुर्वे हा एक ७० व ८० च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा. या मन्याला ११ जानेवारी, १९८२ रोजी पोलिसांनी वडाळ्यातील काॅलेज मध्ये एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी १ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरुन मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला ‘लाईव्ह एनकाऊंटर’ होता. मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वे हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू-भंडारी डॉन होता. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एनकाऊंटर असल्याची नोंद करण्यात आली आहे.
तुम्हाला वाटेल मन्या सुर्वे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीतून आला असेल पण तसे नव्हते.. तो एक सुशिक्षित व हुशार विद्यार्थी होता. त्या काळात त्याला पदवी परीक्षेत ७८ टक्के गुण मिळाले होते. शाळा व महाविद्यालयीन काळात मन्या हा अतिशय साधा मुलगा होता. परंतु त्याचा मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात गेला व मन्या त्याच्या या स्वभावा मुळे या क्षेत्राकडे आला आणि लवकरच अंडरवर्ल्डचा डॉन झाला. त्या काळात संपूर्ण मुंबईत मण्याची दहशत होती. त्याचा एनकाऊंटर तत्कालीन एसपी इसाक बागबान यांनी केला होता. तत्कालीन एसपी इसाक बागबान हे मुळचे बारामतीचे आहेत.
त्याच्या आयुष्यावर “शूट आउट एट वडाला” हा चित्रपट आला या मध्ये जॉन अब्राहम याने मन्याची भूमिका उत्तमरित्या पार पडलेली आहे. या चित्रपटातून मन्या बऱ्याच प्रमाणात समजून घेतला जाऊ शकतो. मन्यामुळे मुंबई अंडरवर्ल्ड मधील जुने डॉन आणि पोलीस सर्वां करिता तो डोकेदुखी झाला होता. सगळे त्याचा गेम करण्यामागे लागले होते परंतु मन्या अत्यंत हुशार होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना अतिशय कठीण चालले होते. माणूस प्रेमात हरतो व मन्यासोबत ही तसेच झाले. मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला फसविले आणि त्याला भेटायला बोलवून त्याचा एनकाऊंटर केला.
मन्या सुर्वेचे पुणे शहराशी जबरदस्त नाते राहिले. मन्याचा जन्म १९४४ मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पावस, रनपूर येथे झाला होता. तो आपल्या आई व सावत्र वडिलासोबत राहत होता. मन्या लहानपणापासून खूप स्मार्ट होता. त्याला इंजिनियर बनायचे होते. मात्र, कॉलेजच्या काळातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. तेथूनच त्याने पोलिसांचा बदला घेण्यासाठी एक गँग तयार केली. याद्वारे तो काळ्या धंद्याकडे वळाला. मन्या सुर्वेने आपली पहिली हत्या १९६९ घडविली. त्यानंतर तो चर्चेत आला. दाउदचा भाऊ इब्राहीम कासकर याचा खून पण मन्यानेच केला होता. त्याला शेवट पर्यंत मन्याचा बदला घ्याचा होता पण तो त्याला शक्य झाला नाही. दाउद मन्याच्या नावाने घाबरत असे. मन्या एकमेव असा डॉन आहे ज्याने दाउदला अनेक वेळेस मारून टाकायची धमकी दिली होती.
या हत्येनंतर मन्या व त्याच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. जेलमध्येही त्याचा दबदबा होता. तो जेलमध्ये दादा झाला. तेथे त्याने अनेक कैदी त्याच्या गँगमध्ये सामील केले. जेल प्रशासन मन्यापुढे थकले. येथेच त्याची दुष्मनी सुहास भटकळ नावाच्या कैद्यासोबत झाली. मन्या व सुहास यांचे जेल मध्ये वेगवेगळे गट होते. त्यानंतर मन्या जेलमधील सुहासच्या गँगमधील साथीदारांना एकेक करून मारू लागला. प्रशासनाला हि बाब ध्यानात आली परंतु पुरावे सापडत नव्हते म्हणून मन्याला रत्नागिरी जेल मध्ये पाठविण्यात आले होते.
त्याला बेकायदा रत्नागिरी जेल मध्ये पाठविले म्हणून मन्याने जेलमध्येच उपोषण सुरु केले. तो जेवण घेत नसे त्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रत्नागिरी येथील दवाखान्यात पाठविण्यात आले. मात्र मन्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता. तो १४ नोव्हेंबर १९७९ रोजी रत्नागिरी येथील दवाखान्यातून पळून जाण्यास यशस्वी झाला. त्यानंतर तो ११ जानेवरी १९८२ मध्ये एनकाऊंटर मध्ये मारल्या गेला तोपर्यंत तो फरारच होता.
छगन भुजबळ निवडून आल्यावर मिरवणुकीत बाळासाहेबांची गाडी चालविताना स्वतः मन्या सुर्वे-खाली नमूद केलेल्या छायाचित्रात आपण पाहू शकता. मन्या सुर्वे दवाखान्यातून पळून पोलिसांना चकवून बाहेर पडल्या नंतर आपली गँग पुन्हा वाढवली. पुण्यातील जेलमध्ये ९ वर्षे राहून आल्याने मन्या आता तरबेज गुन्हेगार बनला होता. पुण्यातील येरवड्यातील वास्तव्या नेच मन्या अंडरवल्डचा बादशाह बनण्यास मदत झाली. मन्याची गुन्हेगारीही त्यामुळे वाढली. मन्याचा विश्वास हजारपटीने वाढला होता. तो आता कोणलाही दिवसा ढवळ्या ‘खल्लास’ करु लागला होता. तत्कालीन अंडरवर्ल्डमधील हाजी मस्तान, बाटलीवाला यांच्या सारख्या टोळ्यांना व नव्याने उदयास येत असलेल्या दाऊद गॅंगला तो उघड आव्हान देत होता.
भ्रष्ट पोलिसांना तो उघडे-नागडे करुन मारहाण करुन बदला घ्यायचा. त्यामुळे पोलिस डिपार्टमेंट त्याला कमालीचे घाबरुन होते. त्याच्या विरोधात सर्वच चिडीचाप असत. आणि तो लोकामध्ये हिरो बनू लागला होता. पोलिसांनी त्याचा बदला घेण्यासाठी बनाव रचत त्याला एनकाऊंटर मध्ये मारले. या एनकाऊंटरचे नेतृत्त्व पुणे जिल्ह्यातील बारामतीचे रहिवाशी असलेले तत्कालीन एसीपी इसाक बागवान यांनी केले होते. बागवान यांनीच मन्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
एसीपी इसाक बागबान याबाबत सांगितले जात आहे की, मुंबईत मन्याची एवढी दहशत वाढली होती की त्या काळच्या डॉन यांना मन्या सहज पाणी पाजत होता. त्यामुळेच त्याकाळच्या मुस्लिम डॉननी मिळून राजकीय वरदहस्ताने मन्याची हत्या घडवून आणली. मन्यासाठी पुणे येरवडा जेल सर्वात सुरक्षित जागा होती. कारण त्याचे राज्य होते. जेलमध्ये सर्व कैद्यांचा तो दादा होता. मात्र तो जेलमधून पळाला व मुंबईत त्यांने गँग बनविली. त्यानंतर तो दोन-तीन वर्षातच तो मारला गेला. मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वे हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू -भंडारी डॉन होता. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एनकाऊन्टर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज जर मन्या सुर्वे जिवंत असता तर दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला यांची पलटण मुंबईतून केव्हाच गायब झाली असती, असे सांगितले जाते.
मित्रहो.. मी या सदर लेखातून मन्या किंवा त्यांच्या गुंडगिरी वृत्तीला सलाम किंवा स्तुतीसुमन उधळत नाहीये. त्याच्या आयुष्यावर “शूट आउट एट वडाला” हा चित्रपट आला होता. यामध्ये जॉन अब्राहम यांने मन्याची भूमिका उत्तमरित्या पार पडलेली आहे. या चित्रपटातून मन्या बऱ्याच प्रमाणात समजून घेतला जाऊ शकतो. मन्या लहानपणापासून खूप स्मार्ट होता. त्याला इंजिनियर बनायचे होते. मात्र, कॉलेजच्या काळातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. तेथूनच त्याने पोलिसांचा बदला घेण्यासाठी एक गॅंग तयार केली. त्याला त्या मजबूरीने परिस्थितीमुळे वळायला भाग पडायला लागले असेल. मुळात अभ्यासात हुशार असूनही तो वाईट मार्गाला कसा वळला व कुख्यात डॉन बनला.
मन्या सुर्वेने दाऊदच्या भावाला दिलेल्या धमकीनुसार दाउदच्या भावाला ठार मारले नसते तर दाऊदला आज पाकिस्तानात लपून राहायची गरजच लागली नसती. आज आपल्या मुंबई पुण्यावर त्या दोन भावांचीच दहशद असती. दाउदचा भाऊ मेल्याने मुंबईमधील अर्धे अधिक अंडरवर्ल्ड संपले आणि ते मनोहर सुर्वे मुळेच शक्य झाले. मन्या गुंड जरी असला तरी तो गुंड का होता, तो गुंड कोणामुळे झाला होता..? आणि त्याचे लक्ष काय होते..?हे माहित नसलेल्यांनी मन्या सुर्वेबद्दल कमीच बोलावे. मन्या आमचा आदर्श नाही किंवा तो मुंबईचा बाप देखील नाही.पण मराठी म्हणून काहींना त्याचा आदर असणे स्वाभाविक आहे तर काहींना विरोध असेल. मन्या सुर्वे तर आपल्यासारखा साधासुधा विद्यार्थी होता. त्याला भावाच्या मर्डर केसमध्ये मुद्दाम खेचून घेण्यात आले होते आणि भर महाविद्यालया मध्ये इज्जत काढली होती. उगाच त्याचे परिणाम नंतर ज्याला त्याला भोगावे लागले ते लागलेच.
तुमच्या आयुष्याची अशी कोणी वाट लावून तुमच्या इच्छांना पायदळी चुरडून टाकून कोणी तुम्हाला आयुष्य भरासाठी उगाच जेलमध्ये टाकले तर तुम्ही पण असेच कराल..? आणि मन्याने पण तेच केले. उगाच कहाणी न जाणता, खऱ्या गोष्टीचा आढावा न घेता, मनोहर सुर्वेला वाईट बोलायचे काम नाही..! पण मला लोकांना हे सांगावेसे वाटते की मन्या असो वा दाऊद कासकर..हे या रत्नागिरी सारख्या पवित्र कोकणच्या भुमीत जन्माला आले व कुख्यात डॉन कसे बनले..?? खरंतर ह्या साधूसंताच्या या कोकणभूमीत दुदैर्वच म्हणावं लागेल. त्यांना कोणी अभय दिले.? कसे मोठे झाले..केव्हा पाठबळ दिले..?? मग ते राजकीय व्यक्ती असो वा पोलिस अधिकारी विशेषतः सागरी गस्तीचे..मोठे धंदेवाले असो वा बिल्डरलाॅबी असो वा लोकल मुंबईकर पब्लिक…ती एक मोठी विचार करायला लावणारी गोष्ट आहे. असो…! लेखक म्हणून मी ती गोष्ट बहुतांशी मांडण्याचा प्रयत्न केला आहे…काही तृटी असल्यास क्षमस्व.
– संग्रहित
गणेश उर्फ अभिजित कदम, कुडाळ सिंधूदुर्ग
Leave a Reply