संगीतकार, गायक व अभिनेता उस्ताद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला.
संगीतकार गायक व अभिनेता उस्ताद तलत अझीझ हे किराणा घराण्याचे गायक असून त्यांनी मेहंदी हसन व जगजीत सिंग यांच्याकडून गायनाचे धडे घेतले आहेत.
‘उमराव जान’मधली ‘जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें’ किंवा ‘बाजार’मधले ‘फिर छिडी रात, बात फुलों की’ किंवा ‘डॅडी’मधले अनुपम खेरवर चित्रित झालेले ‘आईना, मुझसे मेरी पहली सी सुरत दे दे’ ही त्यांची गाणी हीट झाली..
एका सिनेमात तलत अझीझ यांनी हिरोचे काम केले आहे, पण हिंदी चित्रपटसृष्टीत ते रमले नाही. गझलचे विश्वच त्यांना आनंद देऊन गेले. ‘कारवाँ-ए-गझल’ या संग्रहात तलत अझीझ यांनी मोमीन, शेवटचा मोगल बादशहा बहाद्दूरशहा जफर, मिर्झा गालिब, जिगर मुरादाबादी, फैझ अहमद फैझ, पाकिस्तानचे शायर अहमद फराज, दाग देहलवी, फिराक गोरखपुरी व जाँ निस्सार अख्तर असे ऊर्दू साहित्यातील दिग्गज शायर निवडले होते. ‘कुरबतों में भी जुदाई के जमाने मांगे’ ही शेवटची अहमद फराज यांची गझल तलत अझीझने सोनु निगमच्या साथीने गायली आहे. त्यांचे ३० हून अधिक गाण्यांचे अल्बम प्रसिद्ध आहेत.
https://www.youtube.com/watch?v=iTGy4aKehNs
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply