झुबीन मेहता यांचा जन्म २९ एप्रिल १९३६ या दिवशी मुबंईत पारशी कुटूंबात झाला. त्यांच्या वडलांचे नांव मेहिल मेहता तर आईचे नाव टेहमीना मेहता. त्यांचे वडील अकाउंटंट होते, ते उत्तम व्हायोलीन वादक होते आणि बॉम्बे म्युझिक ऑर्केस्ट्राचे म्युझिक कंडक्टर आणि संस्थापक होते.
झुबीन मेहता यांचे वडील म्हणत झुबीन हा ‘ बॉर्न संगीतकार ‘ आहे. ते कॅलिफोर्नीया लॉस एजेलीस येथील अमेरिकेन यूथ सिंफनी कंडक्ट करायचे. झुबीन मेहता यांचे शालेय शिक्षण मुंबईतील सेंट मेरीज स्कूलमध्ये झाले तर पुढील शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झाले. लहान असल्यापासून ते पियानो वाजवायचे त्यांचे पियानोचे शिक्षण जोसेफ डी लिमा याच्याकडे झाले. त्यानंतर ते व्हायोलीनकडे वळले. मुंबईत असताना ते त्यावेळी आठवड्यातून एकदा शिकायला पुण्याला जात. तीन तास शिकवणी झाली की परत मुंबईला येत.
काही काळाने त्यांना त्याच्या गुरूंनी सांगितले की तू व्हिएनाला जा. खरे तर त्यांना मेडिसिनला जायचे होते, ते गेलेही दोन वर्षे कॉलेजमध्ये होते. पुढे ते व्हिएनाला गेले, वयाच्या १८ व्या वर्षी ते संगीत शिकू लागले त्यांचे संगीताचे मार्गदशक होते हान्स स्वारोस्की. हान्स स्वारोस्की हे ऑस्ट्रियन कंडक्टर होते ते जन्माने हंगेरियन असून जन्माने ज्यू होते. झुबीन मेहता यांचे पहिले लग्न झाले त्यानंतर त्यांचा दोन मुले झाली त्यांनी त्यानंतर घटस्फोट घेतला. दोन वर्षाने त्याच्या भावाने त्यांच्या पहिल्या पत्नीशी लग्न केले. पुढे झुबीन मेहता यांनी नॅन्सी कोव्होक या अमेरिकन अभिनेत्रीशी विवाह केला.
१९५८ मध्ये व्हीएन्नामध्ये पहिल्यांदा ‘ म्युझिक कंडक्ट ‘ केले. त्याच वर्षी ते लिव्हरपूल येथील रॉयल लिव्हरपूल फिलॅर्मोनिकचे असिस्टंट कंडक्टर झाले. आणि इथूनच थंयच्या मोठ्या कारकिर्दीला सुरवात झाली. इज्राएल विषयी त्याला विशेष आकर्षण होते आणि तिथल्या लोकांना झुबीन मेहताचे. त्यांनी अनेक इज्राएलमधील तरुण मुलांना संगीताचे धडे दिले, मार्गदर्शन केले. झुबीन मेहता म्हणतात ‘ वेग ‘ ह्या संगीतात महत्वाचा असतो त्यांचे ‘ चढ-उतार ‘ आणि ‘ टेम्पो ‘ यांचे संयोजन खूप महत्वाचे असते, नियंत्रणाही महत्वाचे असते. कारण नुसती व्हायोलीन १६ किंवा त्यापेक्षा असतील तर ते काम अधिक कॊशल्याचे असते.
अनेक मोठमोठ्या नावाजलेल्या ग्रुप्सचे ते म्युझिक कंडक्टर झाले. आज त्यांचे जगात नाव सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या जगभर प्रवास आणि त्याच्या ग्रुप चे मोठमोठे कार्यक्रम होतच असतात. मध्यंतरात त्याचा कार्यक्रम टाटा थिएटरला होता आणि त्याआधी काही वर्षांपूर्वी टी.आय.एफ. आर. ला होता. त्याच्याकडे पाहिले की जबरदस्त संगीतातले रॉयल व्यक्तीमत्व कसे असते हे बघायला मिळले. खरे तर आमचे संगीत आणि पाश्च्यात्य संगीत ज्याला सिफनी म्हणतो त्याचे आणि हिंदुस्तानी संगीत या दोघांच्या पद्धती वेगळ्या आहेत पण शेवटी संगीत हे एकाच असते. पंडीत रविशंकर आणि झुबीन मेहता यांनी एकत्र खूप कार्यक्रम केले. त्यावेळी झुबीन मेहता परदेशात एस्टॅब्लिश झालेले होते आणि पंडित रविशंकर यांनी त्यांच्याबरोबर कार्यक्रम करून भारतीय संगीतात वेगळे फ्युजन निर्माण केले. भारतीय संगीताची खरी ओळख पाश्चात्य संगीतात रवीशंकर यांनी करून दिली. पंडित रविशंकर आणि उस्ताद अल्ला रखा यांनी भारतीय संगीत जगभर नेले. असे झुबीन मेहता यांचे म्हणणे आहे.
आजही झुबीन मेहता भारतीय आहेत, ते जगभर असतात पण ते स्वतःला ‘ मुबईकर हिंदुस्तानीच ‘ समजतात. मी खरा ‘ मुबईकर ‘ आहे ते विसरू शकत नाहीत. भारतीय संगीतावर त्यांचे नितांत प्रेम आहे. ते भारतीय आहेत पण राहतात अमेरिकेत. अर्थात त्यांचे कार्यक्रम जगभर होतच असतात.
झुबीन मेहता यांना १९९९ साली ‘ वूल्फ प्राईज इन आर्टस् मिळाले ‘.इज्राएल सरकारने त्यांना खूप पुरस्कार दिले. त्याचप्रमाणे त्यांना भारात सरकारने २००१ साली पद्मभूषण पुरस्कार दिला, २००६ साली पदम विभूषण पुरस्कार दिला, २०१३ साली त्यांना राष्ट्र्पती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘ टागोर अवॉर्ड ‘ दिले, जगभर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ‘ हॉलिवूड वॉक ऑफ फेम ‘ हा सन्मान मिळालेले ते २,४३४ वे ‘ स्टार ‘ आहेत. त्यांना हा सन्मान २०११ साली मिळाला. त्यांच्यावर
जगभर अनेक ‘ शॉर्ट फिल्म्स ‘ बनवल्या आहेत.
खऱ्या अर्थाने या भारतीय संगीतकाराने जगभर आपली छाप सोडून आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply