नवीन लेखन...

आमच्या ठाण्याची संगीत संस्कृती

Music Culture ot Thane City

सप्रेम नमस्कार मंडळी !

अापणां सर्वांनाच महाभारतामुळे संजय हे पात्र परिचित अाहे की जो अंध धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर रोज काय चाललंय याचं साद्यंत वर्णन करुन सांगायचा कारण त्याच्याकडे तशी दिव्यदृष्टी होती !

अाज मीही असाच काहिसा रोल करणार अाहे : पण यात दोन प्रमुख फरक अाहेत — १) मी संजयसारखी दिव्यदृष्टी असलेला नाहि अाणि अापण सारे अंध नसून अत्यंत सुजाण वाचक अाहात अाणि २) मी जो वृत्तांत कथन करणार अाहे ते कुरुक्षेत्रावरचं युध्द नसून सूरक्षेत्रावरचं शास्त्रीय शुध्दकला सादरीकरण अाहे.

रसिकहो , लेखाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मी अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की शास्त्रीय संगीत अाणि माझा संबंध राहूल गांधी अाणि सामान्य ज्ञान यांच्याइतका किंवा अरविंद केजरिवाल अाणि अर्थपूर्ण बोलणं एवढा { } घनिष्ट अाहे !

नाहि म्हणायला अामचं कुलदैवतंच श्री शांतादुर्गा लक्ष्मी नृसिंह असल्यामुळे अाम्हाला कुठेहि कधीहि अाणि कुठल्याहि गोष्टीवरून राग लगेच येतो !

मग तुम्हि म्हणाल की असं असताना तुम्हि कसं काय रागदारीवरच्या कार्यक्रमाबद्धल लिहू शकता ? अहो जर का संघ परिवाराच्या निष्ठा अाणि प्रामाणिकपणा , देशभक्ती याबाबत काहिहि माहित नसताना { किंबहुना माहित असूनहि माहित नसल्यासारखं भासवा म्हणा वा अमान्य करत म्हणा } लोक सट्टा खेळल्याप्रमाणे काहिहि { हं श्री } लिहू शकतात { वृत्तपत्र ….. कळलंच असेल ! } तर मी का नाहि संगीतावरील कार्यक्रमाबद्धल लिहू शकत ? असो……

कर्मधर्म संयोगाने अामच्या ठाणे शहराच्या नावातलं शेवटचं अक्षर पण णे असल्यामुळे अाणि संगीतविषयक अतिरथी—महारथी अामच्याकडेहि असल्याने अाम्हाला पण जाज्वल्य अभिमान असणारंच ना !

तर मंडळी , अाटपाट नगर होतं { ठाणे हां , अहमदनगर नव्हे! }.तिथे ३ झपाटलेल्या वल्ली होत्या : शशांक दाबके — अनंत जोशी अाणि धनश्री लेले ! २०१३ सालापासून त्यांनी एक पण केला : काय पण झालं तरी ठाण्यातल्या लोकांना संगीताची भरगच्च मेजवानी द्यायची अाणि या त्यांच्या अट्टाहासातून गेली ५ वर्षे ठाणे म्यूझिक फोरम अाणि उत्कर्ष मंडळ यांच्या सहयोगाने हा संगीतरथ अव्याहत वाटचाल करतोय ! अाणि हा कार्यक्रम होण्याचं ठिकाण काय तर सहयोग मंदिर ! या वास्तूचं नांव सहयोग खेरीज दुसरं असूच शकत नाहि ! कितीतरी विषयांवरचे कार्यक्रम अखंडपणे इथे चालतात अाणि अाम्हां ठाणेकरांना अाकंठ तृप्त करतं हे सहयोग मंदिर

मंडळी यावर्षी २४ , २५ , २६ मार्च असे ३ दिवस हा कार्यक्रम झाला.पहिल्या दिवशी ओढव रागांवर { म्हणजे ५ सुरांवर अाधारित } , दुसर्‍या दिवशी षाढव रागांवर { म्हणजे ६ सुरांवर अाधारित } अाणि सांगतादिनी संपूर्ण सूरसप्तकावर अाधारित राग सादर केले गेले ! तीन दिवस कान तृप्त झाले ! बाकी एखादा संगीत वा कलेविषयक अनुभव हा वर्णन करुन दुसर्‍या व्यक्तीला तितकाच अानंद देऊ शकेल इतकी कुणाचीहि लेखणी समर्थ कशी असेल ? फार तर तांत्रिक बाबींवर वर्णन करता येईल , पण अनुभव ? खरं सांगू ?

अशी कल्पना करा की तुम्हि सुस्नात { म्हणजे स्वच्छ अांघोळ केलेले ! } अाहात , समोरंच एक ३ महिन्याचं नुकतंच अंग धरु लागलेलं गोबर्‍या गालांचं लहान बाळ अाहे जे नुकतंच काथ्याच्या पलंगावर अाघोळ झाल्यानंतर ठेवून छान ओव्या—धूपाची वेखंडाची धुरी दिलेलं अाहे अाणि मग मस्तपैकी दुपट्यात गुंडाळून पॅकबंद केलेलं तीट लावलेलं तुमच्या बाजूला अाणून ठेवलंय बिछान्यावर अाणि तुम्हि त्याला कुशीत घेऊन थोडावेळ पहुडता ! जाॅन्सन्स बेबी पावडरचा गोड वास , झोपेतंच खुदकन हसणारं ते इवलंसं निरागंस बाळ अाणि तुम्हि ! असं वाटतं जगाच्या अंतापर्यंत हे सुखद क्षण संपूच नयेत ! त्या काहि क्षणांवर तुमचा अख्खा दिवस छान सुगंधी होऊन जातो , हो ना ?

अगदि तसंच अामचं झालंय बघा , संगीतक्षेत्रातल्या अनेक कलावंतांनी एकेक रागातलं पिल्लू १५ ते ३० मिनिटांसाठी अामच्या कुशीत दिलं , पहिल्या पिल्लाची ऊब , धुंदि उतरते न उतरते तो दुसर्‍या रागाचं पिल्लू परतअलगद तुमच्या कुशीत !अाणि अशी ३ दिवसात ३० पिल्लं तुमच्या कुशीत अलगद सोडलेली , निरनिराळ्या अंगाची , रूपाची , चणीची….. अशी धुंदि अनुभवतंच अख्खं वर्ष काढायचं महाराजा , परत नवी पिल्लं कुशीत घ्यायला पुढच्या वर्षी !

अाणि दुग्धशर्करा योग बघा : पहिल्या दिवशी प्रत्येक रागाचं विश्लेषणात्मक निरुपण करायला दस्तूरखुद्द डाॅ.विद्याधर ओक ! दुसर्‍या दिवशी खुमासदार निवेदक पं. मुकुंद मराठे अाणि सांगतादिनी धनश्री लेले — विघ्नेश जोशी !

पं. मुकुंद मराठे यांनी एक छान शब्दफोड सांगितली : संत म्हणजे संवादिनी { पेटि / हार्मोनिअम } अाणि तबला अाणि अाता इथून पुढे कार्यक्रमाची यादी देताना हाच शब्द मी वापरणार अाहे साथसंगत कलाकारांसाठी !

मंडळी यादी सांगण्याअाधी या लेखाचा अाणखीन एक उद्देश अाहे कौतुक करण्याचा , तो पूर्ण करून घेतो !

इतक्या सगळ्या कलाकारांना घेऊन असा भव्य कार्यक्रम करायला जिगर लागते अाणि यासाठी शशांक दाबके , अनंत जोशी अाणि धनश्री लेले यांचं खूप कौतुक ! कुणाचंहि प्रायोजकत्व न घेतल्याने दादपेटी मधे फूल ना फुलाची पाकळी टाकणार्‍या माझ्यासकट तमाम रसिक ठाणेकरांचं कौतुक ! हिंदुस्तानी संगीतातील २२ श्रुतींवर शोधक कार्य केल्याबद्धल ब्राह्मण सभा—गिरगांव तर्फे श्रद्धानंद देव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्धल डाॅ.विद्याधर ओक यांचं अभिनंदन अाणि उत्कृष्ट निवेदक म्हणून पुण्यात पुढच्या महिन्यात सन्मानित केल्या जाणार्‍या धनश्री लेले यांचंहि अभिनंदन ! हे शिवधनुष्य पेलण्यासाठी फार मोठं नियोजन अाणि हातभार लागतो , त्यासाठी अहोरात्र झटणार्‍या तमाम लोकांचं कौतुक अाणि अाभार !

मंडळी , ३ Video Cameras च्या सहाय्याने याचं Live Shooting करत ते www.kalastream.com या Website वर लवकरंच Free दाखवण्यात येईल असं घोषित करणार्‍या अादित्य ओक यांचे लक्ष लक्ष अाभार ! या Website वर एकदा Sign In झाल्यावर ३ कार्यक्रम free बघता येतात.{ फक्त Online Streaming not offline }

तसंच डाॅ.विद्याधर ओक यांनी सांगितले हे 22 Shrutis in 500 Ragas हे Android App free अाहे जे शास्त्रीय संगीतविषयक रुची असणार्‍यांना फारंच उपयुक्त अाहे !

अाता इथून पुढे कदाचित् अापणासारख्या रसिकांना नीरस वाटेल अशी फक्त यादी अाहे अाणि ती माझी वैयक्तीक त्रुटि अाहे कारण शास्त्रीय संगीत न शिकल्यामुळे या सगळ्या कलाकारांवर अाणि त्यांच्या सादरीकरणावर रसग्रहणात्मक विवेचन करता येणं मला अशक्य अाहे , ती यादी देण्यामागे त्या त्या कलाकारांचं श्रेय त्यांना अावर्जून देणं एवढाच प्रामाणिक उद्देश अाहे !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..