ह्याचे ०.३३-१ मी उंचीचे तृण जातीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे काण्ड पातळ,गडद व हिरव्या रंगाचे असते हे भौमिक काण्डापासून उगवते व वरच्या भागात त्रिकोणी असते.पाने लांब व मुळा सारखी असतात.फुले ५-२० सेंमी लांब असतात.काण्डाचा भौमिकभाग सुत्रवत भौमिक काण्डात रूपांतरीत होऊन त्याला १ सेंमी व्यासाचे बाहेरून काळे व आत धुरकट किंवा पांढऱ्या रंगाचे सुगंधी कंद येतात.
ह्याचे उपयुक्तांग कंद असून मुस्ता चवीला कडू,तुरट व थंड गुणाचा असून हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्तनाशक व वातवर्धक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१)मुस्ता त्वचा रोगात लेपासाठी उपयुक्त आहे.
२)मुस्ता आमपाचक असल्याने पोटाच्या विकारात उपयुक्त आहे.
३)ताप आल्यामुळे लागणाऱ्या तहाने मध्ये मुस्ता सिद्ध जल देतात.
४)मुस्ता हा स्तन्यवर्धक व स्तन्यशोधक आहे म्हणून ह्याचा लेप बाळंतीणीच्या स्तनांवर करतात.
५)मस्तिष्क दौर्बल्यामध्ये मुस्ता गोदुग्धासह देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply