नवीन लेखन...

माझे आवडते कथा लेखक – आनंद साधले

इंग्रजी साहित्यात ‘ चावट ‘ या सदरात मोडणार साहित्य प्रकार बऱ्यापैकी रुजलेला आहे. अर्थात त्याला पाश्च्यात मुक्त वातावरण आणि मुक्त विचारधारा कारणीभूत असतील. एकदम ‘ नागव ‘लिखाण नसेल हि पण बरचस ‘ कमरे खालच ‘असते. तसला प्रकार मराठी साहित्यात दुर्मिळच आहे. तरी या प्रकारातला एक कथा संग्रह माझ्या वाचण्यात आला आहे !

आत्माराम नीलकंठ अर्थात आनंद साधले यांच्या कथांचा तो संग्रह . त्यांची ‘ मातीच्या चुली ‘ (आत्मचरित्र )
आणि ‘ हा जय नावाचा इतिहास आहे ‘(महाभारतावरील ) हि पुस्तके चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटणार नाहीत, तुम्हीही ती वाचली असतीलच. पंचाहत्तर वर्ष्याच्या आयुष्यात त्यांनी साठ पुस्तक लिहिली आहेत !त्यांच्या लेखना बद्दल लेखक / वाचक मंडळीत खूप प्रवाद आहेत.आपण त्या प्रवादांत न पडता आता फक्त त्यांच्या ‘ हटके ‘ कथान बद्दल बोलू.

मी वाचलेल्या कथा संग्रहाचे नाव होते ‘ मकरध्वजच्या कथा ‘ (कदाचित आनंदध्वजाच्या कथा हि असेल आत्ता नक्की आठवत नाही करण चाळीस -पंचेचाळीस वर्षे लोटली असतील त्या वाचनाला !)त्या कथानची काही वैशिष्टे अजून स्वरणात आहेत. त्यातील कथा शृंगारिक , मिश्कील , आणि काहीश्या उत्तान स्वरूपाच्या आहेत. बहुतेक कथांचा केंद्र बिंदू अनैतिक संबंध हाच असायचा. या चावट विषयाला यांनी भरजरी शब्दानच्या भाषा शैलीत लपेटून वाचकान समोर पेश केले आहे. पौराणिक किवा ऐतिहासिक काळातील भाषा शैलीशी कथेतील भाषा सलगी करते. त्या मुळे शृंगारिक दाहकता कमी होवूनहि लेखनाचा उद्देश सफल झाला आहे !

कथा बीजे मात्र अस्सल भारतीयच वापरली आहेत. काही बीजे काल्पनिक असली तरी बरीचशी आपणस नीतिकथा , पौराणिक कथांतून आढळतात. मला त्यांची एक कथा साधारण आठवते. ती मी संक्षिप्तात सांगतो. त्यामुळे तुम्हास कसला ‘ ऐवज ‘ त्या कथा संग्रहात आहे याची कल्पना येइल.

‘ एक तरुण सुंदर स्त्री असते. ती आपल्या नवऱ्याला चकवून एका गुराख्याशी सुत जमवते. हे संबंध जेव्हा नवऱ्याच्या लक्षात येतात तेव्हा तो तिला खडसावून विचारतो. अर्थात ती तो आरोप फेटाळून लावते!

नवरा तिला गावातील त्या पवित्र आणि न्याय देणाऱ्या खांबाला आलिंगन देवून शपथे वर परपुरुषासी संबंध नसल्याचा निर्वाळा देण्यास सांगतो. ती त्याला तयार होते !

गावातल्या त्या ‘न्यायी खांबा’चे असे वैशिष्ट्य असती कि खोटी शपथ घेवून आलिंगन देणारा त्या खांबास चिटकून बसतो ! खरे सांगितल्या शिवाय त्याची सुटका होत नाही. आज वरचा हाच अनुभव असतो !

खांबाच्या आलिंगनाचा दिवस आणि वेळ ठरते. या बये पेक्षा तो गरीब गुराखीच घाबरतो. ती त्या गुराख्यास सांगते मी त्या खांबा कडे निघाले कि तू आसपासच रहा. मी पायात काटा मोडल्याचे नाटक करीन तू पटकन माझा पाय हातात घेवून काटा काढल्या सारखे कर. ठरल्या प्रमाणे प्रचंड गावकऱ्यानच्या समुहात ती खांबा कडे निघते. गुराखी सर्व गावकऱ्यान देखत तिचा पाय हातात घेवून ‘काटा ‘ काढतो . त्यात कुणालाच काही गैर वाटत नाही.

“माझ्या या तरुण ,सुकुमार देहाला फक्त माझे पती आणि तो गुराखी यांनीच हेतूपुरस्सर स्पर्श केलाआहे!या शिवाय जर इतर पुरुषाने हेतू पुरस्सर मला स्पर्श केला असेल तर मी या खांबाला चिटकून बसेन ! खांबा आता कौल द्यावा ! ”
असे म्हणून ती खांबास आलिंगन देते .

खांब क्षणभर थरथरतो ! तिच्या आलिंगनातून आपली सुटका करून घेतो आणि  —  आणि मुळा सकट उखडला जावून आकाशात भिरकावला जातो ! त्याची न्याय करण्याची शक्ती लुळी पडते !

तर अशा बऱ्याच कथाआहेत. ‘ निताम्बे कमलपत्रे झाकिले ‘ सारखी वाक्ये ठाई ठाई आढळतील पण ती कथेच्या ओघात खपून जातात. माझ्या कथा वाचनाच्या आराण्यातल हे रानटी झुडपांच लहानस बेट त्याच्या आगळ्या शैलीने आणि कथांच्या आशयाने कुठे तरी जपलं गेलाय. स्वच्छ दृष्टी ठेवून निखळ करमणूकी साठी काही ऑफ बीट वाचावेसे वाटले तर ट्राय करायला हरकत नाही .

— सु र कुलकर्णी 

तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..