नवीन लेखन...

माय फ्रेंद यू नो हॅव पासपोर्त

दहावी पर्यंत मराठी माध्यम. अलिबागला jsm कॉलेज मध्ये ज्युनियर कॉलेज मध्ये इंग्रजी होते सायन्स घेतल्यामुळे पण त्या इंग्रजीचा जास्त काही उपयोग झाला नाही कारण सगळे मित्र पण मराठी मिडीयम वाले होते त्यामुळे माझ्यासारखी त्यांची पण अवस्था त्यामुळे त्यावेळेला इंग्रजी बोलता येत नाही वगैरे असं काही जाणवलं नाही. K.J. सोमैयाला B.E. मेकॅनिकलच्या F.E. म्हणजे फर्स्ट ईयरला इंग्रजी मुळे चांगलाच तोंडावर आपटलो. इंजिनियरिंग कॉलेज मधील हाय फाय इंग्लिश मुळे पहिल्या सेमीस्टरला आठ पैकी आठ केट्या लागल्या. पुढील सेमीस्टर चे आठ आणि दुसऱ्या सेमीस्टर चे आठ असे एकूण सोळा पेपर एका मागोमाग एक दिले. सोळा पैकी पहिल्या आठ मधल्या चार आणि दुसऱ्या आठ पैकी सात अशा एकूण अकरा केट्या लागल्यामुळे फर्स्ट ईयरला ड्रॉप लागला. पुढे केट्या घेत घेत पाचव्या वर्षी शेवटच्या सेमीस्टर ला पोचलो सातव्या सेमीस्टर पर्यंत प्रत्येक सेमीस्टर ला चालू किंवा मागची केटी असायचीच. आमच्या सोमैया कॉलेजच्या B.E. मेकॅनिकल ब्रांच चा रिझल्ट दरवर्षी 100 % लागायचा. त्यामुळे शेवटच्या सेमीस्टर ला आपल्याला केटी न लागता आपण एकदाचे B.E. होऊन जाऊ आणि कॉलेज ची 100% निकालाची परंपरा कायम ठेवू. सातव्या सेमीस्टर च्या दोन केट्या आणि आठव्याचे पेपर दिले. सातवा सेम चा रिझल्ट लागला तेव्हा त्यात पास झालो. आठव्या सेमीस्टर चा रिझल्ट लागल्यावर तर उडालोच कारण मी मित्राला फोन केला होता रिझल्ट लागला की नाही ते विचारायला. 100% रिझल्ट असलेला कॉलेजचा रेकॉर्ड तुटला होता. 99% रिझल्ट लागला होता असे आणखीन एका मित्राने त्याला फोनवर सांगितले . एकजण एक केटी लागून नापास झाला आहे. असं त्याच्याच कडून समजलं होत. कॉलेजला निघालो आणि येऊन बघतो तर एकमेव केटी लागून नापास होणारा दुर्दैवी मीच होतो. एका विषयात पाच मार्क कमी पडल्यामुळे आणखी सात महिने डिग्री मिळवण्यासाठी उशीर लागला. चार वर्षांची B.E. mech डिग्री साडेपाच की पावणे सहा वर्षात एकदाची मिळवली. आता बायो डाटा वर साहजिकच 2000 साली बारावी नंतर डिग्री चे ईयर 2006 दिसायला लागलं मग इंजिनियर रडत रखडत झाल्याचे स्पष्ट असल्याने सुरवातीला काही दिवस कास्टिंग कंपनीत मग काही महिने काचेचे ग्लास बनवणारी मशीन बनवायच्या कंपनीत. त्यानंतर त्या कंपनीला दोन महिन्यात रामराम ठोकून सुपर मॅक्स ब्लेड कंपनीत आठ महिने काम केले. दोन महिन्यात एका मशीनवर आठ तासात दोन लाखाच्या वर ब्लेड बनवायचा रेकॉर्ड केला. ते पाहून ब्लेड कंपनीत सहा महिन्यात रिसर्च आणि डेवलपमेंट वाल्यांनी नवीन मशीन वर ट्रायल साठी नेमणूक केली. काही दिवसात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मर्चंट नेव्हित B.E. mech वाल्यांसाठी जॉब आहेत अशी जाहिरात पेपर मध्ये वाचली. मोबाईल फोन तेव्हा एवढे स्मार्ट नसल्याने पेपर बघायची सवय होती त्यावेळेस म्हणून ती जाहिरात दिसली. जाहिरात आकर्षक होती युनिफॉर्म, ऍडव्हेंचरस आणि चॅलेंजिंग करियर भरपूर पगार, देश विदेशात फिरायला मिळणार. अशी जाहिरात पाहिली तर खरी पण त्यात एंट्रन्स एक्झाम असल्याचे समजल्यावर बोललो झालं आपण काय इथे दिवे लावणार माहिती आहे. एकतर आपण मराठी मिडीयम मध्ये शिकलेले. त्यात जहाजावरील नोकरीला मर्चन्ट नेव्ही असं नावातच इंग्लिश नोकरी असल्याचा फील. एंट्रन्सला चार वर्षांचा डिग्री मधील सगळ्या विषयावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारणार होते. मला एका सेमिस्टर च्या विषयांचे पुढच्या सेमिस्टर ला नाव लक्षात राहत नव्हते आणि एंट्रन्स ला आठ सेमिस्टर चा अभ्यास असलेला सिल्याबस होता. पण माझा सोमय्याचा बॅच मेट आणि मित्र सुयश कोळी याला फोन केला तो बोलला चल देऊन तर बघू परीक्षा.

परीक्षा दिली सुयश पास झाला आणि मी नेहमी प्रमाणे नापास. पण सुयश चे नातेवाईक जहाजावर काम करत असल्याने त्याने माहिती काढली की शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक भारत सरकार ची कंपनी आहे. अशा अनेक कंपन्या आहेत जिथे इंजिनियर लागतात. त्यांच्या कडून प्री सी ट्रेनिंग साठी स्पॉन्सर शिप लेटर घेऊन कोर्स करायचा. त्यासाठी मग शिपिंग कंपनीचे ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करायला लागलो. त्या ऑफिस मधील इंग्लिश संभाषणे ऐकून आपल्याला कसं काय जमेल बोलायला अशी भीती वाटू लागली. इंजिनियर तर झालो होतो पण इंग्लिश संभाषण करता येत नव्हतं. तुटक आणि फुटकं इंग्लिश ते पण व्याकरणाची ऐशी तैसी करून अडकत अडखळत बोलायचं. शिपिंग कंपनीत गेलो की हात हलवत परत यायचो. एका एजन्ट ने भारतात कोर्स न करता इंग्लंड मध्ये पाठवतो तिकडे कर असे सुचवलं. इथे इंग्रजी बोलता येत नाही आणि कोर्स करायला इंग्लंडला कुठं जाऊ म्हणून त्याचा नाद सोडला. पण बाबा मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशन इन्चार्ज असताना त्यांची एका शिपिंग क्लियरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट सोबत ओळख झालेली होती. त्याच्या ओळखीने मला स्पॉन्सर शिप लेटर मिळाले. प्री सी ट्रेनिंग पण इंग्लिश मध्ये. तिथे पण इंग्लिश बोलण्यावर भर पण मराठी मित्र आणि सुयश तिथे पुन्हा भेटल्यावर डिग्री प्रमाणे इथे पण इंग्लिश बोलायच्या नावाने बोंबाबोंब झाली. आता जहाजावर जाऊन कसं व्हायचे ऑफिस मध्ये एवढं इंग्लिश बोलतात मग जहाजावर किती बोलत असतील असा विचार करून डोकं सुन्न व्हायचे. पासपोर्ट प्री सी, कोर्सेस, मेडिकल, विजा सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून एकदाचा जहाजावर जुनियर इंजिनियर म्हणून पहिल्यांदा पाऊल ठेवले. पहिले जहाज ब्राझील च्या किनारपट्टीवर फिरायचं. जहाजावर सगळे खलाशी आणि अधिकारी भारतीय होते. त्यामुळे कंपनीची आणि संपर्क किंवा जहाजावरील ऑफिशियल भाषा इंग्लिश असली तरी जहाजावर बहुतेक करून हिंदीत बोलायचे सगळे. मराठी म्हणून माने नावाचे मोटरमन आणि जितू नावाचा माझा कॅडेट मित्र मला पहिल्या जहाजावर भेटले. फाड फाड इंग्लिश काही केल्या बोलता येत नव्हतं जेवढं अडत अडखळत येत होत ते पण बोलायला भीती वाटत होती. बोलू की नको बोलू असच वाटायचे. पण हळू हळू ब्राझील मधील बंदरात जहाज गेल्यावर तिथल्या शहरात, पुढील जहाजावर युरोपियन देश आणि रशिया व इस्त्रायल या प्रगत देशातील लोकांना इंग्लिश येत नाही हे बघून नवल वाटायला लागलं. मग लक्षात यायला लागलं आपल्याच भारतात इंग्लिशचे लांगुलचालन केले जातेय तसेच नको तितकं महत्व दिले जातेय. जहाजावर काम करायला लागल्यापासून कित्येक देशात आलेल्या अनुभवावरून काम करायला भाषे पेक्षा तुमच्याकडे असलेले बेसिक नॉलेज, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कॉमन सेन्स जास्त महत्वाचा आहे याची खात्री पटत गेली. ही खात्री पटत असताना इंग्लिश बद्दल असलेला न्यूनगंड आणि भीती हळू हळू करता करता कायमचीच निघून गेली. फ्रान्स मध्ये जहाजावरून घरी येत असताना एजंट जहाजावर घ्यायला आल्यावर त्याने सांगितलं माय फ्रेंद यू गो दाऊन अँद वेत फॉर मी. हे असं बोबडे उच्चार तर आपण लहान मुलांशी आपल्याच मायभाषेत बोलताना काढतो. पण हेच उच्चार आपल्या भारतात इंग्लिश मध्ये मोठ्यांशी बोलताना काढले तर हसतील सगळे.
मराठी मिडीयम असल्याचा मला खरोखर अभिमान वाटतो. बाबांनी इंग्लिश किंवा कॉन्व्हेंटला टाकला असता तर डिग्री करताना केट्या नसत्या लागल्या आणि केट्या नसत्या लागल्या तर चॅलेंजिंग आणि ऍडव्हेंचरस जॉब मिळवायची धडपड नसती करावी लागली हे पण तितकंच खरं.

© प्रथम रामदास म्हात्रे 
मरीन इंजिनियर 
B. E. mech, DIM, 
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..