मुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे जन्मगांव त्यामुळे त्याचे आकर्षण आंम्हाला थोडे कमीच. पर्यटनासाठी महाराष्ट्राबाहेरील एखाद्या राज्याचा विचार करायचा म्ह्टल तर आमच्या नजरे समोर येणार पहिल राज्य म्ह्णजे गोवाच असायच. आंम्ही मित्र बरेच दिवस नाही बरीच वर्षे गोव्याला सहल काढण्यासाठी प्रयत्नशील होतो पण हया ना त्या कारणाने ते शक्य होत नव्हत. माझ्या मनात गोव्याला कोकण रेल्वेने जाण्याच होत कारण रत्नागिरीच्या पुढचा कोकण मी अजून पाहिला नव्हता तो मला पाहायचा होता.
माझ्या आयुष्यात गोव्याला जाण्याचा योग आला पण तो विमानाने. गोवा पाहणे हे माझे स्वप्न होते. पण सध्यातरी विमानप्रवास हे स्वप्न नव्ह्ते कारण आपल्या अवाक्या बाहेरची स्वप्ने विनाकारण पाहण्याची मला सवयच नव्हती. नशिबाने साथ दिल्यामुळे माझे दुसरे स्वप्नही सहज पुरे झाले. विमानाने गोव्याला जाण्याचे समजताच माझ्या पोटात गोळा आला होता. प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात कधी ना कधी पहिल्यांदा घडतच असते. ती गोष्ट घडली की तिची तिव्रता आणि महत्व दोन्ही अचानक कमी होते. आता विमान प्रवास करून आल्यावर मला पटतय की विमान प्रवास करणे म्ह्णजे फार काही कौतुकाची गोष्ट नाही. पण या प्रवासा दरम्यान आलेले अनुभव आणि मी टिपलेली निरीक्षणे माझ्यासाठी फारच मोलाची होती. एरवी मुंबईहून गोव्याला जायला कित्येक तास लागतात पण माझा तोच प्रवास अवघ्या एका तासात पार पडला होता. विमानप्रवास करण्याचे एक तंत्र आहे ते तंत्रही माझ्या लक्षात आले. विमानप्रवासा दरम्यान काय सोबत घ्यावे, काय सोबत घेऊ नये आणि काही सोबत घेतल्यास ते किती आणि कसे घ्यावे या सर्व गोष्टींचे ज्ञानही औगत झाले. चार तारांकीत हॉटेलात राहण्याचा तिथे वागण्या- बोलण्याचा आणि तेथील सुख- सुविधांचा वापर करण्याचा अनुभवही गाठीशी जमा झाला. संपूर्ण गोवा पादाक्रांत केल्यावर माझा या पूर्वीचा पूर्वग्रह दुषित गैरसमजही दूर झाला की गोवा हे पर्यटनस्थळ समुद्रात पोहणार्यांलना, मधिरा पिणार्यांरना आणि जीवाची मुंबई करणारयांसाठीच आवडीचे पर्यटन स्थळ आहे. आमच्या सारख्या र्निव्यसनी आणि शाकाहारी माणसाचे तेथे कामच नाही. पण आता माझा हा गैरसमज कायमचाच दूर झाला आहे.
गोवा विमानतळ ते हॉटेल या दरम्यानच्या एक तासात एसी बसने केलेल्या प्रवासा दरम्यान बसच्या खिडकीतून समुद्र किणारे सोडून जो गोवा दृष्टीस पडला त्याच सौंदर्यही काही कमी नव्हत. गोव्यामधील चार दिवसांच्या वास्तव्यात मधल्या दोन दिवसात जो गोवा मी पाहिला त्यातील समुद्र किणारे वजा करूनही मी जो गोवा पाहिला तो ही मला अतिशय भावला कारण त्यामुळेच मला गोव्यातील नैसर्गिक संपत्तीच खर्याध अर्थाने दर्शन झाले. मला वाटत गोव्याला येणार्याल बहूसंख्य पर्यटकांची गोव्याला समुद्र किणारे वजा करून पाहण्याची इच्छाच नसते. नेमक तेच पाहण्याचा मी प्रयत्न केला. समुद्र किणार्यामवर लोळत पडलेल्या अर्धनग्न स्त्रिया हा काही माझ्यासाठी आकर्षणाचा विषय नव्हता. पण त्यांना मी असभ्य असंस्कृत म्ह्णणार नाही कारण त्यांच्या ठायी मला सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा बराच असल्याचेही लक्षात आले. सभ्यता आणि सुसंस्कृतपणा म्ह्णजे काय ? आपल्या कोणत्याही कृतीचा इतरांना त्रास न होऊ देणे. समुद्र किणार्याकवर फेरफटका मारताना मी त्यांची छायाचित्रेही टिपली त्याबाबत त्यांची काहीच तक्रार नव्हती. कोणाला वाटेल मी माझ्या कॅमेरयात त्यांची अर्धनग्नता बंधिस्त केली. पण तस नाही मी त्यांची त्या वेशातही वावरण्याची सहजता बंधिस्त केली जी मला आपल्या या भारतीय लोकांत दिसत नाही. आपल्या शरिरापेक्षाही आपल्या आवडीनिवडींना अधिक प्राधान्य देण्याची शिकवणच जणू ते आपल्याला देतात. गोव्यात दारूची दुकाने सताड उगडी असतात लोक पाणी पितात तशी दारू पितात की काय अशी शंका मनात निर्माण व्हावी इतकी. पण तरीही माझ्या वास्तव्या दरम्यान मला कोणीही दारू पिऊन रस्त्यात पडलेला, शिवी गाळ करणारा अथवा हाणामारी करणारा एकही दिसला नाही. आपल्या जीवनातील जगण्याचा आनंद घेण्यात मग्न असणारा माणूसच मला अधिक दिसला. समुद्र किणारे सोडले तर बाकी गोवा तसा शांतच म्ह्णावा लागेल. उंच-उंच गगणाला भिडणार्या् इमारती नाहीत, गोधंळ करणार्याह जास्तीच्या गाड्या नाहीत. सगळीकडे छान मनमोहक बंगळे पण तेथील कौलारू घरे ही आजूबाजूच्या निसर्गामुळे आकर्षक दिसतात. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवळ आणि नारळाची झाडे. समुद्र किणार्याावर फेरफटका मारताना एका युक्रेनवरून गोवा पाहण्यासाठी आलेल्या एका सुंदर तरूणीसोबत आंम्ही फोटो काढले. माझ्या सोबत फोटो काढण्यासाठी ती तरूणी किती सहज आणि आनंदाने उभी राहिली होती. हे तिच्यासोबत काढलेला फोटो पाहिल्यावर माझ्या लक्षात आले. तो फोटो पाहतानाही तिच्या अर्धनग्नतेकडे माझे अजिबात लक्ष गेले नाही कारण तिच्या चेहर्या वरील समाधान आणि निरागस हस्यच कोणाचही मन मोहून टाकायला पुरेस होत. त्या उलट विचार करता विमानातील हवाई सुंदरी असणार्या तरूणी दिसायला तिच्यापेक्षाही सुंदर होत्या पण त्यांच्या चेहर्याीवर चढविलेला आनंदाचा मुखवटा मला स्पष्ट दिसत होता कारण लेखक असल्यामुळे प्रत्येक माणसाचा मुखवट्या खालील चेहरा वाचण्याची मला सवयच होती. स्वतः कितीही दुःखी त्रस्त असतानाही इतरांना आनंद देण्यासाठी चेहर्याचवर उसण ह्सू ठेवण सोप्प काम नसत बहूदा त्याबद्द्ल त्यांचे कौतूक करावेच लागेल. नाहीतर आंम्ही आनंदी असताना रागवलेलो असल्याचा साक्षात्कार विनाकारणच कित्येकांना होत असतो. विमानप्रवासा दरम्यान मला एका गोष्टीचे वाईट वाटले येता- जाताना दोन्ही वेळा मला खिडकी जवळ बसता आले नाही. त्यामुळे विमानातून खाली जमिनिवरील दिसणारे मनोरम दृष्य पाहण्याची संधी सध्यातरी हुकली असंच म्ह्णावे लागेल.
गोव्याला जाऊन साधी बिअरही न पिता शाहाकारी जेवन खाऊन सोबत येताना एकही दारूची बाटली न आणणारा मी अपवादाच असेन पण गोव्याचे निसर्ग सौदर्य मी माझ्या कॅमेर्याूत मोठया प्रमाणात साठवून आणले होते. जे फोटो पाहिल्यावर गोव्याला न गेलेल्यांना एकदा गोव्याला जायला हवे असे वाटल्याखेरीज राहणार नाही. गोव्यात दारू सोबतच इतरही बर्या च वस्तू विकत घेण्याजोग्या आहेत. त्यात खाण्याच्या वस्तूंचा समावेश अधिक आहे. मी गोव्याला टी-शर्ट , कोकम सरबत, सुके काजू वगैरे वस्तू विकत घेतल्या. गोव्याच्या सानिध्यात घालविलेले ते चार दिवस माझ्या आयुष्यात मी घालविले अविस्मरणीय दिवसच म्ह्णावे लागतील. गोव्याच्या समुद्रात मी मला पोहता येत नसल्यामुळे फार डुंबलो नाही पण गोव्यातील समुद्रात संगीत- नृत्य याचा आनंद उपभोगत रात्रीच्या समुद्राच आणि रात्रीच्या गोव्याच सौदर्य नजरेत भरत क्रूजवरून मारलेला एक तासाचा फेरफटकाही खूपच आनंदायी होता. मुंबईतील समुद्र किणार्यांरबाबत मला असे आकर्षण कधीच वाटले नाही. मुंबईच्या समुद्र किणार्या वर सहलीसाठी म्ह्णून मी मोजून तीन- चार वेळा गेलो असेन. या सहली दरम्यान मी काही लोकांशी चर्चा केली असता माझ्या असे लक्षात आले की गोव्यात केरळ आणि महाराष्ट्रातील सिधूदूर्ग भागातील लोक रोजगारानिमित्त तेथे वास्तव्यास जात असतात पण तेथे स्थायिक होत नाहीत. गोव्याला मुंबईसारखी मराठी बोलणारे स्थानिक लोक मला दिसली नाहीत पण तशी नसतीलच अस मी खात्रीने म्ह्णू शकणार नाही. गोव्यात आणखी एक गोष्ट मला कचर्याकचे ढिगारे कोठे ही दिसले नाहीत. गोवा बर्या पैकी सुंदर स्वच्छ, मोकळा आणि निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असल्याचे दिसले. गोव्याचा पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय असल्याचे ही स्पष्टपणे जाणवले. गोव्यातील समुद्र किणारे आणि काही पर्यटनस्थळे वगळली तर त्या व्यतिरीक्तही गोव्यात पाहण्यासारखे बरेच काही असणार याची मला खात्री आहे. वेळे अभावी गोव्याचा प्रत्येक कोपरा पाह्णे शक्य नव्ह्ते पण समुद्र किणारी सहलीला जाण्याचे ठरलेच तर गोवा मला पुन्हा- पुन्हा नव्याने पाहायला आवडेल हे नक्की.
— निलेश बामणे
Leave a Reply