मारल्या मोठ्या मोठ्या बाता
मतदार राजा भुलला भुलला
भारतिय जनता पक्ष म्हणाला “मै यु करूंगा,त्यू करूंगा”
ओढली साऱ्याच पक्षांनी याचीच री…
फरक थोड्या दोन-चार शब्दांचा
“भुतो न भविष्यती”
ऐसा काहीसा चमत्कार झाला
वाघावर स्वार व्हायला कमळ राजी झाला
“काय तुझ्या मनात,सांग माझ्या कानात”
गुज-गोष्टीचा डाव नाहीच रंगला
फिफ्टी -फिफ्टीचा मामला नाही कुणास रुचला
एकमेकांवर कुरघोडी करतांना कर्तव्याची भाषा विसरला
“अशी ही बनवाबनवी”
टेलीफिल्म बनवू लागला
नेत्यांचे पक्ष,पक्षांचं राजकारण,त्यातला मतदार पिंजऱ्यातला पक्षी झाला
हसावं की रडावं हेच त्याला कळेना
भरवशाचा आहे कोण?ह्याचं उत्तर सापडेना
हक्कासाठी फडफड चाले दिन रात
केविलवाणा दाता बुडतोय कर्जात
“मतदानाचा हक्क बजावणे”
“जणू लष्कराच्या भाकऱ्या भाजणे”
असला पोरखेळ नको रे बाबा
थेरं तुमचे पुरे झाले
“घर का ना घाटका”
असे वागवून राजकारणी मुढांनो
लोकशाहीचे वस्त्रहरण थोपवण्या
निश्चित जन्मणार द्वारकेचा द्वारकाधिश रे
— सौ. माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply