न कळे जोवर
वाहून जाती पाणी
न कळे तोवर
घाव घालती वाणी
कधी शिकणार न कळे
हा प्रश्न मनुष्य प्राणी
लोभ नुसता हव्यास तो मग
प्रारब्ध गिळते नाणी….
अर्थ:
न कळे जोवर, वाहून जाती पाणी
(एखादी गोष्ट चुकीची आहे हे ती घडून गेल्यावर समजते पण तेव्हा उशीर झालेला असतो.)
न कळे तोवर, घाव घालती वाणी
(रागाच्या भरात चुकीचे शब्द बाहेर पडतात पण नंतर ते घाव भरून काढता येत नाहीत.)
कधी शिकणार न कळे, हा प्रश्न मनुष्य प्राणी
(चांगल आणि योग्य काय हे माणसाला कधी कळणार?)
लोभ नुसता हव्यास तो मग, प्रारब्ध गिळते नाणी….
(पैसा कमावण्याच्या नादात माणूस आपलं नशीब ही पणाला लावतोच, पण शेवटी पैसे कमावून नशीब कमावता येत नाही.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply