पिंक . अलीकडेच प्रदर्शित झालेला हिन्दी सिनेमा . दाहक वास्तवावर आधारित तितकाच वास्तव सिनेमा . आपण व्यक्ति म्हणून , समाज म्हणून जर असन्वेदनशील झालो तर एक संवेदनशील विषय किती ज्वलंत बनू शकतो , नव्हेबनलाच आहे , याचा आरसा म्हणजे हा सिनेमा . करमणूक म्हणून जायचे असेल तर या सिनेमाला जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असा हा सिनेमा . पण आपल्या आयुष्यात एक व्यक्ति म्हणून , एक समाजाचा घटक म्हणून , एकवडील म्हणून , एक मित्र म्हणून , एक मैत्रीण म्हणून , एक समाज – धुरीण म्हणून , एक सहकारी म्हणून कसे वागतो आणि कसे वागले पाहिजे याबाबत एकदम झनझनित अंजन घालणारा असाच हा सिनेमा आहे . एकदम अस्वस्थ करणारा .
त्यासाठी या सिनेमाच्या निर्मितीशी संबंधीत सर्वांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे . पण निव्वळ अभिनंदन करून आपल्या सगळ्यांच्याच नेहमीच्या सवयीने सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाहीच .
हा सिनेमा पाहिल्यापासून माझ्या मनात एकच विचार सतत येत आहे कि सभ्यतेच्या साऱ्या गोष्टी आज अशा पध्दतीने परत एकदा तपासून घेण्याची आज वेळ आली आहे . जर आपल्या लेकी- सुनान्बाबत आपण इतके नादान पणे वागणारअसू , तर आपल्यात आणि ” लड़के है , जवानी में तो ऐसा एखाद बर्ताव हो जाता है ” असं म्हणणारया आपल्या देशातील एका राजकीय नेत्यांत आणि तशा मनोव्रुत्तीच्या इतरांत काय फरक राहिला ?
असा फरक राहिला पाहीजे आणि तो प्रकर्षाने सतत जाणवत राहिला पाहीजे असं अगदी मनापासून वाटणार्या सर्वानी हा सिनेमा पाहिलाच पाहिजे . आणि त्याचबरोबर या सिनेमातील तीन तरूण मुलिन्वर जो प्रसंग येतो , तसा प्रसंगकोणावरही येणार नाही याचीही व्यवस्था आपण सगळेच मिळून कार्यरत ठेवणे आवश्यक आहे . ( नुसती सुरू करणे नाही ; सुरू ठेवणे अत्यावश्यक . )
अर्थात असा विचार , असा व्यवहार केवळ या सिनेमातील घटने बाबत नाही तर आपल्या आयुष्याच्या अनेक पैलूंबाबत करण्याची वेळ आली आहे . आपला देश आर्थिक महासत्ता बनेल किंवा बनणार नाही . पण आर्थिक महासत्ता होणे हाकाही सर्व व्यथा दूर करणारा सार्वकालिक रामबाण उपाय नाही . एकीकडे सांस्कृतिक सम्रुध्धीच्या परंपरेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे एक देश म्हणून Human Development Index मधे जागतिक क्रमवारीत खालच्या पातळीवरअसायचे हे एक देश म्हणून शरमेचीच बाब आहे . अर्थात त्यासाठी फक्त सरकारला दोषी मानने सर्वथैव गैर आहे .
मग याबाबतीत कसे वागावे लागेल याचे आदर्श उदाहरण म्हणजे ” PINK ” सिनेमातील अमिताभ बच्चन यांनी रंगवलेली दीपक सेहगल ही व्यक्तिरेखा . आपल्या अवती – भवती घडणाऱ्या घटनांची नोंद कशी घेतली पाहिजे , संबंधितव्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात गैरवाजवी ढवळाढवळ न करता त्यांना कसे सहाय्यकारी झाले पाहिजे , तटस्थता आणि समरसता यात संतुलन कसे राखले पाहीजे , त्याचवेळी असॆ सामाजिक आयुष्य आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलजबाबदार्या यांचा तोल कसा सांभाळत राहीले पाहीजे , कायद्यासमोर दोषी व्यक्तींना उघडे पाडत असतानाच एकंदरीतच प्रचलित पध्दतीत कसे – काय – का बदल झाले पाहिजेत याचे दिशा – दिग्दर्शन करणे ( मग ते या सिनेमा प्रमाणेतिरकस , खोचक , कुचकट पणे ही का असेना ) याचे काळानुसार , प्रसन्गानुरूप , स्थितिसापेक्ष असॆ हे उत्कृष्ट उदाहरण आहे .
या अर्थाने या सिनेमाच्या शेवटी तीन मुलिन्चा वकील म्हणून खटल्यातील Closing Remarks म्हणून अमिताभ बच्चन यांच्या तोंडी जो संवाद आहे तो फार महत्वाचा आहे . तो संवाद असा ” No Means No . No हा केवळ एक शब्दनाहि . नाहीच . ते ऐक संपूर्ण वाक्य आहे . त्याला आणखी वेगळ्या व्याख्येची , माहितीची , स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही . ”
तसे या आशयाचे मुद्दे कायद्याचा अभ्यास करतांना शिकवले जातात . विशेषतः Criminal LAW शिकताना . वाढत्या वैयक्तिक वयात , आयुष्यात त्याचे नानाविध पैलू लक्षात येत राहतात .
अगदी गुंतवणूक क्षेत्राबाबत ही .
तसेही या सिनेमाचे नाव ” पिंक ” आणि गुंतवणूक क्षेत्राविषयी जास्त विस्ताराने देणाऱ्या आर्थिक नियतकालिकांना म्हणतात ” पिंक पेपर्स ” .
असो .
आणि मग तसा विचार करत असताना गुंतवणूक आणि हा सिनेमा यांची सांगड घालणारे काही मुद्दे मनात उमटू , उमलू लागले .
यातला पहिला पैलू म्हणजे NO MEANS NO हे वाक्य . आपल्या गुंतवणूकीचे तंत्र आणि मंत्र मनात घोटवत असताना आपण मोहाला , लोभाला , पुर्वग्रहाना हे म्हणतो का ? कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्या गुंतवणूकीच्यासातत्याला तात्पुरतीही सोडचिठ्ठी देण्यास पुरेशा क्रुतिशील ठामपणे NO MEANS NO म्हणायला शिकणार् ना ?
यालाही काही वेगळे स्पष्टीकरण देण्याची थोडीही आवश्यकता नाही .
याचा असाच ऐक पैलू म्हणजे गुंतवणूक ही सदासर्वकाळ सर्वान्चीच गरज असते . महिला आणि अल्पवयीन यान्च्याबाबत तर असतेच असते . हल्लीच्या काळात महिला त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीबाबत ही खबरदारी , जबाबदारी , काळजीस्वतःच घेउ शकतात . जिथे ही परिस्थिती नसेल तिथे ही भूमिका घरातील इतरांनी निष्ठापूर्वक , नेकिने पार पाडली पाहिजे . घरातील अल्पवयीन व्यकिन्बाबत तर ही गोष्ट घडलीच पाहिजे . जिथे हे होत नसेल तिथे हे त्यांच्या परिचितानीस्वयन्स्फुर्तिने केले पाहिजे . निदान त्याची आवश्यकता आणि प्रक्रिया लक्षात आणून तरी दिली पाहिजे . कारण त्याबाबतची माहिती सर्वाना च असतेच असॆ नाही . आणि अगदी असली तरी काहीवेळा परिस्थितीच्या रेटयात ते सुचतेच असॆनाही . जसे या सिनेमात तीन मुलिन्बाबत अमिताभ बच्चन एक वकील म्हणून करतो . हा संदर्भ केवळ ध्वन्यार्थाने नाही तर सर्वार्थाने लक्षात घेतले कि या सिनेमातील एक संवाद ( जी कायदेशीर तरतूद आहे ) आहे कि ” Non – Bailable Warrant असले तरी महिला आणि बालकांना bail मिळतो , मिळू शकतो .” मात्र ही प्रक्रिया योग्य तर्हेने आणि वेळीच सुरू करावी लागते . कारण यातूनच त्यांची निर्भरता निर्माण होत असते . हे आर्थिक , भावनिक , सामाजिक आशाअनेक छ्टांनी खरे आहे .
पिंक हा सिनेमा आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना मला जाणवलेला तिसरा पैलूं म्हणजे या दोन्ही गोष्टींचा एक समान संदेश हा आहे कि जर आपण बरोबर असू , निर्दोष असू तर आजूबाजूच्यानी , ज्यांचा तुमच्या परिस्थितीशीएरवी काहीही संबध नाही , केलेल्या टिप्पणीकडे फार लक्ष देण्याची जरासुध्धा आवश्यकता नाहि . त्यामुळे विचलित होण्याची तर बिलकूल गरज नाही . उलट त्यामुळे स्वतःच्या मनाशी स्वतःच्या मताची , तत्वान्ची , आचरणची तपासणी ,उजळणी करून घ्यावी . या सिनेमात ऐक प्रसंग आहे ज्यात अमिताभ बच्चन तापसी पन्नू च्या overcoat चे hood तिच्या डोक्यावरून काढतो . ते दोघं मॉर्निंग वॉक ला गेलेले असतात . ती नेहमीच्या प्रमाणे चालत असते . तिला पाहून “अरे ही तर ती कोर्ट केस वाली ” असॆ एक जण म्हणतो . ते ऐकून सिनेमातील मिनल अरोरा ( तापसी पन्नों ) पटकन हुड डोक्यावर घेतें . अमिताभ बच्चन तें पटकन तिच्या डोक्यावरुन काढतात . हे अनेक अर्थांनी महत्वाचे आहे . निर्दोषव्यक्तीचा स्वाभिमान – आत्म सन्मान म्हणून तर ते महत्वाचे आहेच , पण तितकेच ते कार्यपद्धतीचे निर्देशक आहे . सातत्याने केलेली गुंतवणूक विपरीत परिस्थितीत तुमच्यावर छत्र धरते आणि त्यामुळे सामाजिक टीका – टिप्पणी पासूनस्वतःला लपवण्याची वेळ येत नाही .
या सिनेमात न्यायाधीश महाराजांचे नाव ” सत्यजित दत्त ” आहे हेही यासंदर्भात काहीवेळा अतिशय सूचक वाटायला लागते .
पिंक हा सिनेमा पाहताना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या सिनेमात अन्द्रिया या भूमिकेतून तिने केलेले एक वक्तव्य . ती कोर्टात सांगते कि ” पुर्वान्चल ( North – East ) मधील मुलींबद्दल निष्कारण वेगळ्या आणि वाईट नजरेनेपाहिले जाते . ” गेल्या काही काळात दिल्लीत त्यांच्या बाबत ज्या घटना घडत आहेत त्या हीच गोष्ट सिध्द करत आहेत . काही वर्षांपूर्वी आलेल्या शाहरुखखानच्या ” चक दे इंडिया ” मधे हॉटेल मधे घडणाऱ्या प्रसंगातही याची झलक होतीचकी ! अशा मुळे त्या निरागस व्यक्तींच्या मनात आपण काय प्रतिमा निर्माण करत असतो ! गेली सहा वर्षे ऑफीस टूर मुळे माझे अनेकदा पुर्वान्चल मधे जाणे होत असते . तेन्व्हाही हे मला प्रकर्षाने जाणवत असते . त्या सात राज्यांच्यावाढत्या विकासाचा भार प्रामुख्याने तिथल्या महिला वाहात असतात हे प्रत्येकाने सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे . मोजक्याच उठवळ , उच्रुन्खल , नादान , हलकट माणसांमुळे संपूर्ण सज्जन सरळमार्गी समाजाला वेठीस धरण कधीचयोग्य नाहि . हा केवळ त्या भूभागातील मुलींना भेडसावत असलेला प्रश्न नाही . हा आपल्या संपूर्ण देशाच्या चारित्र्याचा प्रश्न आहे . विदेशी पर्यटकांना येणारा काहीवेळा अनुभव हा याच मालिकेतील कडी आहे . याला पायबन्द जसाकायद्याने बसेल , तसाच आणि तितकाच आपल्या सगळ्यांच्याच सततच्या सतर्कतेतून बसेल . अशीच संवेदनशीलता काश्मिर बाबतही हवी हे ओघानेच आले .
हा प्रश्न जसा सामाजिक आहे आणि असतो ; तसाच आणि तितकाच आर्थिक , राजकीय ही असतो हे लक्षात घेतले कि त्याची आपल्या गुंतवणूकीच्या धोरणाबाबतीत असणारी समर्पकता वेगळी सांगण्याची आवश्यकता उरत नाही .
अशा अनेक अर्थांनी , अनेक क्षेत्रात , अनेकदा . . . .
No MEANS No .
— चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-Mail . . . tilakc@nsdl.co.in
२३ सप्टेंबर २०१६
( गुंतवणूक तुमची माझी ; भाग तेरावा )
Leave a Reply