ईश्वर आहे नामांत परि, नाम कुणाचे घेता?
विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां ।।
असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान ।
कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण ।।
आठवणीतच तो लपला आहे, दिसत नाही कुणा ।
रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना ।।
रंग रूप आणि आकार देणे, असते सोई साठी ।
एकाग्र करण्या चंचल चित्ता, सारे कामी येती ।।
निर्गुण निराकार भासतो, एकाग्र होता चित्त ।
नाम मार्ग हे लय आणूनी, हेच असते साधीत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
Leave a Reply