पंधरा दिवसांपूर्वी एक केरळी ख्रिश्चन जोडपं मला भेटायला आलं होते. निमित्त होतं त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीची जन्म पत्रिका पाहाणं..!
आता अशा या उच्चभ्रू लोकांनी, त्यातही परधर्मीय, जन्मकुंडली पाहण्यासाठी माझ्याकडे का यावं असा पुरोगामी प्रश्न कुणालाही पडण्यासारखा.
वय वर्ष १२ची त्यांची ती मुलगी अत्यंत हुशार. सीबीएसई शाळेत शिकणारी टाॅपर. अशा प्रकारच्या शाळेत शिकणाऱ्या कोणत्याही मुलाप्रमाणेच पण जराशी जास्त चुणचणीत, हजरजबाबी व ख्रिश्चन असल्याने जन्मत:च साहेबी संस्कार झालेले असल्याने माझ्या देशी नजरेला जरा जास्तच स्मार्ट दिसणारी. आई-वडील दोघंही १०० टक्के साक्षर असलेल्या प्रांतातून असल्याने उच्चशिक्षीत व नोकरीत उच्चपदस्थ..
झालं असं होतं, की या १२ वर्षाच्या त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या मनात आई-बापाबद्दल अचानक प्रचंड द्वेष भरला गेला. अक्षरक्ष: एका रात्रीत तिच्यात हा बदल घडला होता. द्वेष इतका पराकेटीचा होता की ती त्यांच्यासोबत जेवायलाही तयार नसते. तीचं जेवण काढून ठेवा असं सांगते. सर्व चवकशी करूण झाल्या. तिचं शाळेत कुणाशी बिनसलंस का, रस्त्यात, बसमधे तिच्यासोबत काही विपरीत घडलंय का वैगेरे चवकशी झाली. मग डाॅक्टर, मानसोपचार तज्ञ, काउन्सिलींग वैगेरे सर्व सर्व झालं. अभ्यासाचा ताण असावा म्हणून सीबीएसई बोर्डातून काढून राज्य बोर्डाच्या शाळेत घातलं गेलं. उपाय केले की काही दिवस सुधारणा दिलायची परत काही दिवसानी पहीले पाढे पंचावन्न..! मग घरातून निघून बाहेर जायचं व संध्याकाळी परत यायचं असे प्रकार सुरू झाले व पाळी एवढी आली की वडीलांनी नोकरी सोडून तिच्यासाठी घरी राहायचा निर्णय घेतला व ते सहा महिन्यांपासून घरीच आहेत.
वडील घरी राहील्यावर लक्षात आलं की ती आईपेऱ्क्षा वडीलांचा जास्त द्वेष करतेय..काही दिवस घरी राहील्यानंतर वडील घराबाहेर परंतू घरावर लक्ष राहील असे भटकू लागले. फार विचित्र व वेदनादायक असते अशी परिस्थीती..सर्व उपाय थकल्यावर मग ते कुंडलीत काही उपाय दिसतो का ते पाहायला माझ्याकडे आले होते.
आता परिक्षा माझी होती. माझ्या २३ वर्षांच्या प्रॅक्टीसमधे अशी केस पहील्यांदाच येत होती. काय
सांगावं हे मलाही कळेना. प्राॅब्लेमच विचित्र होता. कुंडली बारकाईने पाहील्यावर अक क्लू मिळाला असं वाटलं व म्हटलं बघू दगड मारून व मी त्यांना त्या क्लूच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारला आणि पुढचं त्यांनीच धडाधडा सांगीतलं..
प्राॅब्लेम घरातलाच होता. घरच्या वातावरणाचा होता. आई-बाप, इतर जवळचे मातेनाईक यांच्यातील कडू-गोड संबंधाचा होता. हे सर्व फॅक्टर्स त्या विलक्षण हुशार परंतू संवेदनशील, कोवळ्या मुलीवर नकळत परिणाम करत होते..मग पुढचं काऊन्सिलिंग अगदीच सोप्प होतं..नवरा-बायको व आई-वडील ह्या एकच व्यक्ती असल्या तरी त्या त्या नात्यांनुसार भुमिका वेगवेगळ्या नेळी वेगवेगळ्या असतात व त्या त्या वेळेवर तसं वागायचं असतं हा सर्वांनाच माहीत असलेला उपाय त्यांना करून बघा असं सांगीतलं..
पुढे काय झालं माहीत नाही. पंधरा दिवस झालेत. अर्थात त्या मुलीला बाहेर येण्यास बराच मोठा कालावधी लागणार याची कल्पना त्यांना दिली होती..बघू, काय घडतं ते..!!
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply