पृथ्वीचा जन्म झालं.त्यानंतर पृथ्वीतलावर हळूहळू सृष्टी निर्माण झाली. पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू वनस्पती यांची निर्मिती झाली.वेगवेगळ्या जीवांमध्ये मानव प्राण्याची निर्मिती झाली.मानव प्राणी हळूहळू विकसित होत राहीला. कदाचीत पूर्वी चार पायांवर चालणारा माणूस उत्क्रांत होत होत दोन पायावर चालू लागला. इतर प्राण्यापेक्षा मानावाचा मेंदूही जास्त विकसीत होत राहीला.निसर्गाच्या नियमाप्रमाणे बिनकामाचे अवयव नाहीसे झाले.
पूर्वी कदाचीत एकटे एकटे राहणारे जीव पुढं चालून समुहाने राहायाला लागले.त्यात मानव सगळ्यात पुढे होता.मानवाला समुहाने राहण्याचे फायदे कळाले असतील.या जगात सगळ्यात अगोदर आई मुलांचे नाते निर्माण झाले असावे.हजारो वर्षापूर्वी स्त्री पुरुष हे फक्त इतर प्राण्यासारखे शारिरीक भूक भागविण्यासाठी एकत्र आले असतील.मानव उत्क्रांतीच्या काळात ‘माझं तूझं ‘अशी मालकी हक्काची कुठलीचं कल्पना त्यांना नव्हती.ही ‘माझी तूझी ‘कल्पना आगदी आलीकडची असावी.
हळूहळू नाते निर्माण होत गेले.कदाचीत मित्र मैत्रिन, नवरा बायको,आई बाबा,भाऊ बहिन,भाऊ भाऊ,काका काकू,आत्या,मावशी,सासू सून,सासू सासरे अशी नात्यांची एक रांघचं निर्माण झाली.मग हे नाते जसे निर्माण झाले तसे तसे ते घट्ट होत गेले.या नात्यात जिव्हाळा आलं,प्रेम आलं. त्यात प्रेमाचा ओलावा निर्माण झालं.ओलाव्याचं रुपांतर झऱ्यात झालं व ते प्रेम पुढं हळूहळू सर्वनात्यात प्रवाहित होत राहीलं.ते आज पर्यंत टिकून आहे असे वाटते;पण समाजात घडणाऱ्या घटना पाहिल्या की नातं शिल्लक आहे का ? असा प्रश्न सर्वांनाच पडतोय.
पूर्वी नवरा बायको,आईबाबा,भाऊ बहिन व इतर सर्व नात्यांत विश्वास होतं.श्वास आणि विश्वास यांना सर्वजण जानत होते व मानतही होते.विश्वासावर दोन मित्र चालायचे,चालायचे घर, चालायचं गाव,चालायचं सर्व जग.
आज विश्वास कुठं गेलाय?कोणत्या गावाला गेलाय ? हे कोणालाही माहित नाही.श्वास आणि विश्वास याचं महत्व आता कोणालाही उरलेलं नाही.त्याचं महत्वही राहीलेलं नाही.आई बापावर विश्वास ठेवत नाही व बाप आई वर.जमाना लईबदलत चाललाय दोष कोणाला देणार?
आता प्रश्न असा पडतोय की या अविश्वासामुळे समाजात नातं टिकतं की नाही.आज आपण समाजात पहातोय की बायको नवऱ्याचं खून करतेय.नवरा बायकोचं मुडदा पाडतोय.आई आणि मुलगा मिळून घरातीत कारभारीला संपवतात.सखी बहिन सख्या भावाला यमाकडे पाठवते तर सखा भाऊ बहिनीचे हजारो तुकडे करूण फेकतो.
समाजात आज नातं राहीलय का?आज घराघरात, शेजाऱ्या शेजाऱ्यात,जाती जातीत,गावागावात,राज्या राज्यात व देशा देशात अविश्वासचं वातावरण निर्माण झालेलं आहे.याच मुळ कारण आहे नातं.आज नातं नातं राहीले नाही.नातं जपण्यास कोणीही तयार नाही.पूर्वीच्या काळी एकमेकांवर प्रेम करणारी जोडपं नव्हती का ?आगदी रामायण महाभारतापासून आपण प्रेमकहाण्या वाचत आलोय. तेथे एखादी अपवाद वगळता एखाद्या प्रेमवीराने प्रियसीचे तुकडे तुकडे केलेले आपण ऐकलेले नाही,वाचलेलं नाही. आज बघा समाजात काय घडतय ते.
समाजात आज जे काही घडतंय ते पाहून समाजातील चांगल्या विचाराच्या संस्कारीत मनाला खूप वाईट वाटतय.अन वाटतंय आज नातं खरचं उरलय का?या बधीर मनाच्या समाजला माध्यमात आपण जे वाचतोय,जे पहातोय,जे ऐकतोय त्या सर्वांनमुळे काही वाईट वाटत नाही.आता प्रेम हे प्रेम राहीलेल नाही.आता उतावीळ प्रेम आलय.पूर्वी प्रेम अंतकरणात होतं.प्रत्येकांच्या काळजात होतं.आता ते प्रेम आलयं ओठावर.ते प्रेम आलय हाताच्या हालवण्यावर.ते प्रेम आलय डोळ्याच्या खुणावणीवर.हातवारे व डोळ्याच्या खुणावणीवर प्रेम चाळे चालतात .ते प्रेम नसतेच. पण खुळी मुल मुली त्याला प्रेम समजून पुढे स्वतःच्या स्वप्नाचे व शरीराचे तुकडे करून घेतात. मग सांगा पूर्वीचे जे नाते संबंध होते ते राहीलेत का? विचारा राव आपआपल्या मनाला.
मानवजातीची भौतिक प्रगती झाली.पापाचा बाप पैसा जवळ आला.सर्वांना कळायला लागलं पैसा असेल तर सर्व काही मिळते.आई बाबा सोडून पैशाने सर्व काही विकत घेता येते.मग नातं जापायचं कशाला?नात्याची गरजच काय ?
पैशामुळे चंगळवाद आलं.या चंगळवादामुळे समाजातील नातेसंबंध लयास जाऊ लागले.आज मुलगा बापाचं ऐकत नाही.मुलगी आईचं ऐकत नाही.आई बाबा मुलांमुलींच ऐकत नाही.नवरा बायको एकमेकाला जुमानत नाही.कधी प्रियकर प्रियसीचे तुकडे करतो तर कधी प्रियसी प्रियकराचे तुकडे करत आहे. संपत्तीसाठी मुलगा आई बाबाचं खून करतोय तर भाऊ भावाला संपतोय. हे सगळं घडतय नातं न जोपासल्यामुळे.
नात्याला जी ओहटी आलेली आहे ती कमी करण्यासाठी खरंतर घराघरातील आईबाबांनी खास प्रयत्न केले पाहिजेत.शाळेत आपल्या पाल्यांना उद्योगशिल व कृतीशील शिक्षण देण्याबरोबर घरातील, शेजारील, गावातील व्यक्तिसोबत कसे वागावे याचं संस्कार करणारे शिक्षण देणेही आवश्यक आहे.हे शिक्षण बालवयातच देणे गरजेचे आहे.पूर्वी एकत्र कुटूम्ब पद्धती होती.त्यात आजी आजोबा काका काकूकडून चांगल्या संस्काराचे धडे नकळत गिरवले जायचे ;पण आज ‘हम दो हमारा एक’ ही संस्कृती वाढीस लागली आहे.
आज आजी आजोबा हे गोष्टीच्या पुस्तकात लपून बसलेले आहेत.ते आता कुटूम्बात सापडत नाहीत तर ते गोष्टीच्या पुस्तकांत सापडतात.दोघंही नवरा बायको आजकाल कमाई करण्याच्या नादात कोवळ्या जिवाला कोणाच्यातरी हवाली करतात.मुलं मुली जेव्हा घरी एकटीच असतात तेव्हा ते चालू जमाण्यातील टिव्हीवर, मोबाईलवर काय पहावे काय पाहू नये याचं तारतम्य ते जपत नाहीत. ते काय पहातात हे कोणालाही कळत नाही.कोणी जाणुन घेण्याचं प्रयत्नही करत नाहीत.कारण आधुनिक आई बाबाना वेळ कुठं असतोय. त्यांना फक्त पैसा हवा असतोय.मग मुल जे पाहू नये ते पहातात व ते पाहून ते सैराट होतात मग त्याच्यासाठी तेथे नातेगोते उरत नाही.जेथे नाते उरत नाही तेथे प्रत्यक्ष एखादया जीवलग जीवाचे तुकडे तुकडे करुन जंगलात ,समुद्रात,नदीत फेकले जातात सर्व नातं विसरून.
–राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड _६
९९२२६५२४०७ .
Leave a Reply