वात्सल्य, प्रीत, लळा, जिव्हाळा
या भावनांचे आज अर्थ बदललेले
उरि न उरली माया ममता ममत्व
ओढ, आस्था आपलेपण विरलेले
निर्जीवी, पोकळ ते भावबंध सारे
नातेच रक्ताचे, मृगजळी तरंगलेले
इथे कुणीच कुणाचे कधीच नसती
सत्य विदारक जगी पचनी पडलेले
स्वसुखात जगणे उलघाल स्पंदनी
स्वास्थ्य सारे मनामनांचे हरविलेले
कलियुगाची रिती, स्वार्थी विकारी
नात्यातील, प्रेमच सर्वत्र मालवलेले
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २९३
१६/११/२०२२
Leave a Reply