नवीन लेखन...

नैवेद्य भाग ३

प्रत्येक देवाचा नैवेद्य वेगळा !
ज्याचे जे वैशिष्ट्य तसा त्याचा नैवेद्य !
जसे, गणपतीला तूप आणि मोदक.
मोदकच का ?
मोदकाचे सारण गुळ आणि खोबरे.
गुळ आणि खोबरे आणि त्यावर साजूक तूप हा उत्तम बुद्धीवर्धक योग आहे.

गुळामुळे रक्तपेशी वाढायलाही मदत होते. सर्वात पहिला रस धातु तयार होण्यासाठी, गेलेला थकवा लगेचच परत मिळवण्यासाठी, गुळ मदत करतो.
रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये, प्रवासामुळे आलेला थकवा नाहीसा व्हावा, म्हणून एकेकाळी आपल्याकडे गुळपाणी द्यायची पद्धत होती. (आजकाल पाहुण्यांच्या समोर विषाने भरलेली काळ्या कोल्ड्रिंक ? ची ठंडा बाटली आदळली जाते. )

अर्थात गुळ सेंद्रीय पद्धतीने बनवला गेला पाहिजे. आणि ऊस देखील रासायनिक खतांचा वापर न करता पिकवला गेला पाहिजे. तरच त्याचे अपेक्षित औषधी गुण दिसतील नाहीतर, गुण नको पण दुष्परिणाम आवर असे म्हणण्याची वेळ आज आली आहे.

जसे पाण्याला जीवन असे म्हटले आहे. पण शुद्ध स्वरूपात असेल तर शिशाच्या किंवा गंजलेल्या टाकीतील पाणी, शिळे पाणी, क्लोरीनयुकत पाणी, सतत झाकून ठेवलेले पाणी हे जीवन कसे ठरेल ?
असो. !

खोबरं म्हणजे नारळ.
याबद्दल अपशब्द बोलायचे कामच नाही. उत्तम स्नेह, उत्तम केश्य म्हणजे केसांचे पोषण करणारा, उत्तम मल विबंधनाशक, उत्तम तर्पक म्हणजे , रसधातूचे पोषण करणारा, कठीण कवचातला असल्याने कॅल्शियम सारखे घटक वाढवणारा, पचनाला मदत करणारा…………… श्री सत्यनारायणाची कशी सहस्त्रनामे आहेत, तशी या नारळाची देखील, गुणावरून, कर्मावरून, शंभर नावे सहज करता येतील, कोणत्याही नावानी हाक मारा, तो पावणारच.

त्याच्या पर्यायी नावात,
स्वभिषक् म्हणजे स्वयंघोषित किंवा स्वतःचा स्वतः जणुकाही डाॅक्टर. (बोगस नव्हे )
चिकित्सकारी म्हणजे चिकित्सक
लोकांचा अरी. ( याचे नित्य सेवन केले असता, चिकित्सक लोकांकडे चिकित्सेसाठी जावे न लागल्यामुळे, यांच्या पोटापाण्यावर पाय आणणारा )
डाॅक्टरशत्रु म्हणजे डाॅक्टरांचा जणुकाही शत्रुच ! ( याचे नित्य सेवन केले असता डाॅक्टरकडे जायची वेळच येत नाही, म्हणून डॉक्टर मंडळींचा शत्रु, म्हणून बहुधा अजिबात खाऊ नका, असा सल्ला देऊ लागलेत…..)
वैद्यमित्र – रोग होऊ नये म्हणून, आणि झालेला रोग दूर व्हावा यासाठी धडपडणाऱ्या वैद्यांचा मित्र.
अशी काही नावे तयार करता येतील. (पुलदेशपांडे जर कदाचित वैद्य असते तर त्यांनी अशी कल्पवृक्षफल शतनामावली तयार केली असती.)

असा हा बुद्धीदात्या गणरायाचा बुद्धीदाता नैवेद्य. हाच नारळाचा नैवेद्य आमच्या बजरंगबलींना पण प्रिय आहे. कारण जसा हा बुद्धीदाता आहे, तसाच शक्तीदाता पण आहे.

ज्याने निर्माण केले, त्याचे त्यालाच परत करायचे आणि त्याचा सूक्ष्म सारभाग आपल्याला घ्यायचा. हा नैवेद्य दाखवण्यामागील मुख्य हेतु.

ज्याच्याकडे जे आहे, ज्याच्याकडे ते मागीतले की लगेच मिळते, अश्या देवतांकडून जर शक्ती आणि बुद्धी मागितली तर त्या देवतांकडची शक्ती आणि बुद्धी संपूनच जाईल ना ! म्हणून भक्तीमार्गी लोक गणपतीला, हनुमंतांना स्थूल रूपात नारळ अर्पण करतात, आणि सूक्ष्मप्रसाद रूपात बाप्पा तो शक्ती बुद्धीच्या रूपात परत करतात. आणि आपणच तो तो स्थूलातून खातो.
हा माझ्यासारख्या भोळ्याभाबड्या भक्तांचा भाव.

हीच श्रद्धा. हीच भक्ती.
नैवेद्य दाखवताना मला उमजलेली !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
09.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..