नवीन लेखन...

नैवेद्य भाग ६

नैवेद्य दाखवण्यापूर्वी पानाच्या खाली पाण्याचे चौकोनी मंडल काढले जाते. पूर्वी जेवणासाठी केळीची पाने अथवा पानाच्या पत्रावळी वापरल्या जात असत.

जेवायला सुरवात केल्यावर पान हलू नये, यासाठी कदाचित हे पाण्याचे मंडल असेल.
जमिनीवर असलेले सूक्ष्म जीवजंतु ताटाखालून वर येऊ नयेत म्हणून पानाखाली पाण्याचे मंडल. जणु काही मिनी सारवणे

आता सारवणे म्हणजे काय असा प्रश्न पुढची पिढी विचारेल.
गाईचे शेण पाण्यात कालवून, हाताने जमिनीवर एक कोटींग करणे, अशी काहीतरी व्याख्या करावी लागेल. गेले ते दिवस……

जमिन गेली सारवणे गेले, त्याजागी फरशी आणि टेबलखुर्ची आली, पण फरशीवरचे आणि ताटाखालचे जीवजंतु मात्र तसेच आहेत. काही वर्षांनी पाश्चात्य जेव्हा सांगतील please spray or sprinkle sterile water under your dish, before starting your food……

तशी एखादी शुद्ध नलोदकाची स्र्पे बाॅटल ऑनलाईन विकत मिळेल, मग आम्हाला त्याचे महत्व लक्षात येईल.

जमिन असो वा टेबल फरशी
पत्रावळ असो वा बोनचायना डिशी
ताटाखाली पाणी फिरवशी
जीवजंतुना दूर ढकलशी.

(बोनचायनावरून आठवले, जनावरांच्या हाडांपासून बनवतात, असे ऐकले होते….?)

एकदा जेवायला सुरवात केली की पान हलवायचे नाही, हा नियम होता. पानावरून आपणही हलायचे नाही, म्हणजे उठायचे नाही, असाही शिरस्ता होता.

आजकाल फिरतफिरत, ताट मांडीवर घेत, नवीन पदार्थ घेण्यासाठी आपले ताट शेजारी जेवणार्‍याच्या ताटावरून उचलणे, इ.इ. जेवणाचे सर्व मोबाईल प्रकार आठवले, म्हणून लिहिले. आपल्या उष्ट्या हातावरील, ताटातील जीवजंतु, आपण सर्वत्र पसरवतोय हे लक्षातच येत नाही.
(भाऊ, उष्टे म्हणजे काय हो ? )

जेवताना जेवढे सोवळे रहाता येईल तेवढे सोवळे रहावे. मुद्दामच सोवळेअसा शब्दप्रयोग केला, तो शब्द रूढार्थाने समजायला सोपा आहे.

नैवेद्य सोवळ्यातच वाढावा. आणि जंतुसंसर्ग टाळावा.

सोवळे म्हणजे धूतवस्त्र. स्वच्छ धुतलेले कपडे घालून जेवावे, जेवणापूर्वी हात पाय धुवावेत, हे स्वच्छतेचे साधा सोपा नियम कालबाह्य ठरू लागला आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे.

स्वच्छतेचा हा नियम लक्षात घेऊन,
सोवळ्यावर विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी आहे, सोवळे हा काही आम्ही पाळायचा प्रांत नाही, असे म्हणून सोडून देणार काय ?

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
12.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..