नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली //धृ//
हिरवी साडी अंगावरी खडी रंगीत किनारी
ठिपके चमकती पांढरे त्या साडीवरती पसरे
आकर्षक साडी नेसली //१//
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली
शरीर तुझे बांकदार रुप तुझे मनोहर
चपळाईने तूं वाढते दूर जाण्या झेपावते
वाकड्या चालीत शोभली //२//
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली
मिष्किलपणें तूं हासते विनम्रतेने वाकून जाते
पसरवूनी तुझा सुगंध करी सर्वाना तूं धुंद
राणी ठरतेस बागेमधली //३//
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली
बघूनी नभीचे तारे भेटण्या तुझे मन हावरे
परि खंत वाटे तुजला आधार हवा चढण्याला
नको उंचावू इच्छा आपुली //४//
नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply