नवीन लेखन...

नकळत घडले ऋणानुबंध – मनोरंजक प्रेम कहाणी

आजच्या धावत्या आयुष्यातील सर्वात मोठी कमतरता म्हणजे वेळेचा अभाव.परंतु कधीकधी वेळ लागतो परंतु बोलण्यासाठी पुरेसे नसते. तो दिवस होता जेव्हा आमच्या ऑफिसचा कॉफी ब्रेक होता.जेमतेम दुपारी १२ वाजले असतील पण तो आमच्या ऑफेसचा कॉफीची वेळ.
स्नेहल जी माझी खास मैत्रीण होती तिने आमच्यासाठी कॉफी घेऊन ठेवलीं होती.
माझ्याकडे पाहून तिने आवाज दिला, “ऐक, शरद, तुझा मित्र कृष्णा कुठे आहे?”
कृष्णा जो माझा सरकारी मित्र सर्वात अगोदर कॉफी घेण्यासाठी हजर असायचा.आमच्या टेबलला आम्ही जसा कॉलेज चा कट्टा असायचा तास आम्ही त्याला ऑफेसचा कॉफी कट्टा बोलायचो.
स्नेहल म्हणाली , “अरे, कंजूस फोन तरी कर त्याला पहा येणार आहे कि नाही तो कॉफी कट्ट्यावर आज, आज व्यवस्थापन केबिन मध्ये मिटींग होती सकाळी कुलकर्णी एच. आर . त्याचे ओळखीचे आहेत कदाचित तो आपल्याला खास माहिती देईल.”
मी कॉल करण्यापूर्वी तो मला दिसला होता, मी लगेच तिला सांगितले
” नाव घेतलं आणि कृष्ण आलाय बघ “
नक्कीच चांगली बातमी आहे हे त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते.
स्नेहलने विचारले “अरे बापरे !! कृष्णा तुला इतका आनंद का झालाय आज ?” काहीतरी गोड बातमी नक्कीच असणार का रे बढती वगैरे भेटीली कि काय तुला, आम्हाला नाही का सांगणार तू.

कृष्णा हसू लागला, तो बोलला, “नाही, रे बढती वगैरे काही नाही पण त्यापेक्षा मोठी बातमी आहे, आपले कल्याणीनगर चे कार्यालय या कार्यालयात शिफ्ट होणार आहे.” हे ऐकून आम्हाला काही वाटले नाही पण त्या दोघांच्या गावाकडील मित्र – मैत्रीणी आता बरोबर काम कार्याला येणार ये कल्पनेनेच तो खूप भारावून गेला होता अगदी कॉफे पण त्याने पाण्यासारखी पिऊन टाकली होती.

त्याच वेळी मी त्या दोघांना विचारले “चला ऑफिसला जाऊन तुमच्या मित्रांना भेटूया”
आजच त्यांच्या कडून पार्टी घेऊयात. ते दोघे तसे खूप उत्साही होते कारण त्यांचे गावाकडील कास मित्र त्या ऑफिस मध्ये होते,
स्नेहल आणि कृष्णा म्हणाले, “नाही शरद, आत्ता आमच्याकडे खूप काम आहे, आम्ही संध्याकाळी ऑफिस सोडल्यानंतर जाऊ.”

नवीन मित्र पहिल्यांदाच भेटणार आहेत हे जाणून माझ्यात पण उत्साह निर्माण झाला होता मग मी वारंवार घड्याळ बघायचो.
ऑफिस सोडण्याची वेळ आली होती, मला वाटलं, चला आधीच बाहेर जाऊया. आपण बाहेर गेला तर काय?
इतका जोरात पाऊस पडत होता की मी मनात विचार केला, “अरे कसकसा हा पाऊस अचानक आला “
मी ताबडतोब त्या दोघांना फोन सांगितले आणि “बाहेर पाऊस पडत आहे”. हे ऐकूनत्यांचेही मन उदास झाले असावे.
जोरदार पाऊस पडत होता. म्हणून आम्ही ठरवले की आता आपण उद्या भेटू.

मग थोड्या वेळाने पाऊस कमी झाला होता पण खूप उशीर झाला होता सर्वजण त्यांच्या घरी जात होते. मी पाहिले की स्नेहलची गाडी चालू होत नव्हती. म्हणून मी तिला मोत्याने आवाज दिला “अरे स्नेहल, आज तुझ्या गाडीचे काय झाले?”
कदाचित स्नेहलला त्यावेळी थंडी वाटत असावी म्हणून त्याने अगदी दबक्या स्वरांत सांगितले की “हो शरद बघ ना हिला आजच काय झालं ते “
सर्व प्रथम मी त्याला माझे जाकीट दिले आणि म्हणालो “हे जॅकेट घाल म्हणजे तुला, थंडी आणि पाऊस पडणार लागणार नाही “
मी तिला विचारलं ” अगं पेट्रोल तर आहे ना तुझ्या गाडीत “
ती बोलली “हो रे भरपूर आहे सकाळीच टाकी फूल केली आहे “
मी पण खूप प्रयत्न केला पण ती काही केल्या चालूच झाली नाही आणि पावसाची रिमझिम सुरूच होती.
मी तिला विचारले, “स्नेहल आज गाडी ऑफिसच्या पार्किंग मध्येच ठेव “, मी आज तुला तुझ्या घरी सोडतो.

ती बोलली ठीक आहे सोड मला तू घरी. मी तिला सोडून माझ्या घरी गेलो उशीर झाल्याने सगळे झोपले होते तास मीही जेवण करून लगेच झोपलो.
दुसर्‍या दिवशी जेव्हा मी जागा झालो, तेव्हा मी एक नवीन स्वरूप तयार केले जेणेकरुन नवीन लोक येणार आहेत, म्हणून मी मनात विचार केला की जर एखादी स्मार्ट मुलगी या बहाण्याने पटली तर पटली तेवढीच नवीन खास मैत्रीण मिळेल. मग मी त्यादिवशी जरा जास्तच फ्रेश दिसत होतो.
कृष्णाकडून मेसेज आला होता “लवकर ऑफिस ला निघ नाहीतर उशीर होईल” पावसाची रिमझिम सकाळीपण सुरूच होती. मग मी तर खूप तयारीत होतो पण माझे जॅकेट मात्र स्नेहल कडेच राहिल्याने माझी मात्र आता पंचाईत झालीं होती. मग मी आज ताईचे जॅकेट घातले होते ते पण चक्क लेडीज मला खूप लाज वाटत होती पण काय करणार इलाज नव्हता. जर भिजलो तर पूर्ण चेहरा कपडे खराब होणार होती. मग मी निघालो. आता स्नेहल ला बरोबर घ्यायचे होते.

मी जेव्हा तिच्या घरी पोहोचलो तेव्हा तिची आई बाहेर उभी होती तिने मोठ्या आवाजात आवाज दिला
“अरे शरद स्नेहल चहा पित आहे, तुम्ही चहा देखील पिऊ शकता”
मी आणि स्नेहल चहा घेऊन निघालो. ऑफिस पासून १ km अंतरावर आलो होतो
अचानक वाटेत एक मुलगी रास्ता ओलांडताना समोर आली. मी खूप झोतात ब्रेक दाबले होते.
स्नेहल मोठ्याने ओरडली अरे… शरद द.. द.. ——साव– “सावकाश रे”
मी त्या मुलीकडेच पाहत होतो कारण तिला रोडलगत असलेला खांब हाताला लागला असेल असं मला वाटलं होत. स्नेहल पटकन उतरून गेली.
स्नेहलने तिला ओळखले आणि “अरे प्रियंका तू इथं ”
प्रियांकानेही हसत हसत “स्नेहल तु ” म्हटले
कदाचित दोघेही एकमेकींना ओळखलं होतं.

स्नेहलने माझ्याकडे पाहिले आणि सांगितले की ती कल्याणनगर ऑफिसची तिच्या गावाकडील मैत्रीण आहे,
मी तिला विचारले ” तुम्हाला लागले तर नाही ना”
ती आधी माझ्याकडे जसा काय मी विचित्र दिसत आहे असं पाहताच होती. कारण मी लेडीज मोठा रेनकोट खाटलेला तसाच होता.
नंतर ” थोडंसं लागले ” असं उत्तर दिलं
ती मात्र माझ्याकडे पाहून गालात हसत होती.
स्नेहल बोलली ” अरे हे काय घातले आहेस तू आज “
मी त्या नवीन मुलीकडे पाहत सांगितले की तू माझा रेनकोट घातल्याने मला हा ताईचा घालावा लागला आहे.
स्नेहल ने तिची ओळख सांगितली की आजपासून आपल्या ऑफिस मध्ये शिफ्ट झाली आहे.
मी “हाय शरद स्नेहलचा जिवलग मित्र आणि उद्या आपला देखील”
ती हसली आणि म्हणाला “हाय मी प्रियंका”
मग स्नेहल बोलली, “चला रे लवकर ऑफिसला गेल्यावर गप्पा मारूया”
आम्ही आत्ता ट्रिपल बसलो होतो.
आता पोलिसांकडून पळून कसे जायचे हे होते.

आम्ही एक सिग्नल ओलांडला, पण पोलिसांनी आम्हाला पुढच्या सिग्नलवर पकडले.
पोलिसांनी परवानाची कागदपत्रे विचारली असता माझ्याकडे सर्व काही होते परंतु त्याने ट्रिपल बसून चाललो आहे म्हणून पैसे मागितले.
प्रियांका खूप हुशार होती, या प्रकरणात तिला माहित होतं की ती पोलिस महिलांच्या बाबतीत काय बोलतात.
पोलिसांबरोबर ती काहीतरी पलीकडे जाऊन बोलत होती आम्हाला वाटले की हिचे ओळखीचे तर असतील कदाचित तस मी परत आल्यावर मी विचारले पण तिने ऑफेसला गेल्यावर सांगेल असं बोललीं.
पण थेट ग्रीन सिग्नल मिळाल्याने पोलिसांनी जाण्यास सांगितले आणि आम्ही ऑफिसला निघालो.
मी त्याचे थोडेसे कौतुक केले. “तू खूप हुशार आहेस, तू पोलिसांनाही पटवू शकतेस. मस्त आहे राव “
ती म्हणाली “आहेच मी स्मार्ट”
मला जरा ओव्हरच वाटली ती
कृष्णाचा फोन आला “साई कॅफेमध्ये कॉफी घेऊया”
आम्ही तिघेही ऑफिसच्या बाहेर कॅफेमध्ये कॉफीसाठी गेलो होतो, प्रियंका माझ्या बाजूला बसली होती.
त्याच्या अत्तराच्या सुगंधाने मला खूप बरे वाटले होते. प्रियांकाने गरम कॉफी मागितली आणि तीही उठून वेटरला आवाज दिला.

नंतर कृष्णा आला आणि सर्वांना म्हणाला “हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग”
कदाचित कृष्णाला प्रियांकाबद्दलही माहिती असेल कारण जेव्हा ती भेटली तेव्हा तिने थेट चर्चा सुरू केली.
मी थोडं आश्चर्य वाटले होते. पण नंतर कळले की त्यांनी आधी एकत्र काम केलं होतं.
कृष्णा, स्नेहल आणि आणि मी थंड कॉफी घेतली होती.
प्रियांकाने मात्र जशी ती गरम दिसत होती तशी तिने गरम कॉफी घेतली होती.
प्रियांकाने मला विचारले “तू कोणत्या विभागात काम करतोस”
मी म्हटले की मी आणि कृष्णा बरोबर विभागात काम करतो
ते म्हणाले की, “मीही त्याच विभागात रुजू झालो आहे.”
हे ऐकून मला खूप आनंद झाला.

ती कॉफफे पिताना कॉफीची साई तिच्या गुलाबी ओठांना लागली होती.
मी तीला इशारा देऊन सांगण्याचा प्रयत्न केला पण स्नेहलने मला पाहिले आणि माझ्या पायाला मारले.
तिने माझ्याकडे पहिले होते आणि मी काय पाहत आहे हे कदाचित तिला जाणवले आणि लगेच तिने ते ओठ साफ केले.
आता कोण बिल भरण्यासाठी आला होता, प्रियांकाने आधीच गाडी चालविली होती आणि कृष्णाबरोबर निघून गेली होती.
मला तिचे क्रेडिट कार्ड देऊन स्नेहल म्हणाली, “शरद चल बिल घेऊन या.”
आम्ही बिल दिले आणि गाडीकडे आलो तर काय ते दोघेही आम्हाला सोडून ऑफिसला गेले.
स्नेहल बोलली बघ, “तुझ्या मित्राला जरा, त्याला जुनी मैत्रिणी मिळाल्या, मग असे आहे की हे मुलगे बदलतात “
मी म्हणालो, “नाही, स्नेहल बदलणारे प्रत्येकजण नाही, परंतु मी बदलणार नाही. मला फक्त कोणीतरी साथ द्यायला पाहिजे.”
स्नेहल म्हणाली , “हा हा, आता तू ऑफिस ला चल मग तुला चांगलं बघते. आधीच उशीर झालेला आहे.
कृष्णाने प्रियांकाला घेऊन गेला होता हे पाहून मला त्याचा खूप राग आला होता.

मी ऑफिसला गेलो होतो तेव्हा बरेच नवीन चेहरे होते.
पण माझे डोळे फक्त प्रियांकाला शोधात होते, कारण पहिल्या नजरेपासून तीच माझ्याकडे पाहणं जरा वेगळाच होतं. आणि तसं मला जाणवले होते. मी तिला ट्रेनिंग रूममध्ये पाहिले पण ती तिचे नव्हती.
मग मी कृष्णाला फोन केला आणि म्हणालो “मी माझ्या कामाच्या ठिकाणी आलो आहे.”
तुझी मैत्रीण कुठे आहे सांगशील का मला मॅनेजरशी ओळख करून द्यायची आहे तिची
तो बोलला ” मी तिला ट्रेनिंग डिपार्टमेट मध्ये सोडून आलो आहे. मी लगेच तिकडे पाहिले पण ती नव्हती मग मी शेजारील गॅलरी मध्ये गेलो तर ही
प्रियंका तिथल्या तिच्या जुन्या मित्रांसमवेत बोलत होती.
मी तिला आवाज दिला “प्रियंका मॅडम तुला” एचआर “विभागात बोलावले गेले आहे
मला त्याच्याशी बोलता यावं म्हणून मी हे चुकीचे बोललो होतो?
जेव्हा ती आली तेव्हा मी विचारले की “हाच मार्ग आहे, पहिल्या भेटीत आपण आमच्या आधीच कॉफी कॅफे मधून निघून पुढे गेलात.”
ती म्हणाली, “अरे सॉरी यार आमच्या बोलण्यात लक्षातच राहिले नव्हतं. “
मी बोललो ठीक आहे पण आज दुपाची कॉफीने आज आपण दोघेच घेऊयात. म्हणजे मी तुला आपल्या विभागातील महत्वाचे टीप देईल.
ती होकारार्थी मन डोलावलीं मग मी तिला आमच्या डिपार्टमेंट मॅनेजर कडे भेटायला घेऊन गेलो, ज्यामुळे तिला माझ्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले गेले.

आता या खूप सुंदर नवीन मैत्री परिचय पॉइण्ट नंतर, आमच्या नात्यात खोल मैत्रीबद्दल काही खास गूढ, सर्वांना आवडेल अश्या गप्पा, ऋणानुबंध कशे वाढत गेले नवीन सहा मित्रांचा ग्रुप वाढला मग फिरणं, मस्ती , मौज, पार्टी, विविध १० ते १२ पर्यटन स्थळांना भेटी तेथील अनुभव ” सर्वांच्या यशस्वी लव्ह स्टोरी ” कशा झाल्या यांचं गूढ आपण पुढील ९ स्टोरीज मधून आपल्या समोर वाचनासाठी लवकरच…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..