नरेंद्रभाई चुडासामा हे ‘नाना’ चुडासामा म्हणूनच पहिल्यापासून परिचित राहिले. त्यांचा जन्म १७ जून १९३३ रोजी झाला. नाना चुडासामा यांची ओळख आय लव्ह मुंबई, जायन्ट्स इंटरनॅशनल या एनजीओं एवढीच त्यांच्या मालकीच्या रेस्टॉरंटर लावलेल्या फलकांमुळेही होती. मुंबईच्या उच्च वर्तुळात त्यांचा वावर होता आणि त्यांच्या या रेस्टॉरंटध्येही त्याच वर्गाचा वावर होता. परंतु या फलकावर व्यक्त झालेल्या भावना मात्र सामान्य मुंबईकरांच्या असंत. त्यांचे वडिल मानसिंग चुडासामा हे एकेकाळी मुंबईचे पोलिस आयुक्त होते.
‘जेसीज’, ‘जायंटस इंटरनॅशनल’ या समाजभावी क्लबांमार्फत उभ्या केलेल्या कामांतूनच समाजापर्यंत पोहोचले. १९७२ मध्ये नानांच्या पुढाकाराने भारतभर ‘जायंट्स’तर्फे विविध सेवाकार्ये सुरू झाली आणि नाना चुडासामा हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यातील वंचितांपर्यंत पोहोचले. लातूर, उस्मानाबादचा भूकंप, कच्छ-भुजमधील प्रलयंकारी भूकंपानंतर कमीत कमी वेळेत या संघटनेने मदतकार्य सुरू केले. जायंटसच्या आजवरच्या वाटचालीत नानांनी विविध योजना सुरू केल्या.
कुटुंब नियोजन, शैक्षणिक मोहिमा, जलसंवर्धनाचे प्रयोग, पर्यावरण रक्षण, नेत्रदान मोहिमा, अपंग साहाय्यता उपक्रम, बेटी बचाओ अभियान, अशा अनेक मोहिमांना नानांनी बळ दिले. स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार रोखले नाहीत, तर भविष्यात एक गंभीर सामाजिक समस्या उभी राहील, हे ओळखून नानांनी समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी एकत्र आणले. ज्या मुंबईत आपण राहतो, ते शहर आपले आहे, या शहराचे पर्यावरण जपले पाहिजे, याची जाणीव प्रत्येक मुंबईकराच्या मनात जागी करून देण्यासाठी नानांनी ‘आय लव्ह मुंबई’ नावाची चळवळ सुरू केली. ही चळवळ पुढे मुंबईच्या समाजजीवनाचे एक अविभाज्य अंग बनून गेली. या चळवळीच्या माध्यमातून मुंबईत अनेक सार्वजनिक शौचालये उभी राहिली.
मुंबईच्या नगरपालपदाची सलग दोन वेळा धुरा सांभाळणारे नाना चुडासामा हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही सामाजिक स्तरातील व्यक्तीशी समान पातळीवरून मत्री साधण्याची नानांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. विविध क्षेत्रांतील नानांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून २००५ मध्ये केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरविले.
जुन्या मुंबईबद्दल प्रेम असणारे आणि मुंबईच्या नव्या स्वरूपाचे स्वागत करण्यास सदैव उत्सुक असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून नाना चुडासामा यांची ओळख होती. नाना चुडासामा यांचे निधन २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply