नवीन लेखन...

नेन्सी वेक- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

नेन्सी वेक हिचा जन्म न्यूझीलंड मध्ये वेलिनटन शहरात ३० ऑगस्ट १९१२ रोजी झाला.  1914 त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलिया च्या उत्तर सिडनी भागात स्थाईक झाले.वयाच्या १६ व्या वर्षी ती घरातून पळाली आणि नर्स म्हणून काम करू लागली.पुढे ती न्यूयार्क येथे गेली व नंतर लंडनला जाऊन पत्रकारितेचा कोर्स केला.1930च्या सुमारास ती फ्रांसला गेली  व हस्ट वृत्तपत्रात युरोपची प्रतिनिधि म्हणून काम करू लागली.पुढे तिने नाझीचा उदय पाहिला,विएना शहरात नाझीनी ज्यूंवर केलेले भयानक अत्याचार पाहिले.1937 मध्ये ती फ्रेंच कारखानदार हेनरी एडमन फियओका याला भेटली.आणि 30 नोव्हेंबर 1939 रोजी त्याच्याशी लग्न केले.ती मारसेलीस येथे असताना नाझीनी फ्रांस जिंकला . दुसऱ्या महायुद्धात तिने एमबुलंस चालक म्हणून काम केले. ती शिताफीने नाझी सैनिकांच्या हातावर तुरी देऊन निसटत असे. तिचे हे कौशल्य पाहून नाझी तिचा उल्लेख निसटणारा “सफेद उंदीर” असा करत. तिचे आयुष्य कायम धोक्यात असे.तिने फ्रांस मधून पळून जायचा निर्णय घेतला . पण तिचा नवरा मागे फ्रांस मध्ये राहिला . त्याचा नाझीनी खूप छळ केला . 1943 मध्ये फ्रांस मधून पळून जाताना तिला टोलोज येथे अटक करण्यात  आली. पण चारच दिवसांनी तिला सोडण्यात आले. पुढे तिला फ्रांसच्या डोंगररांगांतून स्पेनमध्ये पळण्यात यश आले.दुसरे महायुद्ध संपेपर्यंत तिला आपल्या नवऱ्याचे निधन झाले आहे हे माहिती नव्हते .

पुढे इंग्लंडला गेल्यावर ती इंग्लंडच्या special operations executive ह्या संघटनेसाठी कार्य करू लागली. तिला “ खरा ऑस्ट्रेलियन बॉम्बगोळा संबोधू जाऊ लागले.29 एप्रिल 1944 रोजी तिला पॅरॅशूटने  फ्रांस मध्ये उतरवण्यात आले.गुप्तहेर संघटनेच्या रेडियो ऑपरेटर टीम पैकी ती एक होती. इंग्लंडची  special operations executive मोठ्या प्रमाणात फ्रान्समध्ये शस्त्र, दारुगोळा व पैसे गुप्तपणे पाठवू लागली. नेन्सी वेकचे काम होते ते योग्य ठिकाणी पोचवणे. special operations executive च्या सदस्याचा पगार देणे. एकदा special operations executive टीमला लंडनला संपर्क करणे गरजेचे होते . त्यासाठी नेनसीने चेटेरॉक्स शहरातून एक सायकल भाड्याने घेतली. व 500 किलोमीटर चा प्रवास करून लंडनला माहिती पोचवली व परत आली. हा प्रवास तिने 72 तासात केला.सुदैवाने तिला वाटेत नाझीनी पकडले नाही.नेनसिने नाझीवर टाकलेल्या धाडीत भाग घेतला आणि 38 नाझीना ठार केले.

तिने ब्रिटिश एअर मिनिस्ट्री च्या गुप्तहेर खात्यात काम केले,नंतर ती ऑस्ट्रेलियाला परतली.पण 1951 ला ती पुन्हा इंग्लंडमध्ये परतली.व गुप्तहेर अधिकारी म्हणून काम करू लागली.1985 मध्ये तिने “The White Mouse “ हे आत्मचरित्र लिहिले तिचा मृत्यू 7 ऑगस्ट 2011 ला झाला. तिची ईछा होती की तिची  राख  फ्रांस मधील मोनटिकोन येथे पसरावी . त्याप्रमाणे तिची राख  मोनटिकोन जवळील व्हेरनिक्स येथे 11 मार्च 2013 रोजी पासरवण्यात आली.

तिला देण्यात आलेले सन्मान

1 Companion of order-ऑस्ट्रेलिया

2 George Medal- फ्रांस

3 officer of legion honour फ्रांस

4 croix the guerre -फ्रांस

5 Resistance Medal-फ्रांस

6 RSA badge in gold

7 Medal of  Freedom – अमेरिका

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..