आज अभिनेत्री नंदिता पाटकर यांचा जन्म १ मार्च १९८२ पुणे येथे येथे झाला.
नंदिता पाटकर एक मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. नंदिता यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीला आरजे आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.नंदिता या झी मराठी वरील माझे पति सौभाग्यवती या मराठी मालिकेत त्यांनी अभिनय केला होता. ज्यात त्यांनी लक्ष्मी नावाच्या गृहिणीची मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी मराठी मालिकांसोबतच मराठी चित्रपटांत देखील पदार्पण केले.२०१४ मध्ये “एलिझाबेथ एकादशी” या चित्रपटातून नंदिता यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. पुढे त्यांनी खारी बिस्किट, बाबा, लालबागची राणी आणि दारावठा , काशिनाथ घाणेकर यासारख्या बर्याच मराठी चित्रपटांत अभिनय केले. नंदिता त्या स्टार प्रवाहवरील मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ मध्ये सुनील बर्वे सोबत दिसल्या होत्या. त्या कलर्स मराठीची मालिका “तू माझा सांगाती” या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली आहे. नंदिता यांनी बया दार उघाड, अरण्या किरण, आमच्या हिचं प्रकरण, वर खाली दोन पाय अशा नाटकात अभिनय केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply