नवीन लेखन...

कॅलिफोर्निया मधील नापा व्हॅली ऑपेरा हाऊस

अमेरिकातील कॅलिफोर्निया मधील नापा व्हॅली या ठिकाणी असलेले “नापा व्हॅली ऑपेरा हाऊस” हे खरोखरच अमेरिकेसाठी एक अभिमानास्पद वास्तू आहे. हे थिएटर दुमजली आहे. नावातच संगीतातील एक प्रकार असल्याने इथे खास करुन सांगितिक कार्यक्रम जास्त करुन होतात.

इतिहास :

१८७९ साली बांधून पूर्ण झालेले हे थिएटर १३ एप्रिल १८८० रोजी उघडण्यात आलं. या थिएटरच्या कारकिर्दितील सर्वात पहिला प्रयोग गिल्बर्ट आणि सुलिव्हानचा एचएमएस पिनॅफोर या विनोदी द्विपात्री कार्यक्रमाने झाला. थिएटरचा मूळ मालक जॉर्ज क्रोई होता व थिएटरचे व्यवस्थापन चार्ल्स लेव्हॅन्सलर हे सांभाळत असत. १९ व्या शतकातील प्रसिद्ध वास्तूरचनाकार न्युसम अ‍ॅंड न्युसम यांनी वास्तूची वास्तूरचना केलेली होती. ही इमारत संपूर्णपणे इटालियन स्टाईलमध्ये बांधण्यात आली आहे. या वास्तूत पहिले तीन मजले होते, त्यातील पहिल्या मजल्यावर हॉटेल तर दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर सांगितिक मैफलींसाठी, नृत्यासाठी, इतर छोट्या समारंभांसाठी व चित्रपट बनविणार्‍यांसाठी सपाट जागा (Floor) होती. थिएटरमध्ये एक पडदा होता जिथे स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन दिले जायचे.

वाऊडविलेच्या (Vaudeville) (एक विनोदी फ्रेंच कार्यक्रम) प्रसिद्धीच्या काळातही हे थिएटर विविध स्वरुपाच्या संगीत मैफलींनी व विभिन्न कलांच्या सादरीकरणाने बहरलंं होतं.

१९१४ साली हे थिएटर बंद पडलं कारण वाऊडविलेच्या (Vaudeville) प्रसिद्धीला खिळ बसली आणि चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंं, त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे सॅन फ्रॅंसिस्कोचा भूकंप! जवळपास पुढील ७० वर्षं या वास्तूचा विविध व्यावसायिक हेतूंसाठी वापर केला गेला.

१९७३ साली या वास्तूची एक ऐतिहासिक वास्तू म्हणून युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्रीय नोंदवहीत नोंद केली गेली. १९८५ साली या थिएटरच्या पुनर्संचयनासाठी एक ना नफा (Non Profit) गट स्थापन केला गेला. १९९७ च्या आसपास थिएटरच्या पुनर्बांधणीस चालना मिळाली. अखेरीस २००२ साली नापा ओपेरा हाऊसने पुन्हा आपले बंंद दरवाजे सर्वांसाठी खुले केले. मुख्य थिएटरच्या वरच्या मजल्यावरचे बांधकाम सुरु असताना, जाझ गायक डायअन रीव्ह्जने खाली असलेल्या “कॅफे थिएटरचे” उद्घाटन केले. १ ऑगस्ट २००३ रोजी रिटा मॉरेनोने (Rita Moreno) अभिनीत केलेल्या कार्यक्रमाने मुख्य रंगमंचाचे (मार्गरेट बिव्हर मोंडावी थिएटरचे) उद्घाटन झाले.

२०१० सालात या थिएटरला १३० वर्षं पूर्ण झाल्याने अख्ख्या वर्षभर थिएटरमध्ये उत्सव साजरा झाला होता. सध्या थिएटरच्या पहिल्या मजल्यावर Blue Note Napa या नावाने जाझ म्युझिक क्लब असून इथे उत्कृष्ट स्वरुपाचे प्रत्यक्षित सांगतिक मैफल ऐकण्याची मजा लुटता येते. दुसर्‍या मजल्यावर Bands, Symphonies & Choirs इत्यादी कलांचा आस्वाद घेता येतो.

पत्ता : NAPA VALLEY OPERA HOUSE, 1030 MAIN STREET, NAPA, CA, 94559, UNITED STATES

संपर्क : T (707) 880-2300

— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..