नशीब कठोर स्वीकार होता
अबोल अंतरी झाला
दुःखी जीवाचा तिच्या अधुरा
डाव जुगारी मांडला
कितीक इच्छा दाबून टाकल्या
वेदनेच्या कळा लागल्या
न कौतुक न प्रेम न माया
शांततेत होम पेटला
काहीच नाही इच्छा आकांक्षा
सर्वसाचा लाव्हा तप्तला
भोग दुःखद जळत्या मनाला
नकळे कुणाला भावना
मेलेल्या मनात दुःख पसारा
स्त्रीजन्म निःशब्द सारा
भाव मेले मनात जखमा
नियतीचा फेरा असा
रोज रडता जीव सुकला
नकळे कुणा वेदनेचा घाला
स्त्रीजन्म सोशिक असतो खरा
पैलतीर जाते मरुन जाणिवा
स्त्री असते अशीही एकांता
नकळे व्यथा वेदना
कुठे असते सुख सदा
कुठे काटेरी वेदना
दुःख उरात आकाश झाकोळता
असते अशीही स्त्रीव्यथा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply