नवीन लेखन...

नशिबाची व्याख्या

कळत-नकळत घडणा-या अनेक गोष्टिंचा भार शेवटि ”नशिब” नावाच्या ऐरणीवर येऊन आदळतो. माणसाच्या जीवनभ्रमंती मध्ये सुख-दुःखाच्या वळणावर ‘कधी हासु तर कधी आसु’ व्यक्त होत असतात. हासु असेल तर नशिब बलवत्तर ठरते. दुख:द प्रसंगी नशिब फुटके ठरते… आणि माणुस मात्र माफिचा साक्षीदार होऊन नशिबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो.

आजच्या जीवनशैलीत अन्न..वस्त्र..निवारा या मूलभूत गरजांपेक्षा चैनिच्या गोष्टि मुलभूत होऊन बसल्याने कष्ट.. अनुभव..भावना..माणुसकी.. एवढच काय तर आहार.. आवश्यक निद्रा.. शारीरीक हालचाल या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असताना दिसते. वरील उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा संबंध नशिबाशीच आहे. आपल्या अपयशाचा मुळ बिघाड तिथेच आहे.. हे गृहित धरुन एकाग्रतेने चुका सुधारून कष्टरुपी इंधनाने आपन निश्चित ध्येय सहज गाठु शकतो. जीवनाच्या या परिक्रमेत शाॅर्टकट मारण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भविष्यात आपला रस्ता भरकटणार हे विधिलिखित सत्य आहे.

सत्ययुग असो वा द्वापारयुग दोन्हिहि प्रसंगात कलियुगाची व्याख्या सांगितली आहे. कलियुगात विश्वाचा -हास होणार~जग बुडणार असे दावे अनेक जन अनेक वर्षांपासून करतात.. हजारो वर्षापूर्वीचे हे भाकीत केसाएवढ्या फरकाने खरे ठरत आहे.हे नाकारून चालणार नाही.सांप्रत युगात मानवाच्या जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे अनेक दुष्परीणाने झाले.याचा परीणाम संपुर्ण जीवसृष्टीवर झाला हे नाकारून चालणार नाही.

१०० वर्ष आयुमर्यादा असणारा माणुस अवेळी नकळत मृत्यु पावतो.. मृत्यु चे कारण काय? तर ह्रदयविकार..! आयुष्यमान भव: …असा फुकट आशिर्वाद घेणारा आणि देणारा माणुस ‘नशिबावर’ येऊन ठेपतो.

नशिबाची व्याख्याच एवढि मोठी आहे.. कि यामध्ये योगायोग कधीच नसतो.. भूतकाळातील दोष-सदोषाच्या परिपक्वतेचे ते परीणाम आहेत हे वेळेपूर्वीच मान्य केले पाहिजे. सहज जीवनशैलीत मानव जन्माची व्याख्या समजुन घेऊन केलेली परिक्रमा निश्चयी ठरते… आसुररुपी जीवनशैली मानव जन्माचा -हास ठरते.. बदलत्या काळाचा परीणाम केवळ आपल्या धर्म. .संस्कृती यावर होत नसुन संपुर्ण जीवसृष्टीवर होत असतो. व्याख्या नशिबाची असली तरी वरील संदर्भाच्या नसा ”नशिब” या सबस्टेशनशी येऊन मिळतात.

नशिबाची साधी सरळ व्याख्या सांगायची म्हटली तर आपल्या आयुष्यातील सत्कर्म आणि दुष्कर्म यांची गोळाबेरीज म्हणजे आपलं नशिब….. गणिती सूत्रांनुसार मोठ्या संख्येतुन लहान संख्या वजा होते. नशिबाची व्याख्या हि तशीच आहे… (सत्कर्म-दुष्कर्म=नशिब).. सत्कर्म जर जास्त असेल तर दुष्कर्म सहज वजा होईल. परंतु दुष्कर्मातुन सत्कर्म वजा केल्यास बाकी दुष्कर्मच राहणार.. अर्थात ते ‘फुटकं नशिब’ म्हणुन गणले जाईल..

नशिबाची व्याख्या माणुसकी सोबतच कष्ट.. बुध्दिचातुर्य.. अनुभव.. समाधान… आशावाद.. याच्याशी निगडीत आहे. समजुन घेतले तर केवळ नशिबच नाहि तर स्वभावही बदलु शकतो. यंत्रयुगात आपण एवढे मोठे बदल घडवले तिथे नशिब आणि स्वभाव काय चीज आहे? आपण मानव म्हणुन जन्मलो हेच आपलं मोठं नशिब आहे. करोडो रुपयाचे शरीर फुकट मिळाले… हे आपलं नशिब आहे.. फुकटात प्राणवायु मिळाला हे पण आपलं नशिब आहे… आभाळातून पडणारं पाणी हे पण आपलं नशिब आहे.

अर्थात मानव जन्माची व्याख्या ज्यास समजली त्यांस नशिबाची व्याख्या सहजपणे समजुन येईल.

श्री.केतनकुमार अशोकराव इंदुरे
भवानी पेठ करमाळा.९८६०००८५१०

लेखकाचे नाव :
केतनकुमार अशोकराव इंदुरे
लेखकाचा ई-मेल :
ketanindure11@gmail.com

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..