विनोदी लेखक, नाटककार तारक मेहता यांचा स्मृतिदिन.
जन्म. डिसेंबर १९२९
‘दुनिया ने उंढा चष्मा’ या नावाचा त्यांचा मूळ गुजराती स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. स्तंभलेखन, नाट्यलेखनही त्यांनी केले होते. गुजराती रंगभूमीवरही ते लोकप्रिय होते.
तारक मेहता यांच्या लेखनामध्ये नेहमीच नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. ‘दुनियाने उंधा चष्मा’ या सदरासाठी आणि अनोख्या लेखन शैलीसाठी तारक मेहता ओळखले जायचे. गुजराती रंगभूमीसाठी तारक मेहता यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. विनोदी लेखनशैलीच्या मदतीने तारक मेहता यांच्या लेखनाने अनेकांचीच मने जिंकली. त्यांचे ‘नवूं आकाश नवी धरती’ आणि ‘कोथळामांथी खिलाडी’ ही गुजराती भाषेतील पुस्तकेही खूप गाजली. १९७१ पासून चित्रलेखा गुजराती साप्ताहिकातून ‘दुनियाने उंधा चष्मा’ हे त्यांचे लोकप्रिय सदर प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच तारक मेहता यांनी दैनंदिन जीवनातील बऱ्याच प्रसंगांवर आणि महत्त्वाच्या घटनांवर त्यांच्या लेखणीद्वारे वेगळ्या दृष्टीकोनाने पाहत एक नवा पायंडा पाडला होता. ‘सब’ वाहिनीने २००८ पासून तारक मेहता यांच्या लोकप्रिय सदरावर आधारित एका मालिकेची सुरुवात केली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेद्वारे एक वेगळीच दुनिया आणि तारक मेहता यांच्या लेखणीतून साकारलेले कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. फार थोड्या वेळातच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने अनेकांची पसंती मिळवली. तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील चंपकलाल गडा, जेठाभाई, दयाबेन यांसारख्या पात्रांना अजरामर करण्यामागे मा. तारक मेहता यांच्या लेखणीचा मोठा हात आहे. तारक मेहता यांचे १ मार्च २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply