अभिनय सम्राट ! डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या वरील पुस्तकातील कांचन काशिनाथ घाणेकर यांचे मनोगत.
‘नाथ हा माझा” – कांचन काशिनाथ घाणेकर
डॉ. काशीनाथ घाणेकर! एक कलंदर व्यक्तीमत्वाचा मनस्वी कलावंत! त्याच्या देखण्या रूपानं, स्वत:ला झोकून देऊन केलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना विलक्षण मोहिनी घातली होती. पंचवीस वर्षे प्रेक्षकांना रिझवणार्या या कलावंताचं पारदर्शी व्यक्तीचित्रं या पुस्तकात कांचन घाणेकर यांनी चितारलं आहे. त्यात त्यांच्या बेभान, बेदरकार, व्यसनाधीन वृत्तीसह सार्या गुणदोषांचे, प्रेमप्रकरणांचे, नाट्यप्रवासाचे निखळ रंग उमटले आहेत. एका कलावंताचे कौटुंबिक, मानसिक, कलात्मक जीवन चितारणारे रसाळ चरित्र.
अखेरचं पत्र (पान क्रमांक 375)
2 मार्च 1988
माझेच प्रिय कॅश,
दोन वर्ष झाली तुम्हाला जाऊन. तुम्ही बऱ्याच दिवसांसाठी बाहेरगावी निघालात की, तुम्हाला पत्रं लिहायचं असं आपलं ठरलेलं असायचं. मला पत्र लिहायचा कंटाळा असूनही मी आज तुम्हाला पत्र लिहायला घेतलं आहे. कारण तुमच्या माघारी काय काय घडलं हे वाचायला तुम्हालाही उत्सुकता असणार. खरं म्हणजे पत्ता काय लिहावा म्हणून खोळंबले होते. आणि मग लक्षात आलं अरे, नुसतं डॉ. काशिनाथ घाणेकर असं लिहिलं तरी ते पत्र तुमच्यापर्यंत पोहोचेल.
प्रेम म्हणजे नक्की काय???…यावर उत्तर एकच कांचनने डॉक्टरांवर केलेलं प्रेम
पत्नीने पतीवर पुस्तकं लिहावं यात काही अनोखं नव्हतं. बऱ्याच नामांकित व्यक्तींच्या पत्नींनी पुस्तकं लिहीलय. मात्र “नाथ हा माझा” या पुस्तकातं नक्कीच वेगळपणं होतं. ते म्हणजे कांचन (सुलोचना लाटकर यांची मुलगी) यांनी डॉक्टरांवर केलेलं प्रेम..डॉक्टरांबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतंय हे न कळण्याच्या वयातलं हे प्रेम…
“डॉक्टरांचे निळे टपोरे डोळे ,आरपार वेध घ्यायचे. त्यांचे एखाद्या लहान मुलासारखे खळाळून हसणे पाहत राहावेसे वाटे. त्यांचा भावदर्शी चेहरा मोहित करायचा. अंहं. पण ज्याच्यासाठी मी वेडावून जावे, असे त्यांच्याजवळ विशेष असे काय होते? घरीदारी, कॉलेजमध्ये त्यांच्याहूनही देखणी मंडळी मी पाहत होते. शिवाय ते सर्व माझ्या बरोबरीच्या वयाचे होते. अविवाहित होते. मग डॉक्टरांचेच इतके आकर्षण मला का वाटत होते? आणि मग एकच उत्तर….. डोळ्यांसमोर येत होते -‘डॉक्टरांचे कलंदर व्यक्तिमत्व’, ‘सो व्हॉट?’ असं बेदरकारपणे विचारणारा.त्यांचा बेधडक स्वभाव. त्यांच्या रांगडेपणाने, धसमुसळ्या स्वभावाने मला मंत्रमुग्ध केले होते. माझ्या उपजत आवडींना डॉक्टरांची ही सगळी स्वभाववैशिष्ट्ये आकर्षून घेत होती, हे नक्कीच होते.’या होत्या फक्त भावना… कुठेही आकर्षण नव्हतं.
आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल खास असं काहीतरी वाटतं. हे खूपच छान असतं. म्हणजे तो प्रत्येक क्षण आपण जगतं असतो. पण समोरच्या व्यक्तीला देखील आपल्याबद्दल अगदी तसच वाटतंय ही गोष्ट दडपणं आणणारी आहे.
आणि डॉक्टर तर विवाहित होते. तेव्हा वयाने तब्बल 15 वर्षांनी मोठे. त्यामुळे डॉक्टरांनी आपल्याला देखील कांचनबद्दल तसचं वाटतंय हे सांगितलं होतं. तेव्हा आनंदाबरोबरच आलं होतं ते दडपणं. वयाने इतक्या मोठ्या असलेल्या मुलाशी लग्न करणं हे आजही न पचणाऱ्या गोष्टींमध्येचं येतं. मग एका विवाहित माणसाशी लग्न करण्याबाबत तेव्ही ही विरोध झाला. त्यामध्ये डॉक्टर म्हणजे “मनमौजी कलाकार” नाटकं, चित्रपट यांच्या किस्स्यांबरोबरच डॉक्टरांच दारू पिणं आणि त्यांच्या “सख्यांचे” किस्से देखील तेवढेच चर्चेत असायचेत. त्यामुळे डॉक्टरांशी लग्न करण्याचा विचाराला नकारच येणार हे कांचनला माहित होतं.
प्रेम म्हणजे टाईम पास किंवा निव्वळ आकर्षण हे समिकरण तेव्हापासूनच चालत आल असावं. सुलोचनाबाईंना आणि इतरांना कांचन आणि डॉक्टरांच्या प्रेमाबद्दल तसंच वाटलं. कांचन लहान आहे काही दिवसांनी प्रेमाचं हे खूळ उतरेल. डॉक्टरांची नाटकं बघून सुरू झालेलं हे प्रेमाचं नाटकं असावं असंच साऱ्यांना वाटलं. त्यामुळे पहिली बंदी आली ती डॉक्टरांच्या नाटक बघण्यावर.
आकर्षण नसलं तरी प्रेम किती दिवस विरह सहन करणार? त्या विरहाला देखील मर्यादा आहे. पण कांचन आणि डॉक्टरांच्या विरहाचा कालावधी होता 12 वर्ष. बारा वर्षांनी कांचनच्या कुटुंबियांना, डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीला या विवाहाबद्दल काहीच म्हणणं नव्हतं. लग्न होतं. पण प्रेमच सर्वस्व नसतं त्याची प्रचिती कांचनला आली. डॉक्टरांच्या मनमौजी स्वभावामुळे, दारू पिण्यामुळे एकत्र राहणं कठिण होतं. पण डॉक्टरांकडून घटस्फोट न घेता त्यांना बदलवण्याचा प्रयत्न केला गेला. खरं प्रेम बहुदा तेच करत असाव. डॉक्टरांची लहान मुलांकडे असलेली ओढ कायम कांचनला अस्वस्थ करायची. पण डॉक्टरांच आणि कांचनच वय पाहता मुलाबाबत विचार करणं थोडं भावनेच्या आहारी गेल्यासारखं होतं. यापेक्षा आपण दोघांनी एकमेकांसाठी जगू हा विचार खूप कठिण पण मोठा होता.
डॉक्टरांच त्यांच्या कलेवर अतोनात प्रेम होतं. नाटकं सादर करतानाच मृत्यू यावा ही एक कलाकाराची अपेक्षा होती.
“हे बघ, धीराने घे.” आता आत्तीने अधिक काही सांगायची गरज नव्हती.म्हणजे डॉक्टर..
डोकं एकदम सुन्न झालं. वर्तमानाशी संपर्क तुटल्यासारखाच झाला. शरीर ताठल्यासारखे झाले असले तरी एक सूक्ष्म कंप सबंध शरीरामध्ये जाणवत होता. माझा श्वासोच्छवास मला थंडगार निर्जीव वाटत होता.
एक संवेदना मात्र जागी होती. कानांची. ते सारखे फोनकडे लागले होते. वाटत होतं अजूनही एखादा फोन येईल. ‘ती बातमी’ खोटी आहे. डॉक्टर आजारी आहेत. त्यांना रूग्णालयात ठेवलं आहे. कांचनला इकडे ताबडतोह पाठवा.
पण वाईट बातम्या कधीच खोट्या ठरत नाहीत…. (पान क्रमांक 373)
(डॉक्टरांचा 2 मार्च 1986 नाटकाच्या दौऱ्यावर मृत्यू झाला.)
माझ्या विसाव्याची तीन ठिकाणं आहेत एक दार बंद केलेली खोली…दुसरं रात्रीचा अंधार…
आणि तिसरी माझी उशी…हे तिघे माझे जिवलग आहेत.कारण तिघेही-अबोल आहेत.
तटस्थ आहेत.निर्विकार आहेत. यातील कुणीही मला- सहानुभूती दाखवीत नाही.मला गोंजारीत नाही.माझी कीव करीत नाही.पण माझं दुःख पोरकं मात्र नाही.आईनं बाळाला जसं छातीशी कवटाळावं तसं मी त्याला काळजाशी धरलं आहे. कारण-मी स्वतःहून स्वीकारलेलं हे सतीचं वाण आहे.
सांभाळा…. तुमचीच – कांचन,
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply