दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून केंद्रीय आयुष मंत्रालया तर्फे साजरा करण्यात येतो.
गत १५ ते २० वर्षांपासून याविषयी आयुर्वेद क्षेत्रातील जाणकारांकडून मागणी होत होती. इतर शाखांचा ‘डॉक्टर डे’ मान्यता प्राप्त आहे, पण भारतीय उपचार पध्दती असलेल्या आयुर्वेदाचा कुठलाही दिनविशेष नव्हता. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर आयुषचा स्वतंत्र प्रभाग असणारे केंद्रीय मंत्री यांनी कोणत्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा करावा म्हणून मते जाणून घेतली. काहींनी २७ फेब्रुवारी हा दिवस सुचविला.
१९२० साली याच दिवशी नागपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारताची आरोग्यपध्दती आयुर्वेद ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती पण बहुसंख्य आयुर्वेदप्रेमींनी दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ या दिवसाचाच आग्रह धरल्यावर तो मंजूर करण्यात आला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply