भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमारामध्ये मुख्यता दोन प्रकारच्या नौका अर्थात जहाजा असत गुराब आणि गलबत..
गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.
गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.
या दोन मुख्य नौकाशिवाय शिवाड, तरांडी, तारू, माचवा, पारव, जुग, फ्रिनेट अशा अनेक प्रकारच्या जहाजा मराठा आरमारामध्ये सामील होत्या. सभासदकार हा महाराजांच्या आरमारातील जहाजांची संख्या ७०० देतो परंतु अंदाजे ६४० नौका मराठा आरमारात असाव्यात …
आज राष्ट्रीय नौका दिनाप्रसंगी भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सर्व शिवप्रेमींना राष्ट्रीय नौका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
Leave a Reply