भारतात २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण कायदा १९८६’ अस्तित्वात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. यामध्ये खासगी, सरकारी आणि सहकारी संस्थांचाही समावेश करण्यात आला आहे.
आपल्याकडून विकण्यात येत असलेल्या वस्तू किंवा सेवेतून ग्राहकाची लुबाडणूक होणार नाही याची काळजी घेणे कोणत्याही विक्रेत्याची नैतिक जबाबदारी असते. उत्पादनाची मूळ किंमत आणि अंतिम ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत यांच्यात मोठी तफावत असल्यामुळे मध्यस्थांची (एजंट) संख्या कमी करणे शक्य आहे.
ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात किंवा योजना असू नये.
वस्तूमध्ये भेसळ असता कामा नये. ग्राहकांकडून घेण्यात आलेल्या मोबदल्याच्या बदल्यात त्या दर्जाची वस्तू किंवा सेवा पुरवली गेली पाहिजे.
ग्राहकांचे भौतिक संरक्षण करणे.
वस्तूची किंमत कमी करणे शक्य असल्यास ती कमी करून ग्राहकांना त्याचा फायदा मिळवून देणे.
ग्राहकांच्या तक्रारीचे योग्य पद्धतीने निरसन करणे.
ग्राहकांचे आर्थिक हित लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे.
ग्राहकांना खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणे.
ग्राहकांना उत्पादन आणि बदलत्या बाजारपेठेबद्दल माहिती देऊन साक्षर करणे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply