राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ, व्याख्यानकार, लेखक आणि कवी व टिळक चरित्राचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांचा जन्म २६ मे १९६० रोजी झाला.
एनएसडीएलमध्ये उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत असतानाच एक लेखक म्हणून टिळक यांनी स्वत:ची वेगळी छबी निर्माण केली आहे. चंद्रशेखर टिळक हे एन एस डी एल चे माजी संचालक असून गेली ३४ वर्षे इन्व्हेस्टमेंट सेक्टर मध्ये कार्यरत आहेत.
चंद्रशेखर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहीले आहे. त्याशिवाय त्यांनी मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधीत नोकरी केली आहे. १ एप्रिल १९९२ साली त्यांची सेबीवर प्रतिनियुक्ती झाली. भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधुन प्रतिनियुक्तीवर जाणारे सर्वात तरूण आणि पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहे. अनेक अर्थिक घोटाळ्यांची त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून तपासणी केली आहे. जागतिक मंदी या विषयावर त्यांनी ७ महिन्यात ९० भाषणे केली होती. आणि त्यांचे एकुण ९ अंदाज बरोबर ठरले होते.गेली २५ वर्षें टिळक सातत्याने अर्थसंकल्पीय विश्लेषणाचे कार्यक्रम करतात. केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रभावी भाष्यकार म्हणून त्यांचे नाव साऱ्या देशभर गाजत असते. अर्थकारण व गुंतवणूक या विषयांशी संबंधित त्यांची सुमारे तीन हजार भाषणे झाली असून सुमारे दोन हजार लेख प्रसिद्ध झाले आहेत. आजपर्यंत त्यांचे विविध विषयांवरचे १५००हून जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ते अनेक संस्थांमध्ये मानद व्याख्याता आहेत.
जागतिक मंदी आणि सामाजिक भारत, जागतिक मंदी आणि आपण, जागतिक मंदी आणि आपली गुंतवणूक, अर्थसंकल्पीय विष्लेषण, अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक, भारतीय भांडवल बाजार: २०१० आणि नंतर, आर्थिक घोटाळे आणि आम्ही, गुंतवणुकीचे समाजशास्त्र, गुंतवणूकीचे मानसशास्त्र, गुंतवणुकीतील धोक्यांचे नियोजन, स्वेच्छानिवृत्तीचे आव्हान, बदलते अर्थकारण – बदलते समाजकारण, जे.आर.डी. टाटा : शतकोत्तर विचार, आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक, ‘वंदे मातरम्’चा कालखंड, आजच्या संदर्भात वंदे मातरम् , आजचे अध्यात्म, चला नवा भारत घडवूया, राष्ट्रनिर्मितीचे आव्हान, राष्ट्रवादाची बदलती संकल्पना, अल्केमिस्ट टू सी गल, व्हाया यू कॉन विन अशा विविध विषयांवर चंद्रशेखर यांची व्याख्याने झाली आहेत.
चंद्रशेखर टिळक यांनी थेंब थेंब आयुष्य ( कविता संग्रह ), वही आयुष्याची ( कविता संग्रह ), मनरंगी ( कविता संग्रह ) , गुंतवणूक तुमची माझी ( लेख संग्रह ), मनातलं मनातच या नवीन पुस्तकांबरोबरच गुंतवणूक पंचायतन ( चौदावी आवृत्ती) , मार्केट मेकर्स ( तिसरी आवृत्ती) , मला भावलेले गुलजार ( दुसरी आवृत्ती) ,मल्हार मनाचा ( दुसरी आवृत्ती) या नऊ विविध विषयातील पुस्तकांचे लेखन एकाचवेळी केले असून या सर्व पुस्तकांचे प्रकाशन जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आले होते.शिवाय त्यांच्या व्याख्यानांच्या ५ सीडी.चेही प्रकाशन झाले आहे. ‘गुंतवणूक पंचायतन’ या अभ्यासपूर्ण पुस्तकात त्यांनी जगातील श्रेष्ठ गुंतवणूक-गुरुंच्या कार्यकर्तृत्वावरील माहिती दिली आहे. मला भावलेले गुलजार या पुस्तकात चंद्रशेखर टिळक यांनी ज्येष्ठ गीतलेखक गुलजार यांच्या विविध काव्यांविषयी या पुस्तकात लिहिलं आहे. गुलजार यांच्या कविता वाचल्यावर त्यांना काय वाटलं ते त्यांनी इथं मांडलं आहे. ‘मल्हार मनाचा’या पुस्तकात त्यांनी जगलेले, अनुभवलेले ते आठवणींचे कवडसे आपल्यासमोर मांडलेत.
चंद्रशेखर टिळक यांना सिकॉम- आनंद भडकमकर ॲवॉर्ड, जायंटस् ॲवॉर्ड, कैलासभाई मेहता पुरस्कार, युनायटेड वेस्टर्न बँक पुरस्कार, नॅशनल सेव्हिंग्ज ऑर्गनायझेशन पुरस्कार,डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.
चंद्रशेखर टिळक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply