टाकोज हा मेक्सिकन पदार्थ असून अमेरिकेत आणि कॅनडा मध्ये दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय टाकोज दिवस साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस नॅशनल टाकोज डे म्हणून मानतात.
अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील सॅन अँटोनियो या शहरातील पत्रकार रॉबर्टो एल. गोमेझ या दिवसाचे संस्थापक आहेत. हा दिवस त्यांनी १९६० मध्ये पहिल्यांदा साजरा केला असे म्हटले जाते.
मेक्सिको मध्ये ३१ मार्च रोजी टाकोज दिवस साजरा केला जातो.अमेरिकन वर्षाला ४.५ हून अधिक अब्ज टाकोज खातात.
आज राष्ट्रीय टाकोज दिवसाच्या निमित्ताने अमेरिकेतील अनेक रेस्टॉरंटनी टाकोजवर सूट दिली आहे. टाकोज प्रेमींना टाकोज दिनाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply