आज दिनांक २४ जुलै २०२०. आजचा दिवस औष्णिक तंत्रज्ञांसाठी खूप खास आहे , कारण आज जगभरात औष्णिक तंत्रज्ञ दिन (National Thermal Engineer Day) साजरा केला जातो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की , हा दिवस आजच का बरं साजरा केला जातो? तर ह्यांचं उत्तर आहे की , संपूर्ण वर्षभरात आजच्या दिवशी सगळ्यात जास्त उष्णता असते असं मानलं जातं आणि औष्णिक तंत्रज्ञांचा उष्णतेशी आणि ऊर्जेशी खूप जवळचा संबंध असतो.
आज ह्या दिनाला ६ वर्षं पूर्ण होऊन ७ वं वर्ष लागलं. २४/०७/२०१४ रोजी Advance Thermal Solutions , Inc (ATS) ह्यांनी हा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्यामागे संस्थेचा एकमेव हेतू हाच होता की , समाजासाठी प्रसंगी जीवावर उदार होत काम करणाऱ्या समस्त तंत्रज्ञांना योग्य ती ओळख मिळावी.
ह्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सगळ्यात जास्त ऊर्जेशी संबंध येतो. म्हणजेच रासायनिक क्षेत्र (Chemical Industry) , अणूऊर्जा क्षेत्र (Atomic Energy) , यांत्रिक क्षेत्र (Mechanical Industry) इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती , हे ह्या क्षेत्राच्या हातात हात घालूनच कार्य करीत असतात.
एकंदरीत पहायला गेलो तर आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चला तर मग त्यांचे Social Media वर #NationalThermalEngineerDay हा हॕशटॕग वापरुन , त्यांचे समाजासाठी चाललेल्या अनन्यसाधारण कार्याचे आभार मानून , Lockdown च्या काळात एखादं औष्णिक ऊर्जा क्षेत्राची माहिती देणारं आॕनलाईन सत्र भरवून ह्यांचे आभार व्यक्त करुयात.
— आदित्य दि. संभूस.
संदर्भ – आंतरजाल.
Leave a Reply