आपल्याला लहानपणी खारुताईचं चित्र असलेलं एक वॅफल पॅकेट मिळायचं. बऱ्याच जणांना ते आवडत होतं. पण वेळ जसा पुढे सरकत गेला तसं ते पॅकेटही कालबाह्य होत गेलं. बऱ्याच लोकांना ते अजून डोळ्यांसमोर येत असेल पण काय करणार ते पॅकेट आता मिळत नाही. अशांना मी आज वॅफल कसं बनवतात ते सांगणार आहे. चला तर मग ! लागू तयारीला.
साहित्य –
१) २ चमचे मॅपल सरबत
२) अर्धा कप लवकर शिजणारे ओट्स
३) दीड कप बेकिंग पावडर
४) पावणे दोन कप पीठ
५) एक चिमूट मीठ
६) एक चमचा व्हॅनिला सिरप
७) एक चमचा व्हिनेगर
८) पाव कप लोणी
९) दीड कप दूध
कृती –
सर्वप्रथम लोणी एका वाटीत , एका वाटीत दूध आणि एका बाउल मध्ये सगळे कोरडे पदार्थ घ्या. लोणी वितळवून घ्या. लोणी , दूध आणि सगळे कोरडे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्या. नंतर त्या मिश्रणाला वॅफल मेकर पात्रात घालून २५ ते ३० मिनिटं व्यवस्थित भाजून (bake) घ्या. थोडं थंड झाल्यावर तुमचे वॅफलस् तयार आहे. एवढ्या प्रमाणात साधारणतः ८ ते ९ वॅफलस् बनतात.
आज ही पाककृती टाकण्यामागचा उद्देश एकच आहे की , आज परदेशीय राष्ट्रीय वॅफल दिवस आहे. आता तुम्हाला कृती समजली आहे. मग कसली वाट पहात आहात , लगोलग कामाला लागा आणि वॅफलस् बनवा आणि हो मला तुम्ही बनवलेले वॅफलस् पाठवायला विसरू नका.
– आदित्य दि. संभूस.
#National Waffles Day
Leave a Reply