नवीन लेखन...

नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतरचे पुनर्वसन

natural calamities and its effects on rehabilitation

नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्या क्लिप्स आणि बातम्या बघितल्याने अंगावर काटा उभा राहीला. भूकंप होण्यामागची काही करणं आपण थोडक्यात बघणार आहोत. खाणकाम हे प्रमुख मानले जाते. काही देशांमध्ये कोळसा, अ‍ॅल्युमिनियम, पेट्रोलियम पदार्थ, ग्रेनाइड आणि अन्य काही खनिज पदार्थांसाठी उत्खनन केले जाते. यासाठी मोठे स्फोट घडविले जातात. उत्खननामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी भूगर्भात तीव्र कंपने होतात. स्फोट हे त्याचे प्रमुख कारण असून वायू आणि भूगर्भातील द्रव पदार्थाची गती त्यामुळे वाढते. काहीवेळा दोन मोठमोठ्या प्लेट केमेकांवर टक्करतात तर एखादी प्लेट कमकुवत असेल तर ती कणखर प्लेटच्या खाली दबली जाते आणि मग ती स्वत:ला विशिष्ठ पातळीवर स्थिर होण्याचा प्रयत्न करते या सर्व हालचालीत बऱ्याच वेळा भूकंपाचे धक्के जाणवतात.

ज्वालामुखी स्फोट अथवा सुनामीमुळे जमीनीखाली लाव्हारस, राख, पर्वत आणि विविध प्रकारचे वायू निघाल्यामुळे त्या ठिकाणी शून्याची स्थिती तयार होते. तो भरण्यासाठी झालेल्या भूगर्भिय घटनांमुळे पृथ्वी हलते. त्यातून उत्पन्न होणारे कंपन म्हणजे भूकंप. याबरोबर भूगर्भातील विविध वायू आणि पर्वतातील बदल होतो. त्यांच्यातील जोराच्या धडकेमुळे बल तयार होते आणि त्यातून मोठा धक्का बसतो. ज्या केंद्रस्थानी तो बसतो त्याला केंद्रबिंदू आणि ज्या ठिकाणी जाणवतो त्याला भूकंपक्षेत्र संबोधले जाते.

मुंबई शहरातील जनतेच्या मुलभूत गरजा भागविताना पालिका/शासनाला तारेवरची कसरत करावी लागते त्यात घरांसाठी उभ्या विकासाशिवाय पर्याय नाही. त्यात अश्या उंचच उंच बिल्डींग्सना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आणि काही दु:खद घटना घडलीच तर काही खरे नाही. अश्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि यंत्र-सामुग्रीची आवश्यकता असते, त्या संबंधित पालिका/प्रशासनाकडे असणे आणि त्याहूनही त्या पूर्णत: कार्यक्षम आणि सुस्थितीत असणे आणि त्या हाताळण्याचे तंत्रशुद्ध ज्ञान असलेला कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे.

नुकत्याच येऊन गेलेल्या रौद्र, भीषण आणि प्रलयंकारी भूकंपाने नेपाळमध्ये जीवित आणि वित्त हानीमुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेच पण नागरिकांचे पुनर्वसन करतांना निसर्गिक समस्यांना तोड द्यावे लागत आहे.

आगामी काही वर्षांमध्ये मुंबईत भूकंपाचे धक्के बसणार असल्याची भीती भूगर्भशास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. भूकंपाचे धक्के मोठ्या तीव्रतेचे असण्याची शक्यताही वर्तवली आहे.

मुंबईत आडव्या विकासाला जागाच उपलब्ध नसल्याने उभा विकास काही दशकांपासून अव्याहत चालू आहे. गगनचुंबी इमारती बांधल्या जात आहेत. विशेषत: विशिष्ठ मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना अधिक धोका आहे. शिवाय भ्रष्टाचारामुळे इमारतींचे बाधकाम करतांना काही नैसर्गिक आपत्तींच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत नाही अशी ओरड आहे. मग अश्या बांधल्या जाणाऱ्या इमारतींसाठी ही धोक्याची घंटा समजावी का? मुंबई महापालिका उंच इमारतींच्या वाढत्या मजल्यांवर आणि वाढत्या इमारतींबाबत गंभीर नाही अशी खंतही भूगर्भशास्त्रज्ञ मुलाखतीत व्यक्त करतात. त्याचबरोबर मुंबईतील सर्व परिसराचा किंबहुना महाराष्ट्राचा भूगर्भातील उलाढालींचा अभ्यास करवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणीही करतात.

सिंह, कुत्रे, गाय, बैल आदी प्राण्यांना ४० ते ४५ मिनिटे आधीच भूकंपाची जाणीव होते असे आत्तापर्यंतच्या अनुभवाने जाणवले आहे. हे प्राणी आपल्या जागेवर पळत सुटतात तसेच विचित्र आवाज काढतात. त्यामुळे त्यांना आधीच अंदाज येतो असे काहींचे म्हणणे आहे. असो.

वरील अंदाज जर काही प्राण्यांना येत असतील तर आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात मानवाला का येऊ शकणार नाही. मानवाला प्राण्यांपेक्षा प्रगत बुद्धीचे वरदान आहे मग काय शक्य नाही? आज आपण चंद्र, मंगळ आणि त्यापलीकडील ग्रहांचे संशोधन आणि अभ्यास करतो आहोत. मिनिटा/सेकंदाचे गणित संगणकाच्या मदतीने अचूकपणे करणे संभाव्य असतांना आपल्याला रसायन, भौतिकशास्त्राच्या आणि अत्युच्य प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे पृथिवीच्या पोटातील घडामोडी/हालचाली का सांगता येणार नाहीत? काय अडचण आहे? डॉक्टर मंडळी शरीरातील आजार आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया काही प्रगत उपकरणांनी करतात तर मग भूकंपासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तीचा अंदाज का करता येणार नाही? असो.

आता आपल्याला मुख्य मुद्याकडे वळायचे आहे आणि तो म्हणजे पुनवर्सन. भूकंप आणि पूर अश्या नैसर्गिक आपत्तीनंतर झालेल्या जीविती आणि वित्त हानीच्या अंदाजानुसार शहरातील/गावातील/खेड्यातील नागरिकांचे पुनर्वसन करतांना शासनातील संबंधित खात्यांना असंख्य अडी-अडचणींना तोंड द्यावे लागते.

पुरात किंवा भूकंपात इमारत पडल्याने किंवा पुराच्या पाण्यात घरातील अतिमहत्वाचे दस्तऐवज गहाळ झाल्याने त्यांचे त्या इमारतीतील जागेच्या हक्काबाबतचे पुरावेच नष्ट झाल्याने भविष्यात समस्या निर्माण झाल्यास त्यांची काय अवस्था होईल? तसेच ज्या इमारतीत जे नागरिक राहत होते त्यांना त्याच जागी इमारत बांधण्यासाठीची आर्थिक मदत कोण आणि कधी करणार याच्या संबंधीचे कायदे किंवा माहिती पालिका/शासन दरबारी लिखित स्वरुपात आहे किंवा कसे?

एकत्रकुटुंब पद्धतीमध्ये घरातील कर्त्याचे निधन झाल्यास कुटुंबावर काय परिस्थिती येईल आणि असा गुंता कसा सोडविणार?

जर इमारतीत भाडेकरू राहत असतील आणि अशी नैसर्गिक आपत्ती ओढविली तर भाडेकरूंच्या घराचे काय?

वरील सर्व समस्यांची उकल करण्यासाठी सध्याचे कायदे आणि शासनाची परिपत्रके सक्षम आहेत का? आपद्ग्रस्तांना न्याय कसा मिळणार?

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..