नवीन लेखन...

नैसर्गिक वायू

नैसर्गिक वायू वीजनिर्मिती, खतेनिर्मिती, स्वयंपाकघरातला गॅस या व अशा प्रकारच्या उपयुक्त कामासाठी वापरता येतो. पण सध्या जगभर हा वायू वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठ्या प्रमाणात दाबाखाली साठवून वापरला जात आहे. मात्र हा वायू मोठ्या प्रमाणात साठविता येत नाही व त्यामुळे त्याची टाकी वारंवार भरावी लागते. सी.एन.जी हा कोरडा वायू असतो, म्हणजेच त्यात बुटेन व प्रोपेन हे वायू वाजवी प्रमाणात नसतात. हा गॅस मिथेन आणि इथेन व पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात प्रोपेन गॅसच्या मिश्रणांनी बनलेला असतो. अगदी अल्प प्रमाणात काही निष्क्रिय वायूदेखील त्यात मिसळलेले असतात. द्रवरूप दिलेल्या नैसर्गिक वायूला एल.एन.जी. (लिक्विफाइड नॅचरल गॅस) संबोधतात. सी.एन.जी. जळत असताना कमी प्रमाणात बाष्पनिर्मिती होते व त्यामुळे त्याची ज्वलनक्षमता वाढीव असते व त्यामुळे वाहनाला वेग देण्याची क्षमता वाढते. वाहनाचा वेग घेण्याची क्षमता ठरविणारा ऑक्टेन क्रमांक पेट्रोलचा ९१ (स्कूटर कार, रिक्षासाठी) आणि नैसर्गिक वायू वीजनिर्मिती, खतेनिर्मिती, स्वयंपाकघरातला गॅस या व अशा प्रकारच्या उपयुक्त कामासाठी वापरता येतो. पण सध्या जगभर हा वायू वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठ्या प्रमाणात दाबाखाली साठवून वापरला जात आहे. मात्र हा वायू मोठ्या प्रमाणात साठविता येत नाही व त्यामुळे त्याची टाकी वारंवार भरावी लागते. सी.एन.जी हा कोरडा वायू असतो, म्हणजेच त्यात बुटेन व प्रोपेन हे वायू वाजवी प्रमाणात नसतात. हा गॅस मिथेन आणि इथेन व पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात प्रोपेन गॅसच्या मिश्रणांनी बनलेला असतो. अगदी अल्प प्रमाणात काही निष्क्रिय वायूदेखील त्यात मिसळलेले असतात.

द्रवरूप दिलेल्या नैसर्गिक वायूला एल.एन.जी. (लिक्विफाइड नॅचरल गॅस) संबोधतात. सी.एन.जी. जळत असताना कमी प्रमाणात बाष्पनिर्मिती होते व त्यामुळे त्याची ज्वलनक्षमता वाढीव असते व त्यामुळे वाहनाला वेग देण्याची क्षमता वाढते. वाहनाचा वेग घेण्याची क्षमता ठरविणारा ऑक्टेन क्रमांक पेट्रोलचा ९१ (स्कूटर कार, रिक्षासाठी) आणि ९७ (महागड्या कारगाड्यांसाठी) असतो, तर सी.एन.जी.चा तोच ऑक्टेन क्रमांक १३० पर्यंत जातो. यावरून, त्याची इंधनक्षमता लक्षात येईल. आपल्या देशातील जमिनीच्या पोटात सुमारे १३,००० कोटी घनमीटर इतका नैसर्गिक वायू साठलेला आहे. त्यातील ७,००० कोटी घनमीटर वायू आपण सहज बाहेर काढू शकतो व गरजेनुसार वापरू शकतो. इंधनाच्या दृष्टिकोनातून १०००१ घनफूट नैसर्गिक वायू हा सुमारे नऊ दशांश टन तेलाच्या तोडीचा असतो. तेव्हा, हा वायू पद्धतशीरपणे बाहेर काढला तर आपण लाखो टन तेलाच्या क्षमतेचा सी.एन.जी. मिळवू शकतो. हा वायू पेट्रोल व डिझेल तेलाच्याऐवजी वापरता येतो हे सिद्ध झाल्याने जगभरात त्याचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे लोण पसरले आहे, कारण या वायूंवर धावणाऱ्या वाहनांची इंधनक्षमता, पेट्रोलवर धावणाऱ्या आजच्या घडीला उत्कृष्ट इंजिनापेक्षा २० ते २५ पटीने जास्त असते.

जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..