लवंगेचे तेल उर्फ क्लोव ऑइल हा दातदुखीवरचा सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. लवंगेचे थोडे तेल काळ्या मिर्या्सोबत मिसळा व ते कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखणार्या दातावर ठेवा.
मोहरीच्या तेलाने देखील दातदुखी कमी होते. हे तेल व मिठाचे मिश्रण हिरडीच्या दुखर्या भागावर चोळा.
लिंबाच्या रसाच्या थेंबांनी देखील दातदुखी कमी करता येते.
दुखर्या दातावर किंवा हिरडीवर कांद्याचा ताजा कापलेला तुकडा ठेवल्याने ही दातदुखी कमी करता येते.
दातदुखीवर उपयोगी झाडपाल्याचे अर्क वापरून आपणही घरच्याघरी माउथवॉश बनवू शकता – कॅलेंड्युला (कॅलेंड्युला ऑफिसिनालिस), मर्र (कॉमिफोरा मर्रा), सेज (साल्विया ऑफिसिनालिस). बेसिल, मार्जोराम किंवा ऍसाफेटिडासारख्या इतर वनस्पतींचाही वापर ह्यासाठी करता येईल.
दुखर्यान दाताला बाहेरील बाजूने (गालावर) बर्फाचा खडा दाबून धरल्यानेही दातदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.
अचानक दातदुखी सुरू झाल्यास अति गरम, अति गार तसेच अति गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा अन्यथा दुखणे वाढेल.
आहाराच्या सवयी बदलणे, भाज्या तसेच फळे भरपूर प्रमाणात खाणे आणि विशेषतः जंक फूड न खाणे ह्याने दातदुखी टाळता येते.
Leave a Reply