1985 सालची गोष्ट. तेव्हा मी फक्त रंग किरण चिकित्सा व चुंबक चिकित्सा करत होतो. टेल्कोतले एक गृहस्थ त्यांच्या मित्रासाठी चुंबक चिकित्सेची माहिती घेण्यासाठी आले. माझ्याकडून माहिती घेऊन गेले. साधारणपणे अर्ध्यातासात त्यांचा मुलगा आला व म्हणाला- आईला त्रास होतोय तुम्हाला बोलावले आहे. मला जरा संशय आला. कारण हा माणूस मित्रासाठी माहीती घ्यायला आला व आता मला बायकोसाठी घरी बोलावतो आहे. म्हणून मी काहीही न घेता त्यांचेकडे गेलो. त्यांचे पत्नीला खूप धाप लागली होती. त्या बेडवर बसून पाय सरळ ठेऊन काटकोनात वाकून तोंडाने जोरजोरात श्वास घेत होत्या. पेशंट तर समोर होता. आणि माझेकडे काहीच नाही. तातडीने उपचार करणे तर आवश्यक होते. मी त्या वेळी तळहातात असणार्या चुंबकीय शक्तीचा वापर करण्याचे तंत्र वापरले. ह्या पध्दती प्रमाणे आपला उजवा हात(दक्षिण धृव) गळ्याचे खळग्यावर आणि डावा हात (उत्तर धृव) दोन्ही बरगड्या जिथे मिळतात तिथे ठेवायचा असतो. पण पेशंट हे ऐकण्याच्या व करण्याच्या मनस्थितीत नव्हता व त्रास तर होत होता. लेडी पेशंट असल्याने मी माझे हात वापरू शकत नव्हतो. मी त्यांचे यजमानांना त्यांचे (यजमानांचे) हात बाईंना वरील प्रमाणे ठेवण्यास सांगितले व मी सांगेपर्यंत हात काढायचे नाहीत असेही सांगितले. मी घड्याळ लावून निरीक्षण करत बसलो.
पहिल्या पांच मिनीटांत काहीच फरक पडला नाही. दहाव्या मिनीटाला त्या वाकलेल्या बाई सरळ होऊन आचके देत तोंडाने श्वास घेत होत्या. पंधराव्या मिनीटाला त्या तोंड बंद करून शांतपणे नेहमी सारखा सामान्य श्वास घेऊ लागल्या. मी नवर्याला हात बाजूला करण्यास सांगितले. त्यांचा त्रास पूर्णपणे थांबला होता.
दमेकरी पेशंटना श्वासाचा त्रास होतो तेव्हां ह्या प्रयोगाने फायदा होतो. पंप लागत नाही.
— अरविंद जोशी B.Sc.
Leave a Reply