नाती -हवीहवीशी आणि त्रासदायकही ! निसर्गदत्त आणि बनविलेली ! जुळलेली आणि लादलेली ! निरपेक्ष आणि अपेक्षांचे ओझं असलेली ! एकतर्फी आणि दोन्ही बाजूंनी पेललेली !
प्रेम ,वात्सल्य ,माया ,आदर , भीती ,करुणा ,अहंकार ,राग ,द्वेष आणि अशा अनेक भावनांनी निथळणारी !! चोवीस तास आसपास – पिच्छा न सोडणारी . मग कधीतरी त्यांचा अनामिक स्ट्रेस वाटू लागतो. ती झुगारून द्यावीशी वाटतात. विशेषतः नात्यातील व्यक्तींच्या वागण्याचे संदर्भ लागेनासे झाले की निर्नात्याची ओढ लागते.
स्वच्छ, मोकळ्या नातेविरहित अवकाशाचे आकर्षण वाटू लागते. काही नाती विसर्जित करावी असे वाटते. किती नाती ,किती काळ आपण घेऊन फिरत असतो – त्यातील काही बिनकामाची ,उपयुक्तता सरलेली , ओझी म्हणून उरलेली ! बहुतांशी वेळी फक्त आठवणीत उरलेली !
मग जाताना सगळं विसर्जित करून मोकळ्या हातांनी /निर्विकार मनाने गेलेले काय वाईट ? BAGGAGE तरी कमी होईल .
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply