डॉ. कविता पवन लड्डा, लातूर, महाराष्ट्र. यांचे द्वारे महत्वपुर्ण माहीती खास तुमच्यासाठी.
शुक्रवारी श्राध्द पक्ष संपून एक तारखेपासून घट स्थापना होऊन नवरात्रीचा प्रारंभ होत आहे. भगवती आदिशक्तीची पुजा संपुर्ण देशात आपापल्या रितीप्रमाणे मांडली जाते. कित्येक लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करुन आपली भक्ती व्यक्त करतात. उपवासाच्या निमित्ताने वजन कमी करण्याचे यंदा व्रत घेऊ या , यंदा शक्तीच्या उपासनेत उर्जा खर्ची घालू या. आपण उपवास तर करतो आणि मग दिवसभर काय खातो तर कुठे साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा, रताळी असे पिष्टमय पदार्थ. बाद करा हे सर्व पदार्थ आपल्या आहारातून ! नवरात्रीच्या उपवासाची एक नविन संकल्पना रुजवू या. सर्वात आधी संकल्प करा मला माझे वजन या नवरात्रीत कमी करायाचेच आहे.
नवस आरोग्याचा – पुढे दिलेली माहिती ही आमच्या नावासहित अधिकाधिक ग्रुपपर्यंत पोचवा, जेणेकरून संपुर्ण देशातील आई भवानीच्या भक्तांना याचा योग्य लाभ मिळेल. डॉ. कविता पवन लड्डा, लातूर –महाराष्ट्र.
उपवासाच्या निमित्ताने का होईना लठ्ठपणा कमी करण्याची सुरुवात करणार . दस-याला घालायला जे नवीन कपडे निवडले आहेत ते थोडे आधिच्या नंबरचे निवडा, दस-याला मी ते घालणारच. अर्थात त्या कपडयात मी फिट बसेल असा मनाशी निर्धार करा. त्यासाठी करावा लागेल व्यायाम. तुम्ही विचार कराल आधीच उपवास अजून कुठे व्यायाम करुन थकवा उद्भवू दयायाचा. पण मनातून हा गैरसमज काढून टाका, की व्यायामाने थकवा येणार आहे. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास थकवा न येता दिवसभराचे काम करण्यास उत्साह येतो, आपला स्टॅमिना वाढतो, शिवाय वजन कमी होते, पण अजून एक विचार मनात येणार की देवीच्या भजन पुजनात मध्येच कशाला व्यायामाचा अडथळा, तर नाही आपण भक्तीच्याच मार्गाने व्यायामाचा अवलंब करणार आहोत. तुम्हाला रोज 60 ते 90 मिनिटे व्यायाम करायचा आहे. त्यासाठी….
1) देवीच्या मंदीराला संपुर्ण 108 प्रदक्षिणा घाला.
2) देवीला लोटांगण घालून 11 ते 21 नमस्कार घाला.
3) देवीच्या मंदीराला जाण्यासाठी पायी जाण्याचा पर्याय निवडा, पण दुरचे मंदिर निवडा.
4) आपण केलेल्या चुकांची उठ-बशा करुन देवीला क्षमा मागा.
5) आपले कान हाताने धरून 50 ते 100 उडया जागच्या जागी मारा.
6) उशीरा रात्री जागून, नाचून – नाचून भजनात दंग व्हा किंवा गरबाच्या कार्यक्रमात सक्रियपणे सामिल व्हा.
याशिवाय जमल्यास नियमितपणे 45 मि. चालण्याचा व्यायाम करावा.
जमतील ना साधे सोपे हे व्यायामाचे पर्याय !
वरील दिलेले व्यायाम प्रकार सर्वसाधारणपणे सर्वांना चालतात. तरी योग्य लाभ प्राप्त होण्यासाठी व वैयक्तिक रित्या कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी 9326511681 या व्हाटस्अॅप नंबरवर चौकशी करू शकता….जर आपण कुठल्याही व्याधीने ग्रस्त असाल किंवा वयोवृध्द असल्यास सर्व व्यायाम प्रकार आपणास चालणार नाही, त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा परामर्श आवश्यक होय किंवा वरील मोबाईल नंबरवर मेसेज करावे.
यासोबत खाण्यापिण्याचे वेळापत्रक देखील सांभाळांयचे आहे. या नवरात्रीला आपल्याला खायचे आहे, भरपुर फळे, दुध, ताक आणि राजगीरा.
खाण्या पिण्याचा दिनक्रम योग्य तरहेने होण्यासाठी दहा दिवसाचा एक वेळापत्रक बनवून घेऊ …
** दररोज सकाळी उठल्याबरोबर १ ग्लास गरम गरम पाणी फुंकुन फुंकुन प्यावे.
** नंतर बिना साखरेचे विलायची युक्त दुध किंवा कमी साखरेचा चहा.
* रोज नाश्ता करण्यापुर्वी धणे पाणी ,ओवा पाणी किंवा जिरा पाणी अवश्य घ्यावे. हयामुळे पचन व्यवस्थित होते, व शरीरातील विषाक्त द्रव्यांचे ज्वलन होण्यास मदत होते. * फळे नेहमी ताजी घ्यावीत व फ्रिजमधली गार नको . तसेच फळावंर काळया मि-याची पुड आठवणीने टाकावी.
** धणे पाणी ,ओवा पाणी किंवा जिरा पाणी बनविण्याची कृती :– दोन चमचे अर्धवट कुटलेले धणे किंवा ओवा किंवा जिरे घ्यावे. एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजू दयावे. व सकाळी चांगले मसळून – गाळून प्यावे.
दिनांकः 1 ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 10-15 खिसमिस व 4 बदाम
दुपारी 12 ते 2 2 संत्री
दुपारी 2 ते 5 1-2 ग्लास ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा पोळी भेंडीची भाजी
दिनांकः २ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 आक्रोड1-2 व 1-2 जर्दाळू
दुपारी 12 ते 2 2 मोसंबी
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा थालीपिठ व कढी
दिनांकः ३ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 1 उकडलेला बटाटा
दुपारी 12 ते 2 अननस
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 काकडी कोशिंबीर व राजगीरा चपाती
दिनांकः ४ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 6 बदाम व 20 चारोळी
दुपारी 12 ते 2 टरबुज
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 राजगिरा लाही व दुध
दिनांकः ५ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 4 खारीक व 4 बदाम
दुपारी 12 ते 2 पपई
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा चपाती व गोल भोपळयाची भाजी
दिनांकः ६ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 20 मनुक्के 4 अंजीर
दुपारी 12 ते 2 डाळिंब
दुपारी 2 ते 5 नारळ पाणी
संध्या 6 ते 8 2 ते 4 राजगीरा लाडू
दिनांकः ७ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 भाजलेले शेंगदाणे व गुळ
दुपारी 12 ते 2 तूपात परतलेले तालमखाणे
दुपारी 2 ते 5 नारळ पाणी
संध्या 6 ते 8 राजगीरा चपाती व राजगीरापानांची भाजी
दिनांकः ८ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 कॉफी व राजगीरा बिस्कीट
दुपारी 12 ते 2 कोथीबिंरीचा रस
दुपारी 2 ते 5 नारळ पाणी/ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा पिठाचा उपमा
दिनांकः ९ ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 एक वाटी घट्ट दही व मध 2चमचा
दुपारी 12 ते 2 उसाचा रस
दुपारी 2 ते 5 ताक/नारळपाणी
संध्या 6 ते 8 राजगीरा पोळी व काकडीची भाजी
दिनांकः १० ऑक्टोबर
सकाळी 7 ते 11 ओल्या नारळाचा खिस
दुपारी 12 ते 2 सफरचंद
दुपारी 2 ते 5 ताक/नारळपाणी
संध्या 6 ते 8 राजगीरा पोळी व कच्च्या पपईची कोशिबीर
** दिवस भरात अधुन मधुन बिना साखरेचे लिंबु पाणी प्यावे.
** दररोज रात्री झोपताना १ ग्लास गरम गरम पाणी फुंकुन फुंकुन प्यावे.
अशा प्रकारे नवरात्रीचे दहा दिवस हा आहारक्रम आपणास ठेवायचा आहे, जेणे करुन नक्कीच आई भवानी आपणास पावेल. हा आहार घेताना लक्षात घ्या, रोज वेगळया पदार्थांची निवड आपण केली आहे, त्यामुळे सर्व प्रकारची जिवनसत्वे आपल्या शरीरात जातील व आपणास कुठल्याही प्रकारे उपवासाने अशक्तपणा येणार नाही, राजगीरा हा पदार्थ मात्र दररोज वापरायचा आहे, कारण राजगीरा हे धान्य पचावयास खुप हल्के आहे, याने पोट तर भरते मात्र वजन वाढत नाही शिवाय या मध्ये भरपूर मात्रेत कॅल्शियमचे प्रमाण आहे. राजगीरा धान्य बाजारातून आणून स्वच्छ करुन घरी त्याच्या लाहया फोडाव्यात . गरम झालेल्या कडाई मध्ये थोडे थोडे राजगीरा टाकत जावे व हलवित राहावे, क्षणार्धात लाहया फुटतात. तसे तसे त्या बाजुला काढा हयाच लाहया मिक्सर मधून काढल्यास पीठ तयार होते याचीच आपण पोळी करुन घ्यावयाची आहे. यात शाबूदाना वा भगरीचे पीठ कालविण्याची आवश्यकता नाही
* कुठल्याही प्रकारे साखरेचा वापर करु नका.
* खूप खूप वेळ उपाशी राहु नका. थोडया थोडया अंतराने आपण खात राहायचे आहे. कारण आपण ऐकलेच असेल भुके पेट भजन ना होये, म्हणून आधी पोटोबा मग विठोबा ! * फळांचे मिल्कशेक करु नका, शक्यतो सर्व पदार्थ या काळात घरी तयार करून घेतलेले खावे.
* दुस-या दिवशी काय खायचे आहे त्याची तयारी आदल्या दिवशी करा, म्हणजे वेळेवर फजिती नको.
* गंभीर आजारांनी ग्रस्त, मधुमेही रुग्णांनी उपवास करु नये.
तर आशा आहे तुम्हाला हा उपवासाचा वेळापत्रक आवडेल व तुम्ही भक्तीभावाने याचा अवलंब कराल तर मग बोला अंबे आईचा उदो उदो !!! जय माता दी।
डॉ. सौ. कविता पवन लड्डा
आयुर्वेदाचार्य
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
लड्डा स्किन अॅण्ड हेल्थ केअर सेटंर
गर्भसंस्कार केंद्र, लातूर.
मो. 09326511681
*वजन कमी करण्यासाठी ०९३२६५११६८१ या व्हॉट्सएप नंबर वर अवश्य मेसेज करा….
आमच्या चिकित्सालयात लठ्ठ रूग्णांचे वजन कमी करण्याचे कार्य नियमितपणे व खूप प्रभावी ढंगाने यशस्वी रित्या चालते. मागच्या वर्षी याच वेळापत्रकाच्या मदतीने अनेक जणांनी खूप चांगल्या प्रकारे आपले वजन कमी केले.
आणि हो आपला अभिप्राय देण्यास नका विसरू !
Leave a Reply