नवीन लेखन...

नवी सुरुवात (जुळ्यांना वाढवताना)

साडे सात वर्षांपूर्वी, Gyanac ने जेंव्हा जुळी असल्याचं confirm केलं, तेंव्हा खरं तर काही मिनिटांसाठी आम्ही दोघेही निःशब्द झालो होतो. तसं पाहाता साहजिकच आहे; तरीही एका मुलासाठीच कशीबशी मानसिक तयारी केलेले आम्ही, जुळ्यांसाठी सर्वार्थाने तयार होतो का, हा एक मोठा प्रश्न होता.

नवरा IT वाला असला की बऱ्याच जणांना वाटतं तशी ‘त्या घडीला’ आर्थिक परिस्थिती उत्तम असली तरी; होतो त्या राहणीमानात जेंव्हा एका मुलाच्या संगोपन आणि संपूर्ण शिक्षणाची तयारी केलेली असते, त्यात अजून एका मुलाला accommodate करणं, हे सर्वार्थाने खरंच challenging आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे दोन मुलांसाठी लागेल एवढं (एकूण कुटुंबात) शारीरिक आणि मानसिक बळ, आमच्याकडे आहे का? “आपल्या आई-बाबांना आनंदाने जेवढं आपल्यासोबत राहायचं असेल तेवढं राहूदेत पण कामासाठी त्यांना आपण मुळीच बोलवायचं नाही” हा माझ्या नवऱ्याचा कटाक्ष होता, आणि तो मलाही पूर्णपणे मान्य होता. तरीही या काळात मदत लागणार हे ही निश्चित होतं. सुदैवाने आमचे दोन्ही आजी-आजोबा तब्येतीने मजबूत आहेत आणि या दुप्पट मुलांच्या खोड्यांमध्ये आपापल्या परीने सामील होत आहेत. गर्भारपणात मी घरीच होते आणि माझी देखील माझी तब्येत अगदी ठणठणीत होती, तरीही आई किंवा सासूबाई सोबत असायच्या. या काळात प्रामुख्याने मला माझी तब्येत, बाळांचं गर्भातील पोषण, जन्मानंतर त्यांची काळजी घेणे, त्या संबंधी शास्त्र समजून घेणे, गर्भसंस्कार आणि प्रामुख्याने जुळ्यांची गर्भधारणा कशी होते, याचा अभ्यास चालू होता. पहिल्याच स्कॅनमध्ये मला जुळ्या असल्याचं आणि तिसऱ्या महिन्यात त्या एकयुग्मज, म्हणजे identical असल्याचं कळून आलं होतं.

याने त्या एकसारख्या दिसणाऱ्या असतील याची उत्सुकता, आनंद होताच, पण मुलं सयामी (म्हणजे चिकटलेली) तर असणार नाहीत नं ही भीती वाटायची. कारण एकयुग्मजांना एकच भ्रूणपटल असतं, त्यामुळे कधीकधी ती चिकटलेली असू शकतात! पण पुढे पाचव्या महिन्याच्या स्कॅनमध्ये तीही शंका रद्द झाली.

घरात आणि बाहेर ज्यांना कळेल त्यांना आनंदीआनंद होत होता, आणि बहुतांशी एक प्रतिक्रिया यायचीच, की “हं, तुझ्या नवरा जुळ्यांमधला आहे ना, म्हणजे तुला जुळी होणारंच!” आणि माझ्या भुवया उंचावायच्या! कारण हे लॉजिक लावणंच मुळात चुकीचं आहे! हा गुण Genetically आईकडून मुलीला मिळतो, त्यामुळे माझ्या सासुकडून मला कसा काय ट्रान्सफर होईल बरं! (सिनेमा मधल्या ज्ञानामुळे ज्यांना असं वाटतं की जुळी, तिळी बनवायचं सामर्थ्य बाबाकडे असतं, तर ते पूर्ण चुकीचं आहे बरं!) हं, सांगते!

द्वियुग्मज fraternal (non-identical) जुळी मुलं एकाच वेळी दोन वेगळी अंडी शुक्रपेशींमुळे फलित झाल्याने होतात, तर एकयुग्मज किंवा identical जुळी मुलं निर्माण होतात, जेव्हा एक अंड आणि एका शुक्रामुळे तयार झालेलं युग्मक काही कारणाने विभाजीत होतो, आणि विभाजन झाल्यानंतर ही दोन्ही युग्मके दोन स्वतंत्र जीवांप्रमाणे एकाच भ्रूणामध्ये वाढू लागतात. त्यामुळे हे तयारच होतात, एकाचे दोन रेप्लिका होऊन, त्यामुळे हे एकसारखे दिसणारे दोन मुलगे किंवा दोन मुली होतात. आता अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या दिसण्यापेक्षा यांचा क्रोमोजोम पॅटर्न ditto समान असतो. पुढे वाढताना त्यांच्यावर जे जसे थोड्याफार फरकाने संस्कार होतात तसं त्यांचं दिसणं वागणं बनू लागतं. याउलट द्वियुग्मज मुळातच कोणाही दुसऱ्या दोन सख्ख्या भावंडांप्रमाणे दोन स्वतंत्र भ्रूणांमध्ये वाढतात, फक्त ती एकाच वेळेला जन्मतात एवढंच. त्यामुळे हे दोन मुलगे, किंवा दोन मुली, किंवा एक मुलगा, एक मुलगी, असू शकतात. आणि ही मुलं एकसमान दिसतील, असतील, असं नाही. आणि दोन सख्खी भावंडं किती एकसमान दिसतील तेवढी नक्कीच दिसतात!

हे असं अंडकोषातून एकावेळेला दोन अंडी सुटण्याचं गुणसूत्र जेनेटिक असतं, वाढत्या वयात झालेल्या गर्भधारणेमुळे होऊ शकतं, किंवा काही मेडिकल प्रक्रिया, औषधोपचार चालू असल्याने होऊ शकतं. हं, आणि हे जेव्हा जेनेटिक असतं तेव्हा ते आजीकडून आईला, आणि आईकडून नातीला बहाल होतं. एकयुग्मज असे अचानकपणे का विभाजीत होतात, त्याचं शास्त्र अजुनही शास्त्रज्ञ शोधत आहेत. तोपर्यंत आपण त्याला देवाची/ निसर्गाची देणगी म्हणू शकतो!

तर असं हे देवाचं दान आमच्या पदरी पडलेलं आहे. त्याने बनवताना समसमान सर्व वाटून दिलेलं आहे, आणि पालक म्हणून पोषणामध्ये जमेच्या बाहेर समसमान आणिक उत्तमोत्तम त्यांच्या वाट्याला यावं असा प्रयत्न आमचाही असतोच. तरीही अधूनमधून “आई तुला ती जास्त आवडते की मी?” हा प्रश्न विचारला जातोच! आता त्यावरचं माझं उत्तरही त्यांना पाठ झालेलं आहे. “माझ्या दोन डोळ्यांपैकी कोणता मला जास्त आवडेल सांगा बघू?” मग दोघी खदखदून हसतात, आणि कुशीत शिरतात. एकेकाळी पोटात एवढुशा दाण्यांएवढे होऊन माझ्या कुशीत अवतरले, वाढले, आता एवढ्यातच मांडीवर देखिल न सामावणारे, हे दोन जीव माझं आयुष्य सामावून राहिले आहेत. त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळेच माझ्या जगण्याला खरा अर्थ मिळतो आहे. त्यांना एकतानतेने सांभाळताना, त्यांचं वैयक्तिक वेगळेपण जपणं हे आव्हान आहेच, पण ते तर मी मातृत्वाच्या पहिल्या दिवशी, त्यांनी मला आणि मी त्यांना केलेल्या पहिल्या स्पर्शाच्या वेळेसच स्वीकारलं आहे. बाकी सगळं निसर्गाच्या हवाली!

— प्रज्ञा वझे घारपुरे.

2 Comments on नवी सुरुवात (जुळ्यांना वाढवताना)

  1. वा pradnya khoop अभ्यास poorn माहिती आणि लिखाण! Shubheccha तुला ??

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..