नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते नवीन निश्चल

पुण्याच्या फिल्म अॅ ण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमधून सुवर्णपदक मिळवून नवीन निश्चल ‘सावन भादो’ या १९७० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर झळकले. त्यानंतर ‘संसार’, ‘परवाना’, ‘बुढ्ढा मिल गया’, ‘नादान’, ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’, ‘हँसते जख्म’, ‘धर्मा’, ‘छलिया’, ‘धुंद’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.  त्यांचा जन्म १८ मार्च १९४६ रोजी झाला. दोन पंजाबी आणि सुमारे ८०-९० चित्रपटांतून सुरुवातीला नायक किंवा सहनायक म्हणून आणि नंतरच्या काळात चरित्र नायकाच्या व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रेक के बाद’, त्यापूर्वी आलेल्या ‘राजू बन गया जंटलमन’ ‘खोसला का घोसला’, ‘बॉलीवूड कॉलिंग’, ‘आशिक बनाया आपने’, ‘रहना है तेरे दिल में’ यांसारख्या अलीकडच्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका साकरल्या. बासू भट्टाचार्य दिग्दर्शित १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘आस्था’ चित्रपटात अभिनेत्री रेखासोबतची त्यांची प्रणयदृश्ये चांगलीच गाजली होती. नवीन निश्चल यांना मोठय़ा पडद्यावर नायकाच्या फारशा भूमिका नंतरच्या काळात मिळाल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी छोटय़ा पडद्याकडे मोर्चा वळवला. जया बच्चन निर्मित ‘देख भाई देख’ या दूरदर्शनवरील कौटुंबिक विनोदी मालिकेत मा.नवीन निश्चल यांनी बलराज दिवान ही भूमिका केली होती आणि ती चांगलीच गाजली.

नवीन निश्चल यांचे निधन १९ मार्च २०११ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..