ज्या जगात आपण जन्माला आलो आहोत त्या जगाकडे आणि त्यातल्या नानाविध व्ववहारांकडे डोळे, कान आदी ज्ञानेंद्रिय उघडी ठेवून आणि मनात अखंड कुतुहल ठेवून जगणं म्हणजेच सुसंस्कृतपणानं जगणं..! ज्ञानोबा माऊलींना अपेक्षित असलेले ‘चेतनाचिंतामणी’चं जगणं कदाचित असंच असावं असं मला वाटतं.
वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं नावीन्य जाणवून घयायला आपल्या डोळ्यांना आणि कानांना फुरसदच नसते..आणि पुढं पुढं तर आपल्या डोळ्यां/कामांची हे शोधण्याची सवयही नष्ट होते. मी ती प्रयत्नपूर्वक जिवंत ठेवायचा प्रयत्न करतो एवढंच..
मी लिहिलेल्या ‘टॅक्सीवाला‘ पोस्ट मधला टॅक्सीवाला मला असाच रुटीनमधल्या नविनाचा शोध घेतानाच सापडला होता. आपण प्रयत्न केलात तर आपल्यालाही सापडेल.. रोजचा दिवस सारखाच असला तरी तो काहीसा वेगळा असतो हे निश्चित आणि ते वेगळेपण काय हे शोधणं म्हणजेच ‘जगणं’ असं माझं मत आहे..
–नितीन साळुंखे
Leave a Reply