नवीन लेखन...

नवरत्नमालिका – ७

पद्मकान्तिपदपाणिपल्लवपयोधराननसरोरुहां
पद्मरागमणिमेखलावलयनीविशोभितनितम्बिनीम् ।
पद्मसम्भवसदाशिवान्तमयपञ्चरत्नपदपीठिकां
पद्मिनीं प्रणवरूपिणीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ ७॥

सर्वच देवतांना प्रिय असणारे पुष्प म्हणजे कमळ. चिखलात जन्माला येऊन सूर्याच्या तेजाच्या दिशेने झेपावण्याची त्याची वृत्ती. त्यावर गुंजारव करणार्‍या भ्रमरांचा शब्द, त्याचा कोमल स्पर्श, त्याचे अत्यंत आकर्षक रूप, त्यामध्ये असणाऱ्या मकरंदाचा रस आणि त्याचा नितांत मनोहारी गंध. अशा पाचही अंगाने आनंद देणारे हे पुष्प. आई जगदंबा तशीच सर्वांगसुंदर आणि सर्वांगाने आनंद देणारी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अवयवाला कमळाची उपमा देताना आचार्य श्री म्हणतात,

पद्मकान्ति– कमळा प्रमाणित सौंदर्य असणारे

पद– चरणकमल,

पाणि– करकमल,

पल्लव– ओष्ठकमल,

पयोधर– स्तनकमल,

आननसरोरुहां– मुखकमल असणाऱ्या,

पद्मरागमणि– पद्मराग नामक रत्नाने तयार केलेली,

मेखलावलय– मेखला रुपी आवरणाने,

नीविशोभित– कमरे जवळील वस्त्र सुशोभित करण्यात आल्याने,

नितम्बिनीम्– शरीराचे समस्त विशाल अवयव सौंदर्यसंपन्न असणाऱ्या,

पद्मसम्भव– कमळातून जन्माला आलेले श्री ब्रह्मदेवांपासून

सदाशिवान्त– सदाशिवां पर्यंत,

मयपञ्चरत्नपदपीठिकां– वर वर्णन केलेल्या पंचदेवतांनी युक्त असणाऱ्या पदपीठाने अलंकृत, तंत्र शास्त्रामध्ये आई जगदंबेच्या आसनाच्या खाली या पाच देवतांच्या मस्तकाचे वर्णन केले आहे. अशा पंचमुंडासनावर आरुढ असणाऱ्या,

पद्मिनीं– हाती कमळ धारण करणाऱ्या, त्याद्वारे भक्तांना पाचही अंगाने मिळणारा परिपूर्ण आनंद प्रदान करण्याची क्षमता हाती असणार्‍या,

प्रणवरूपिणीं– ॐकार स्वरूपिणी, परब्रह्मस्वरूपिणी.

मनसि भावयामि परदेवताम्– परम देवता असणाऱ्या आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 414 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..