कडूनिंबाचा उपयोग आपण बऱ्याच प्रसंगी करतो.आपले हिंदू नव वर्ष अर्थात गुढी पाडवा ह्या दिवसाची सुरूवात नाही का आपण कडूनिंबाचा रस पिऊन करत.आपल्या शास्त्रात किती महत्त्व आहे पाहीलेत ना कडूनिंबाला.
ह्याचे १४-१६ मीटर उंच वृक्ष असतो.खोड टणक,सरळ वाढणारे असते पाने विषमपक्ष असून २०-३५ सेंमू लांब असतात पत्रकाच्या कडा दंतूर असतात.फुले मंजीरी स्वरूपात असतात पांढरी.फळ लांबट गोल १.२५-२ सेंमी लांब,पिकल्यावर पिवळे व कच्चे असताना हिरवे कडवट व उग्रगंधी असते.ह्यात १ बी असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे फुले,पाने,त्वचा,बीज व तैल.हा चवीला कडू,तिखट,तुरट असून थंड गुणाचा असतो तसेच हा हल्का व रूंक्ष आहे.कडूनिंब कफपित्तनाशक व वातकर आहे.
चला आता आपण ह्याचे काही उपयोग जाणून घेऊयात:
१)जखम धुवायला निंब सालीचा काढा उपयोगी आहे.
२)कडूनिंबचा पाला घरात जाळल्यास घरातील किटक जंतू ह्याचा नाश होतो.
३)पोटात कृमी झाल्या असल्यास निंबसालीचा रस मधासोबत देतात.
४)ताप येऊन त्यामुळे हातापायांची जळजळ होत असल्यास निंबाचा कल्क त्या जागी लेप करतात.
५)खरजेवर निंबाच्या बिया तीळ तेलात वाटून तिथे लेप लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply