नवीन लेखन...

नेपाळी मित्राचा सहवास

त्याची मातृभाषा नेपाळी. तो नेपाळहून महाराष्ट्रात येतो. आई देवाघरी गेलेली. वडील गुरखा म्हणून रात्रभर जागत. गावात पहारा देत. लोकांना जागवत. एक भाऊ पाठीशी. तो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेतो. गावातील व्यापारी , शिक्षक त्यांना मदत करतात. माणुसकी जपतात. मराठी भाषा उत्तम बोलतो. पुढे तो इंजिनीयर होतो. पुण्यामध्ये स्वत:चे वर्कशॉप चालवतो. जगण्यासाठी धडपड करतो. आता ते दोघेही भाऊ परदेशात काम करतात.

बालपणी आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. गावाकडून माझा डबा यायचा. मनसोक्त जेवायचे. तलावात पोहायला जायचे असा दिनक्रम. आंतरराष्ट्रीय, अनभिज्ञ, विषयावर तो बोलायचा. उत्सुकतेने आम्ही ऐकायचो. आम्ही घडत होतो. तो आम्हास घडवत होता.

कलाटणी देणारा हा मित्र होता. भीमबहादूर लालबहादूर बम असे त्याचे नाव. त्याची मातृभाषा मराठी नसतानाही या विषयात त्याला सर्वात जास्त गुण दहावीच्या परीक्षेत मिळाले.

तीसेक वर्षांपूर्वीच्या त्याच्या सहवासातील अनेक आठवणी ताज्या आहेत. पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास असायचा. कष्ट घेऊन, परिस्थितीशी झगडणे, यश संपादन करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मला मिळाले. शिकण्यासारखे त्याच्याजवळ भरपूर होते. त्यांचे वडील आजमितीस हयात नाहीत. माणसं आठवणी ठेवून जातात कुठे? हा निरुत्तर करणारा प्रश्न. आता त्यांची भेट नाही; पण माणूस सहवासात घडतो, तो सहवास आम्हाला लाभला.

विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..