नेहमी लोकलने ऑफीसला येणारा हेडक्लार्क आज पास संपला म्हणून बसनं आला होता.
कामातून थोडी उसंत मिळाल्यावर त्यानं हाताखालच्या कारकूनाला बोलावून बसचं तिकीट दाखवलं, आणि विचारल –
“हे तकीट बघ, आणि काही कल्पना सुचते का सांग.”
कारकूनानं तिकीट उलटं पालटं करून पाहिलं, आणि म्हणाला –
“नाही बुवा!”
“हे तिकिटाच्या मागे काय छापलंय?”
“See world even after death! Donate eyes!”
“काही सुचलं?”
“नाही.”
“मी सांगतो, आपला कोणि शत्रू असेल तर त्याच्या नावानं हॉस्पिटलला फोन करायचा आणि सांगायचं की आमच्या घरातील अमुक व्यक्ती मयत झाली आहे. नेत्रदान करण्याची तिची इच्छा होती.”
सजीव गोखले,
०९/०६/२०२२.
Leave a Reply