नवीन लेखन...

‘कार्यमग्न’ (बिझी) आहात असे दाखवू नका !

सहज एखाद्याला विचारलं – ” भेटायचं कां ?”
“नाही रे,सध्या बिझी आहे” असं टिपिकल उत्तर मिळते. आणि हे व्यक्तिगत तसेच व्यावसायिक जीवनातील उत्तर असते. सतत,सदासर्वदा बिझी ! जणू काही हा “स्टेटस सिम्बॉल “असतो. पण कार्यमग्न आहे,म्हणजे खूप आनंदी/समाधानी आहे किंवा फार उत्पादक आउटपुट मिळतंय असं मात्र नसतं. याचा साधासरळ,सोप्पा अर्थ असा की – हाती असलेला वेळ भरून काढतोय.

एखाद्या प्रशिक्षणात येणारा हा सर्रास अनुभव आहे- “काय करू, वेळच नसतो.” असं वाक्य तोंडावर मारलं जातं. मग त्या प्रशिक्षणार्थीला सांगावं लागतं – ” बाबा रे/ बाई गं( as the case may be), सर्वप्रथम हा वाक्प्रचार तुझ्या शब्दसंचयातून काढून टाक. (इथे शब्दकोश वगैरे अवजड शब्द टाळलेला बरा, कारण आपला शब्दसंचय फार म्हणजे फार मर्यादित असतो. उगाच डिक्शनरी चा अपमान व्हायचा.) “मोकळा वेळ मिळावा ” या प्रतीक्षेत असाल तर ते विसरून जा. मोकळा वेळ नामक प्रकार नसतोच. आपल्याला तो “शोधून “काढावा लागतो. आपले प्राधान्यक्रम ठरवायचे आणि ते मनाजोगते पार पडले की उरतो तो मोकळा वेळ असतो. मग त्याचा वापर कसा करायचा,हे ज्याचं त्याने ठरवायचं.

मोकळा वेळ हा काही टपकन हातात येऊन पडणाऱ्या फळासारखा नसतो. यशस्वी मंडळी आपले जीवनहेतू साध्य करण्यासाठी सतत ध्येयावर लक्ष केंद्रित करीत असतात. तेव्हा खालील गोष्टी निमूटपणे आणि शक्यतो हसतमुखाने स्वीकारा-

१) वेळ हे अतिशय किमती आणि मर्यादित संसाधन असते.
२) तातडीचे (अर्जंट) आणि महत्वाचे (इम्पॉर्टन्ट) यातील फरक ओळखायला शिका.
३) स्वतःचे जीवनहेतू, स्वतःची नीतिमूल्ये यांच्यानुसार अग्रक्रम ठरवा (त्यांच्याशी तडजोड करू नका).
४) संपूर्ण-१०० टक्के वेळ कोणासाठीही राखून ठेऊ नका, त्याचे आश्वासन देऊ नका. दिवसातील काही वेळ स्वतःसाठी, विश्रांतीसाठी आणि करमणुकीसाठी
राखून ठेवायला शिका. ते फार गरजेचे असते.
५) ज्या गोष्टी करणे थांबविले तरी चालेल अशा गोष्टींचा सातत्याने शोध सुरु ठेवा.
६) स्वतःची ऊर्जा कोणाला बहाल करायची याबाबत चिकित्सक/चोखंदळ राहा.

पीटर ड्रकर म्हणतात- ” यशस्वी नेतृत्व आपल्या वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी दक्ष असते. ” स्वतःच्या वेळेचा हिशेब जे राखतात, प्रामाणिकपणे उत्तरदायित्व निभावतात, ते अंततः प्रभावी आणि सुखी होतात.

मनाशी जस्ट विचार करा- दिलेल्या दिवसातील (किंवा मोफत मिळालेल्या दिवसातील) प्रत्येक क्षणाचा आपण हिशेब ठेवतो कां? नसल्यास कां नाही, याचाही विचार करा.

एखादे महत्वाचे काम हातून अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर ओळखा- आपण कमी महत्वाच्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करीत आहोत. म्हणून “माझ्याकडे वेळ नसतो” असं म्हणण्यापेक्षा “मी आज “य” करण्याऐवजी “क्ष “करीत राहिलो आणि म्हणून माझ्या ध्येयापासून विचलित झालो.” थोडक्यात मी चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले हे कबूल करा.

हा प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्वच शेवटी कमी “बिझी “ठेवेल तरीही खूप काही साध्य करता येईल.

थोरोचं वाक्य विसरून चालणार नाही. तो म्हणतो- ” कोणत्याही गोष्टीची किंमत म्हणजे त्याबदल्यात दिलेल्या आपल्या अमूल्य जीवनाचा तुकडा असतो. ”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..