आज दिनांक ६ ऑक्टोबर. १९२१ साली याच दिवशी न्युयॉर्कमध्ये उच्चभ्रु असं ब्रोडवे थिएटर उभारण्यात आलं होतं. त्या थिएटरचं नाव होतं न्यु सेंच्युरी थिएटर. हे थिएटर न्युयॉर्कमधील नावाजलेलं शहर मॅनहॅटन येथे वसलेलं होतंं. थिएटरची आसन व्यवस्था १७०० इतकी होती. या संपूर्ण थिएटरचं स्थापत्य हबर्ट जे. क्रॅप यांचं होतं आणि या थिएटरवर मालकी हक्क शुबर्ट या संस्थेचा होता. या थिएटरचं मूळ नाव अल जॉलसन असं होतं. शुबर्टस् ने ते विकत घेतलं त्यावेळी त्याचं जॉलसन्सचं ५९ वे स्ट्रीट थिएटर असं नामकरण करण्यात आलं. ६ ऑक्टोबर १९२१ ला सिगमंड रॉमबर्ग्सच्या बोंबो नामक सांगितीक खेळाने थिएटर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. पुढे २ वर्षांनंतर , कॉन्स्टॅंटिन स्टानिस्लावस्कीच्या मालकीचे असलेले मॉस्को आर्ट थिएटर संस्थेचा अमेरिकन प्रिमिअर हा कार्यक्रम तिथे आयोजित केला गेला.
या थिएटरचं अनेकदा वेगवेगळ्या कारणाने वेगळ्या नावाने नामकरण करण्यात आलं, जसं की ,
- Jolson’s 59th Street Theatre (1921-1931)
- Central Park Theatre (1931)
- Shakespeare Theatre (1932-1934)
- Venice Theatre (1934-1942)
- Jolson’s 59th Street Theatre (1942)
- Molly Picon Theatre (1943)
- Jolson’s 59th Street Theatre (1943)
- New Century Theatre (1944-1954)
यात Jolson’s 59th Street Theatre हे नाव Jolson यांंचा आदर करण्यासाठी दोनदा ठेवण्यात आलं. यातील Central Park Theatre हे फक्त चित्रपटगृह म्हणून वापरण्यात आलं. ८ एप्रिल १९४४ रोजी थिएटरचं नाव New Century Theatre असं ठेवण्यात आलं. हे नाव ठेवण्यापूर्वी थिएटरचं नुतनीकरण करण्यात आलं.
१९४० चा उत्तरार्ध ते १९५० चा पूर्वार्ध या कालखंंडात NBC Studio नामक संस्ठेने New Century चा वापर टी.व्ही. वरील कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी केला. १९५४ साली थिएटर कायमस्वरुपी बंद करण्यात आले आणि १९६२ साली हे थिएटर पाडण्यात आले.
— आदित्य दि. संभूस
#New Century Theatre #New York #Drama #Television
Leave a Reply