नवीन लेखन...

पारशांची नवीन शव-व्यवस्था

बातमी : पारसी समाजात आतां दहनसंस्कार
संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. २५.०६.२०१६.

• कांहीं पारसी ग्रूपस्.नी वरळीला तयार केलेल्या नवीन शवव्यवस्थेद्दलची बातमी, कांहीं दिवसांपूर्वी वाचनात आली. त्यांनी आतां शव-दहनासाठी इलेक्ट्रिक-क्रेमरटोरियम स्थापलें आहे.
• मी यावर धार्मिक दृष्टीकोनातून कांहींही भाष्य करत नाहींये, कारण प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. मी एक प्रकारें सामाजिक दृष्टिकोनातून या गोष्टीकडे पहात आहे.
• अर्थातच, या नवीन व्यवस्थेला बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन व सरकारची संमती असणारच, त्याशिवाय हें क्रेमेटोरियम सुरूं झालें नसतें. ऑथॉरिटीज्.ना यासाठी परवानगी द्यायला अडचण येणारच नव्हती, कारण दहन-संस्कार ( हिंदूंमध्ये क होईना, पण ) प्रचलित आहेच, आणि आतां पारंपरिक पद्धतीऐवजी इलेक्ट्रिक-क्रेमरटोरियमचा वापरही अनेकांना जास्त चांगला वाटत आहे.
• पारशांची पारंपरिक पद्धत काय ? ते शवाला त्यांच्या ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये ठेवून देतात. हेतू हा की त्याचा उपयोग scavengers च्या निर्वाहासाठी व्हावा. ( फार पूर्वी कदाचित गांवाबाहेर ठेवत असतील) .
• पारसी धर्म फार जुना आहे. त्याचा संस्थापक झरथ्रुष्ट्र याचा काळ इ.स. पूर्व कांहीं शतकें-सहस्त्रकें आहे. त्याच्या काळात, अशा प्रकारची शव-व्यवस्था खरोखरच स्तुत्य होती , भूतदयेच्या priciple ला धरून होती, मनुष्य-देहाचा सुयोग्य उपयोग व विनियोग मृत्यूनंतरही व्हावा, ही noble भावना, उच्चकोटीची इच्छा त्यामागे होती.
• समाज जेव्हां निसर्गाच्या अधिक जवळ होता, तेव्हांची ही पद्धत आहे , natural balance, निसर्गाचें संतुलन कायम ठेवण्याचा तो एक प्रयत्न समजायला हरकत नाहीं. मानव त्या काळीं, स्वत:ला निसर्गाचा एक भाग मानत असे.
• पारशीधर्मीय आजही तीच पद्धत अवलंबतात.
• अलास्कामधील एस्किमो एकप्रकारें असेच करतात. व्यक्ती अगदी म्हातारी झाली, की ते त्या व्यक्तीला एक आठवडा पुरेल इतकें अन्न देतात , आणि एक छोट्या होडीत घालून सोडून देतात. हेतू असाच, की मृत्यूनंतर त्याच्या देहाचा प्राण्यांना-माशांना उपयोग व्हावा.
• पण बदलत्या काळाबरोबर भोवतालची परिस्थितीही बदलली. पुरातनकालीं जनजीवन खेड्यांमध्ये सामावलेलें होतें. त्याकाळी वर उल्लेखलेल्या व्यवस्थेचें पालन सहज होऊं शकत होतें. आज, म्हणजे त्या काळाच्या अनेकानेक शतक-सहस्त्रकांनंतर, परिसर आणि जनजीवन खूपच बदललें आहे. खेडी-मोठी_ग्रामें-शहरें (Towns)-वाढत्या_आकाराची_शहरें ( towns growing bigger)-महानगरें (metropolis)-mega_cities (महा-महानगरें) असा हा urban प्रवास आहे.
• आज मुंबईसारख्या मेगा-सिटीमध्ये मृतदेहांसाठी scavengers मिळतच नाहींत. मग, शवांची त्यांच्याद्वारें विल्हेवाट लावण्याचें कार्य अधिकाधिक बिकट होत जात असल्यास नवल काय ? त्यामुळे, शव-व्यवस्थापनाचा पुरातन मूळ-हेतू साध्य होणें पारशांना दिवसेदिवस कठीण होत चाललेलें होतें व आहे.
• Traditionalist ना असा बदल मान्य नाहीं (असें वृत्तपत्रात आलेले आहे). याचें प्रमुख कारण म्हणजे, गेली १३ शतकें पारशांनी आपली जुनी परंपरा unchanged पाळूनच तर आपला धर्म जिवंत ठेवला आहे.
• पण , बदलत्या काळाबरोबर कांहीं गोष्टी बदलणें मात्र आवश्यक आहे.आणि, तेंच त्यांच्यामधील एका प्रगतीशील गटानें केले आहे.
• अन्य धर्मांचें पहा. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माप्रमाणें, शवाला दफन करतात, bury करतात. आज जागेच्या ( स्मशानातील जमिनीच्या ) वाढत्या अडचणींमुळे, shortage मुळे, ख्रिस्ती लोकांना त्यांचे चर्च, coffin ऐवजी shroud मध्ये burial करायची विनंती करत आहे. ( ही बातमीही हल्ली-हल्लीच वृत्तपत्रात आलेली आहे). म्हणजेंच , बदल्या काळाबरोबर बदलण्यांचा त्यांचा विचार आहे.
• हिंदूंना ही जागेची, अथवा scavengers उपलब्ध नसण्याची समस्या भेडसावत नाहीं, कारण दहनाची पद्धत.
• प्रागैतिहासिक काळीं, सर्वत्र शवाला जमिनीखाली मूठमाती देण्याचीच पद्धत होती. पुरातन सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननात असे त्याकाळीं पुरलेल्या शवांचे सांगाडे सापडले आहेत. परंतु, नंतर कधीतरी भारतात ही पद्धत बदलली व दहनाची पद्धत सुरूं झाली. महाभारतात उल्लेख आहे की, कुरुक्षेत्राचें युद्ध संपल्यानंतर कुरुवंशीय स्त्रिया रणांगणात आल्या, व त्यांच्या आदेशानुसार, तेथें इतस्तत: विखरलेले रथांचे अवशेष, बाणांचे तुकडे इत्यादी साहित्य गोळा करून मृतांचें दहन केलें गेलें. याचा अर्थ असा की, त्या काळीं दहनाची पद्धत रूढ झालेली होती.
पुरण्यापासून ते दहनापर्यंतचा बदल, हा त्या काळीं फार मोठा, क्रांतिकारी बदल होता.
• पण त्यांतही, हल्ली नवीन काळानुसार कांहीं बदल करणें गरजेचें ठरत आहे. दहनासाठी लाकूड फार खर्च होतें. पुरातनकालीं त्याची अडचण वाटली नाहीं. त्या काळीं वनें-अरण्यें भरपूर होती, त्यामुळे लाकडाच्या कमतरतेचा प्रश्नच नव्हता. उलट, त्या काळीं वनें जाळून ती जमीन वस्तीयोग्य बनवली जात असे; जसें की कृघ्ण व अर्जुन यांनी केलेलें खांडववन-दहन. पुरातन काळातील अशी अन्य उदाहरणेंही आहेत.
आज, लाकडाच्या कमतरतेचा प्रश्न तर आहेच , पण पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही , ( जो आज अति-महत्वाचा आहे ) , शवदहनासाठी लाकूड खर्च करणें योग्य नाहीं. त्यामुळे, इलेक्ट्रिक-क्रेमेटोरियमचाच प्रसार व उपयोगच योग्य आहे, व तो वाढतही आहे. अर्थात्, हें फक्त शहरांमध्येच होत आहे ; खेड्यांमध्ये अजूनही पारंपरिक पद्धतच वापरात आहे. We still have a long long way to go.
• या सर्व पार्श्वभूमीवर, आपण, ( धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर ) , एक सामाजिक बाब म्हणून, शवांचें इलेक्ट्रिक-क्रेमेटोरियममध्ये दहन करायला आरंभ करणार्‍या, व तें promote करणार्‍या,पारशी मंडळींचें अभिनंदन करायला हवें.
प्रगतिशील विचारांची मंडळी support-Opposition या विचाराच्या पल्याड असतात. तरीही, कुणीतरी त्यांना हें सांगायला हरकत नाहीं की, समाजातले अन्य प्रगतीशील लोक तुम्हाला support करताहेत.

 

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..